डेटिंग ऍप बनला सापळा; तरुणाचा नग्न व्हिडिओ बनवून उकळले २० हजार

प्रातिनिधिक छायाचित्र

पवई येथील एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा एक २३ वर्षीय तरुण डेटिंग ऍप, व्हिडिओ कॉल फसवणूकीला बळी पडला आहे. ४ ते ६ एप्रिल दरम्यान एका डेटिंग ऍपवर दिव्या नावाच्या मुलीशी संपर्क झाल्यावर व्हिडीओ कॉलदरम्यान त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ बनवून त्याला धमकावत त्याच्याकडून २०,००० रुपये भामट्यांनी उकळले आहेत.

तरुणाचा खाजगी व्हिडिओ त्याच्या भावाला, मित्राला आणि त्याच्या संपर्क यादीतील एका व्यक्तीला पाठवण्यात आला होता. व्हिडिओ अधिक प्रसारित होऊ नये म्हणून त्याच्याकडून २०,००० रुपयांची मागणी केली होती. ते पैसे देताच पुन्हा त्याच्याकडे ३०,००० रुपयांची मागणी केल्यानंतर शुक्रवारी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवई पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, तरुणाने एक डेटिंग ऍप डाऊनलोड केले होते. ४ एप्रिल रोजी, तरुण सांताक्रूझ येथे त्याच्या मित्रांसोबत राहत असणाऱ्या घरी असताना त्याला ‘दिव्या’ नामक तरुणीकडून कनेक्शन रिक्वेस्ट मिळाली, ज्यामध्ये डेटिंग ऍपवर ‘नवीन मैत्री शोधत आहे?’ असा संदेश होता. त्याने तिची विनंती स्वीकारली.

त्यानंतर दोघे व्हाट्स ऍपवर बोलू लागले. “६ एप्रिल रोजी मी आपल्या कार्यालयात असताना मला दिव्याचा व्हिडीओ कॉल आला, त्यावेळी ती नग्न अवस्थेत होती. काही सेकंदात फोन कट करून, तिने मला मेसेज करून नग्न होण्यास सांगितले.” असे तक्रारदार तरुणाने पवई पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

“तरुण ऑफिसमध्ये असेल्या वॉशरूममध्ये गेला. तिथे दोघांच्यात सुरु असलेल्या व्हिडीओ कॉल दरम्यान तरुणाचा खाजगी व्हिडीओ रेकॉर्डिंग करून त्याला पाठवण्यात आला. काही वेळाने दिव्या हिच्या नंबरवरून फोन करून एका व्यक्तीने हा व्हिडीओ व्हायरल न-करण्यासाठी त्याच्याकडे २०,००० रुपयांची मागणी केली,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

तरुणाने मागणी केलेली रक्कम युपीआयद्वारे त्यांना दिल्यानंतर सदर व्हिडीओ त्याच्या सर्व संपर्क क्रमांकांना पाठवून देण्याची धमकी देवून त्याच्याकडे आणखी ३०,००० रुपयांची मागणी केली गेली.

तरुणाचा खाजगी व्हिडिओ त्याच्या भावाला, मित्राला आणि त्याच्या संपर्क यादीतील एका व्यक्तीला पाठवण्यात आला होता. ज्यानंतर एका मित्राच्या सल्ल्यानंतर तरुणाने शुक्रवारी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

“आम्ही सर्व प्रोफाईल आणि संपर्क क्रमांक यांची माहिती मिळवत आहोत. सोबतच २० हजार रुपयांची रक्कम ज्या खात्यात जमा करण्यात आली आहे त्याची माहिती देखील आम्ही मागवली आहे,” असे आवर्तन पवईशी बोलताना सायबर अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!