गुरुवार ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर स्व. मिनाताई ठाकरे संस्कार-धाम म्हाडा कॉलनी चांदिवली येथे साजरा होणार महोत्सव
शिवसेना शाखा १५७/१५८ पुरस्कृत आणि स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांच्या वतीने स्व. मिनाताई ठाकरे संस्कार-धाम, म्हाडा कॉलनी चांदिवली येथे आईची आठवण आणि संस्कार सांगणारा ‘आई महोत्सव’ आजपासून ६ नोव्हेंबर पर्यंत साजरा होत आहे.
या महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते डॉ. तात्याराव लहाने, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर, सौ. सिंधुताई सपकाळ (माई), प्रा. नितिन बानुगडे–पाटील हे दररोज संध्याकाळी ७ वाजता ‘आई’ या विषयावर आपले अनुभव आणि विचार मांडतील.
३ नोव्हेंबर रोजी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, मुख्य अधिष्ठाता जे. जे. हॉस्पिटल हे “मी व माझी आई” या व्याख्यानाच्या माध्यमातून या महोत्सवाची सुरुवात करतील. यावेळी माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शुक्रवारी ४ नोव्हेंबर रोजी जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर “आई” विषयावर कीर्तन सादर करतील. यावेळी शहीद कॅपटन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. तर शनिवारी अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. सिंधुताई सपकाळ “आईच्या काळजातून” आत्मकथन करतील. यावेळी डॉ. रश्मी करंदीकर, उपायुक्त ठाणे शहर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रविवारी शिव व्याख्याते प्राध्यापक नितिन बानुगडे – पाटील “जिजाऊंच्या संस्कारातून साकारलेलं स्वराज्य” या व्याख्यानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य घडवण्याच्या घडामोडीतील आई जिजाऊचे संस्कार आणि जडणघडण यावेळी उडघडतील. तर कवी अरुण म्हात्रे यांच्या काव्य मैफलीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
No comments yet.