धम्मदीप तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव  

dhammdipस्वयंप्रज्ञा व्हा! हा उद्देश घेऊन  पवईतील दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विध्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पुढील वाटचालीसाठी विविध अभ्यासक्रमांचे आणि क्षेत्रांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन पवईतील धम्मदीप सोशल अँड कल्चरल असोसिएशनच्या तर्फे आयआयटी येथील मुक्तेश्वर आश्रम येथे रविवारी करण्यात आले होते.

पवई पोलीस ठाणेच्या महिला पोलीस निरीक्षक सौ. सरला वसावे यांच्या हस्ते उदघाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तब्बल ९० उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शकांच्या हस्ते धम्मदीप सोशल अँड कल्चरल असोसिएशनच्या वतीने सत्कार करून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भवितव्याचे नियोजन, अभ्यास कसा करावा? प्रगतीपथावर काय करावे? या विषयावर शेखर ओव्हाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर इंजिनियरींग क्षेत्रासंदर्भात निलेश कुशेर, पत्रकारिता क्षेत्राबाबत वरिष्ठ पत्रकार प्रमोद चव्हाण आणि संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रा संदर्भात सुदर्शन जाधव यांनी मार्गदर्शन केले. वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शन करताना डॉक्टर सुशील गायकवाड यांनी महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यानंद काकडे, रमेश कांबळे, महेश देडे, अजय सावंत, जितू धिवार, राहुल कदम, दत्ता दाभोळकर, प्रदीप भदरगे, नितीन कुशेर, आनंद काकडे, संतोष ठाकूर, अमोल चव्हाण, आरती सावंत, दिपाली मगरे, पूजा सावंत यांनी परिश्रम घेतले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!