पवई सायक्लोथॉनमध्ये मुंबईचे डब्बेवाले

न, वारा, पाऊस काहीही असो सायकलवरून प्रवास करत वेळेच्या आत चाकरमान्यांना त्यांचा डब्बा पोहचवणारे आणि जगात मँनेजमेंट गुरु म्हणून स्थान असणारे मुंबईचे डब्बेवाले, पर्यावरण संरक्षणाच्या मुद्यावर पुढे सरसावत रविवारी १३ डिसेंबरला (उद्या) होणाऱ्या पवईच्या पहिल्या वहिल्या सायक्लोथॉनमध्ये विद्यार्थी, सायकल प्रेमी, मान्यवर, ज्येष्ठ नागरिकांसोबत शामिल होणार आहेत.

हिरानंदानीच्या डोंगर, हिरवळीतून बनलेल्या रस्त्यातून आपल्या सायकलवर हे डब्बेवाले आपला डब्ब्यांच्या भाराऐवजी, पर्यावरण रक्षणासाठी आणि चांगल्या प्रकृतीसाठी सायकलिंग लाभदायक असल्याचा संदेश घेऊन दिसणार आहेत.

वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन पसरल्याने वायूप्रदूषण निर्माण झाले आहे. पर्यावरणात होत असणाऱ्या बदलांमुळे देशाच्या विविध भागात अनेक आपत्ती, प्रलय घडत आहेत. जे पाहता पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रस्टच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी लोकांच्यात सायकल संस्कृती रुजावी म्हणून पवईमध्ये सायक्लोथॉनचे आयोजन केले गेले आहे.

message letter from Vinod Tawde edusports minisसांस्कृतिक व शिक्षण मंत्र्यांचे शुभेच्छा पत्र

महाराष्ट्राचे सांस्कृतिक, शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा. श्री विनोद तावडे यांनी यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रस्टच्या या उपक्रमाचे स्वागत करत पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले आहे. “यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रस्टच्या वतीने आयोजित सायक्लोथॉनबद्दल ऐकून आनंद झाला. पर्यावरण रक्षणासाठी तुमची संपूर्ण टिम करत असलेली अथक मेहनत व परिश्रम हे खरच स्तुत्य आहे. माझ्या तुमच्या संस्थेला आणि सायक्लोथॉन उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.” असे आशयाचे पत्र त्यांनी संस्थेला पाठवले आहे.

सायक्लोथॉनमध्ये हजारो संख्येने मुंबईकरांनी आपली नोंद केली आहे. ज्यामध्ये सायकल प्रेमी, सायकलिंग ग्रुपसह जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, अनेक मान्यवर व्यक्ती आणि राजकीय मंडळींची उपस्थिती असणार आहे.

माध्यमांशी बोलताना डब्बावाला संघटनेचे समन्वयक सुबोध सांगळे म्हणाले, “१२५ वर्ष आमचे डब्बेवाले बंधू सायकलचा वापर करून चाकरमान्यांना त्यांचे डब्बे पोहचवण्याचे काम करत आहेत. सायकल हे वाहतुकीचे असे साधन आहे जे पर्यावरणाला कोणतीच हानी पोहचवत नाही, परंतु आम्हाला आमच्या स्थळावर पोहचण्यास आणि काम पूर्ण करण्यास मदत करते. आम्ही या उपक्रमात शामिल होतोय याचा आम्हास आनंदच आहे.”

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!