झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदी पडून एकाचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

पवईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी कंत्राटदाराने नेमलेल्या २५ वर्षीय कामगाराचा झाडाची फांदी तोडत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झाडावरील फांद्या तोडत असताना त्यातील एक फांदीखाली चिरडला गेल्याने ही घटना घडली. पवई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदविला आहे.

जसीन साकीर हाश्मी असे या व्यक्तीचे नाव आहे. आंबेडकर उद्यान येथे वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी कंत्राटदाराने हाश्मीला कामावर घेतले होते.

https://www.facebook.com/alinasalonpowaii

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी काही कामगारांना पवई तलावाजवळील आंबेडकर उद्यान येथे पावसाळ्यात वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी आणण्यात आले होते. हे काम चालू असताना, हाश्मी फांदी तोडत असताना एक वजनदार फांदी त्याच्यावर पडली. त्याला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेसंदर्भात पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला आहे. “मात्र हा अपघात कोणाच्या दुर्लक्षामुळे झाला याचा शोध सुरू आहे,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!