Archive | Cyber Crime

online dating

विद्यार्थी असल्याचे भासवून दोन तरुणांना पवईत लुटले

पवई परिसरात न्यू इयर इव्हच्या (३१ डिसेंबर) रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख बनवून तरुणांना धमकावून लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वेगवेगळ्या तरुणांना यासाठी बळी बनवले आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एका घटनेत तर आरोपीने स्वतःला विद्यार्थी असल्याचे सांगून फसवणूक केली आहे. पहिल्या घटनेतील फिर्यादी […]

Continue Reading 0

ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली पवईतील सुवर्ण व्यावसायिकाची ३.७५ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी पवईतील एका सुवर्ण व्यावसायिकाला ३ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार, ४२ वर्षीय सुवर्ण व्यावसायिक यांचे गलेरिया येथे सोन्याचे दुकान आहे. मार्च २०२५ पासून त्यांना ८४२१२९९२२४ या […]

Continue Reading 0
online-cheating-2

गॅस बिल भरण्याच्या नावाखाली पवईतील व्यावसायिकाला ८.८ लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगारांनी आता आपला मोर्चा ज्येष्ठ नागरिकांकडे वळवला असून, पवईतील एका ७२ वर्षीय व्यावसायिकाला ‘गॅस कापला जाईल‘ अशी भीती दाखवून तब्बल ८.८७ लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेमकं काय घडलं? एका सामान्य दिवसाची सुरुवात या व्यावसायिकासाठी भयानक ठरली. त्यांना ‘महानगर गॅस’चे बिल थकीत असल्याचा आणि त्वरित पैसे न भरल्यास कनेक्शन कापले जाईल, […]

Continue Reading 0
online cheating

बनावट स्नॅपचॅट प्रोफाइलद्वारे विद्यार्थिनीला ब्लॅकमेल

डिजिटल फसवणुकीच्या एका प्रकरणात, पवई पोलिसांनी एका अज्ञात सायबरस्टॉकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पवईस्थित ऑस्ट्रेलियात शिकणाऱ्या २३ वर्षीय मुलीला लक्ष्य करण्यासाठी तिच्याच आईच्या नावाने बनावट स्नॅपचॅट अकाउंट तयार केले होते. विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, स्टॉकरने तिचे फोटो आणि कुटुंबाच्या तपशीलांचा वापर करून स्नॅपचॅटवर एक बनावट प्रोफाइल तयार केले. विद्यार्थिनीला या खात्यावरून मैत्रीची विनंती (फ्रेंड रिक्वेस्ट) […]

Continue Reading 0
online dating

डेटिंग ऍप बनला सापळा; तरुणाचा नग्न व्हिडिओ बनवून उकळले २० हजार

पवई येथील एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा एक २३ वर्षीय तरुण डेटिंग ऍप, व्हिडिओ कॉल फसवणूकीला बळी पडला आहे. ४ ते ६ एप्रिल दरम्यान एका डेटिंग ऍपवर दिव्या नावाच्या मुलीशी संपर्क झाल्यावर व्हिडीओ कॉलदरम्यान त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ बनवून त्याला धमकावत त्याच्याकडून २०,००० रुपये भामट्यांनी उकळले आहेत. तरुणाचा खाजगी व्हिडिओ त्याच्या भावाला, […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

ऑनलाइन मैत्री करून एअर होस्टेस तरुणीची ६ लाखाची फसवणूक

व्यावसायिक असल्याचे सांगून ऑनलाईन मैत्री करून २६ वर्षीय एअर होस्टेस तरुणीला ६ लाखाचा गंडा घातल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. याबाबत तरुणीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिने आरोप केला आहे की, ऑनलाइन मैत्री करणाऱ्या एका व्यक्तीने तिची ६ लाख रुपयांची फसवणूक केली. तरुणीच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२४ […]

Continue Reading 0
matrimonial site cheat

Powai Police Nab Suspect in ₹3 Crore Sextortion Scandal

Three officers from Powai police took down a 37-year-old man from Himachal Pradesh involved in a ₹3 crore sextortion case. After tracking his movements between Punjab and Himachal Pradesh, and walking nearly 6 kilometers daily, they caught him four days into their pursuit. The man, Prabhjyot Singh, was accused of blackmailing a 51-year-old homemaker from […]

Continue Reading 0
online-cheating-2

गुगलची मदत घेणे पवईकराला पडले महागात, सायबर चोरट्यांनी घातला लाखोंचा गंडा

पवई येथील एका ६ वर्षीय व्यक्तीला आपल्या पुतण्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करायचे होते. यासाठी रुग्णालयाचा फोन नंबर गुगलवर सर्च करणे या पवई कराला चांगलेच महागात पडले आहे. डॉक्टरांना भेटायचे असल्यांस नोंदणी आवश्यक असल्याचे सांगत सायबर चोरट्याने कस्टमर सपोर्ट अँपची लिंक देत असल्याचा बहाणा करून सदर इसमाच्या मोबाईलचा ताबा घेत ४. ८८ लाखाची रक्कम लांबवली. पवई […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

निर्यातदार भासवून मासे विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला सुरतमधून अटक

आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा आणि पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. या भामट्याचे आणखी नऊ बळी शोधण्यात साकीनाका पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. मासे निर्यातदार असल्याचे भासवून मुंबई, महाराष्ट्रसह आंध्र प्रदेशातील अनेक मासळी विक्रेत्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथून एका ४१ वर्षीय व्यक्तीला साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल ४ […]

Continue Reading 0
Remarkable action of Powai Police, within a few hours, recovered online fraud amount

पवई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, काही तासातच परत मिळवली ऑनलाईन फसवणूकीची रक्कम

ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून, दिवसभरात कित्येक लोक या सायबर चोर आणि त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. या गुन्ह्यांचा तपास आणि रक्कम मिळवणे मोठे आव्हान असते. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून अनोळखी इसम फसवत असतो. मात्र पवई पोलिसांच्या सायबर टीमने नुकत्याच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची संपूर्ण मुंबईभर चर्चा असून, त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव […]

Continue Reading 0
INR notes cheating copy

आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक

सोशल मिडीयावर मैत्री करून आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली एका ३३ वर्षीय महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक केल्याचे नुकतेच पवईत उघडकीस आले आहे. फसवणूककर्त्याने परदेशी नागरिक असल्याची तोतयागिरी करून इंस्टाग्रामवर तिच्याशी मैत्री करत भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. गिफ्ट मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी आणि इतर विविध शुल्क म्हणून ४.१५ लाख रुपये फसवणूककर्त्याने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने उकळले. […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

बँकिंग डिटेल्स चोरून ९०३ कोटीच्या फसवणूकीत तैवानच्या नागरिकाला अटक

९०३ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या चु चुन-यू याला पोलिसांनी हैद्राबाद येथे अटक केली आहे. तैवानचा नागरिक असलेला चुन-यू हा पवई परिसरातील पंचतारांकित हॉटेलमधून फसवणुकीचे काम करत होता. चुन-यू याने येथे एक घर देखील भाड्याने घेतले होते, मात्र तो तेथे त्याच्या एजंटांशी कधीच भेटला नाही. त्याऐवजी हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत बैठका करत असे. तो कुरियरद्वारे खाते […]

Continue Reading 0
online cheating

एनएसजी कमांडोला कॅब बुकीच्या नावाखाली ६१ हजाराचा गंडा

आपल्या कुटुंबासह लोणावळ्याला सुट्टीवर जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडोला ६१ हजार रुपये ऑनलाइन फसवणुकीत गमवावे लागले आहेत. मूळचे उत्तर प्रदेशातील अलिगढचे असणारे सिंग पवई जवळील एनएसजी क्वार्टरमध्ये राहतात. त्यांनी पवई पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, काही दिवसांपूर्वी त्यांचे कुटुंब मुंबईत आले आहे. त्यामुळे कुटुंबासोबत मुंबई जवळील लोणावळा हिल स्टेशनला सुट्टी घालवण्याचा […]

Continue Reading 0
INR notes cheating copy

तरुणी ऑनलाईन फसवणुकीची शिकार; ६ हजारांच्या कर्जाच्या बदल्यात २२ हजारांची मागणी, अश्लील व्हिडिओही बनवला

इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या या जगात ऑनलाइन फसवणूक सामान्य झाली आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत ज्यामध्ये लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडतात. अशीच एक घटना साकीनाका परिसरात घडली आहे. येथे एका विद्यार्थ्याने ऑनलाईन लिंकवर क्लिक करून ६ हजारांचे कर्ज घेतले. यानंतर ठगांनी तिच्याकडून १० हजार आणि २२ हजार रुपयांची मागणी केली आणि मुलीने नकार […]

Continue Reading 0
mobile cyber crime

लोन अॅपच्या जाळ्यात अडकवून पवईकराला केले ब्लॅकमेल

एका खाजगी कंपनीत नोकरीला असणाऱ्या २८ वर्षीय पवईकराला लोन अॅपच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार याने घेतलेल्या ५,००० रुपयांच्या कर्जाच्या दुप्पट रक्कम ९,४६४ रुपये परत करूनही अधिक पैसे देण्यास सांगून त्याचा मॉर्फ केलेला फोटो त्याच्या मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टवरील शेकडो लोकांना प्रसारित करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल […]

Continue Reading 0
online-cheating-2

बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाला सायबर चोरट्यांचा २० हजारांचा गंडा

एका बॉलीवूड संगीत दिग्दर्शकाची २०,००० रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच पवईमध्ये घडली आहे. सायबर चोरट्यांनी पाठवलेल्या एका संदेशावर विश्वास ठेवून त्यातील लिंकवर क्लिक केल्याने संगीत दिग्दर्शकाला २० हजार रुपये गमवावे लागले आहेत. संदेशामध्ये पॅन कार्ड अपडेट न केल्यामुळे त्याचे बँक खाते निलंबित केले जाणार आहे, खाते निष्क्रिय करणे टाळण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्याचे […]

Continue Reading 0
mobile cyber crime

महिलेचा वीज बिल भरण्याचा प्रयत्न, २.३८ लाखांची फसवणूक

वीजबिल भरण्याच्या नावाखाली एका ६३ वर्षीय महिलेची २.३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच पवईत घडली आहे. वीज बिल भरण्यास सांगणारा संदेश पाठवत रिमोट ऍक्सेस ऍप्लिकेशन वापरून सायबर चोरट्यांने हा डाव साधला आहे. पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यानुसार, तक्रारदार महिला पवई येथे एकटीच राहत असून, व्यवसायाने वकील आहे. ती कामासाठी वांद्रे येथे जात असताना तिला तिचे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!