पवईत जनावरांचे मांस घेऊन जाणारी गाडी पकडली; दोघांना अटक

ज (रविवारी) सकाळी बेकायदेशीरपणे जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या बलेरो पिकअप गाडीला ताब्यात घेत पवई पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे. मुरबाड येथे जनावरांची कत्तल करून त्याचे मांस मुंबईत घेऊन येत असताना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही कारवाई केली.

अली उस्मान कुरेशी (३५), सय्यद परवेज अहमद (४०) अशी पवई पोलिसांनी या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत.

जनावरांच्या कत्तलीवर निर्बंध असतानाही होणाऱ्या सर्रास कत्तलींना रोखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे़. मात्र, त्यानंतरही  चोरी-छुपे रात्रीच्या अंधारात हा धंदा राजरोसपणे चालू असतो. याचीच दखल घेत विश्व हिंदू परिषदेने याला रोखण्याची सूत्रे सरळ आपल्या हातात घेतली आहेत. याचाच भाग म्हणून त्यांनी पाठलाग करत जनावरांची कत्तल करून त्यांच्या मांसाची मुंबईत वाहतूक करणाऱ्या एका गाडीला पकडून पवई पोलिसांच्या हवाली केले.

“मुरबाड येथे जनावरांची कत्तल करून त्यांची वाहतूक मुंबईत विविध ठिकाणी अनेक गाड्यांमधून केली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्या आधारावर आम्ही माहिती काढत आज सकाळी तिथून ५.३० वाजता गाडी निघताच तिचा पाठलाग सुरु केला होता. गांधीनगर पार करताच त्यांच्या गाडीचा वेग मंदावताच आयआयटी मार्केट गेट जवळ आम्ही  गाडीला थांबवून पाहिले असता टमाटरच्या पेट्यांच्या आड मांसाची वाहतूक केली जात होती. याबाबत आम्ही त्वरित पोलिसांना माहिती देत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले” असे याबाबत बोलताना विश्व हिंदू परिषदेचे पांडेय यांनी आवर्तन पवईला सांगितले.

“गाडीत टमाटरच्या पेट्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात जनावराचे मांस घेऊन जात असणारी गाडी आम्ही ताब्यात घेतली असून, वाहनाचे चालक आणि सहकारी अली आणि सय्यद अशा दोन तरुणांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करत आहोत. लॅब चाचणीसाठी सापडलेल्या मांसाचा नमुना सुद्धा पाठवण्यात आला आहे, त्याचा अहवाल येताच पुढील कारवाई नक्की होईल” असे यावेळी बोलताना पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!