पवईतील एका प्रतिष्ठित शाळेच्या १० वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी त्याच शाळेच्या ३५ वर्षीय बस चालकाला अटक केली आहे. शाळेने याबाबत तक्रार दाखल करताच पवई पोलिसांनी कारवाई केली. मात्र पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी सुरुवातीला तिचा जवाब नोंदवण्यास विरोध दर्शवला होता. जानेवारी महिन्याच्या अखेरीस घटना घडली होती. आरोपी शालेय बसचा चालक असून, पीडित त्याच बसने […]
Author Archive | आवर्तन पवई
बहिणीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला विचारणा करणाऱ्या भावाला मारहाण; दोघांना अटक
१७ वर्षीय बहिणाची छेडछाड करणाऱ्या तरुणाला विचारणा करायला गेलेल्या २२ वर्षीय भावाला त्या तरुणासह ४ लोकांनी मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडली आहे. मारहाणीत आरोपींनी लोखंडी रॉडसह ब्लेडचा वापर केला असल्याचेही उघडकीस आले आहे. नदीम, दाबर, सिकंदर आणि प्रशांत असे मारहाण करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. पवई पोलिसांनी शुक्रवारी दोन […]
चोरीत मौल्यवान वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून गॅस सिलेंडर पळवले; दोघांना अटक
चोर चोरी करायला गेला मात्र घरात काहीच सापडले नसल्यामुळे काय चोरी करावे याचा प्रश्न पडलेल्या चोरट्याने चक्क घरातील २ गॅस सिलेंडर पळवून नेल्याची घटना पवईत घडली आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी माग काढत सादिक उर्फ अव्वा अक्काफी शेख (२३) आणि सलमान उर्फ दस्तगीर अस्लम खान (२८) याला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. पवईतील […]
पुढे खून झाला आहे सांगून पवईत वृद्ध दाम्पत्यास लुटले
पवईतील निटी भागात प्रार्थनेसाठी आलेल्या एका वृद्ध दाम्पत्यास पुढे खून झाल्याची बतावणी करून दोन ठगांनी तीन तोळे सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. पवई पोलिसांनी याबाबत फसवणुकीचा गुन्हा नोंद करून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीमुंबई येथे राहणारे बलराज नाडर (७१) तसेच त्यांच्या पत्नी व्हिक्टोरिया (६४) सोबत आपल्या पवई […]
पॉर्न साईटवर पूर्व प्रेमिकेचा अश्लील व्हिडीओ टाकणाऱ्या प्रेमीला अटक
दोघे पाठीमागील काही वर्षांपासूनच्या नातेसंबंधात होते. दोघे एकमेकांना व्हिडिओ कॉल करत. अशा एका व्हिडिओ कॉल दरम्यान आरोपी प्रेमीने सदर व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. आपल्या पूर्व प्रेमिकाचा अश्लील व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर पोस्ट करणाऱ्या इलेकट्रीकल इंजिनिअरला पवई पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमिकेशी ब्रेकअप नंतर तरुणाने पॉर्न वेबसाईटवर हा व्हिडीओ अपलोड केला होता. तरुणीच्या लक्षात येताच तिने पवई […]
चांदिवलीत मिनी अग्निशमन केंद्र सज्ज
चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसरात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी चांदिवली येथे नुकतेच मिनी अग्निशमन केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार परिसरात गेल्या काही वर्षात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या असतानाच यासाठी अग्निशमन दल मरोळ किंवा विक्रोळी भागातून पाचारण करण्यात येते. लेकहोमच्या घटनेमुळे तर संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले होते. अग्निशमन […]
हत्याराचा धाक दाखवून लुटण्याच्या गुन्ह्यात पवईत दोघांना अटक
धंदेवाले आणि नागरिक यांच्याकडून हत्याराचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. असिफ रियाज शेख (२४) आणि साहिल मेहबूब शेख (२६) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांची नावे असून, त्यांच्यावर अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची यापूर्वीही नोंद आहे. अटक दोन्ही आरोपी हे तुंगा गाव पवई येथील रहिवाशी आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
ऑनलाईन मैत्री करून फसवणूक करणाऱ्या ठगाला दिल्लीतून अटक
ऑनलाईन मैत्री करत चांदिवली येथील एका खाजगी बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या महिलेला विदेशातून आलेल्या महागड्या वस्तूवरील टॅक्स भरण्यासाठी पैशांची मागणी करून, फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी दिल्लीतून अटक केली आहे. सत्येंदर प्रताप सोवरन सिंह उर्फ मॅनसन रॉड्रिक्स (३३) असे अटक आरोपीचे नाव असून, एक महिला सहकारी नेहा माथूर आणि नायजेरिन […]
नशाखोरी रोखण्यासाठी रहेजाकर मैदानात
चांदिवली येथील रहेजा विहार भागात वाढत्या नशेखोरीला रोखण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे, रविवारी येथील रहिवाशांनी मैदानात उतरत धरणे आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. बाहेरील भागातून येणाऱ्या मुलांमुळे येथे नशाखोरी वाढत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी लेक साईड इमारत समोरील पालिका मैदानात मोठ्या प्रमाणात हजेरी लावत प्रशासना विरोधात हे धरणे आंदोलन केले. जवळपास […]
घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अटक
पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार रोड भागात घरात घुसून घरातील मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नुकतीच अटक केली आहे. दिपक उर्फ लीचू जगबीर सारसर (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या ३ गुन्ह्यांची उकल त्याच्या अटकेतून झाली आहे. पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार […]
पवईत गांजा विक्रेतीला अटक; २ किलो गांजासह २.३५ लाखाची रोकड जप्त
पवईतील मोरारजी नगर परिसरात राहणारी महिला तिच्या घरासमोर प्लास्टिक पिशवीतून संशयास्पद काहीतरी विक्री करत असताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तिच्या पिशवीची झडती घेतली असता तिच्याकडे एकूण २ किलो गांजा आढळून आला. तसेच तिच्याकडून २,३५,८३०/- रुपये रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे. अजगरी बेगम सैयद अली (६५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिच्या विरोधात […]
गुन्हेगारी रोखण्यासाठी पवई पोलिसांची पायी गस्त; जनसंपर्क
गुन्हेगारी, गैरकृत्य रोखण्यासाठी पोलिसांचा अनोखा प्रयोग @प्रमोद चव्हाण मुंबईची कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षित ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांना आपण विविध वाहनातून गस्त घालताना पाहिले आहे. मात्र यामुळे गुन्हेगार कदाचित दूर राहतीलही पण जनतेशी असणारा जनसंपर्क बनेलच असे नाही. म्हनूणच पवई पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि पवईकरांशी आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी पायी गस्त घालण्याचा निर्णय घेत आयआयटी भागातून याचा […]
ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या तरुणाची आत्महत्या
ऑनलाईन पोर्टलवर केलेल्या खरेदीमध्ये फसवणुक झाल्यामुळे सोळा वर्षीय एका तरुणाने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. ओम बली असे तरुणाचे नाव असून, कांजूरमार्ग येथे लोकलखाली उडी मारून त्याने आत्महत्या केली. दहा हजार चारशे रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीनंतर त्याने हे पाऊल उचलले. त्याच्या खिशातून सापडलेल्या चिठ्ठीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसानी […]
निर्वाणा पार्क आता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान
पवईतील सर्वांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या निर्वाणा पार्कचे आज (बुधवार, १६ जानेवारी) नामकरण करण्यात आले असून, आता हे उद्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, महानगरपालिका ‘एस’ उद्यान विभागाच्या म्हात्रे मॅडम आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी हा कार्यक्रम पार पडला. पवई म्हटले कि, पर्यटन प्रेमींच्या आकर्षणाचे […]
चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेटवणाऱ्या पतीला अटक
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून देणाऱ्या पतीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. शिवप्रसाद साहबलाल यादव असे आरोपी पतीचे नाव असून, नवविवाहित जोडपे पवईतील तुंगा गावात राहत होते. गंभीररित्या भाजल्याने उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला आहे. आरोपी पती सातत्याने हुंड्याची मागणी करीत असल्याचेही या घटनेनंतर समोर आले आहे. याबाबत पवई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तरप्रदेशचे […]
मुंबई श्रमिक कामगार संघटनेचे पवईत आंदोलन
सरकारच्या एकतर्फी आणि कामगार विरोधी धोरण आणि सुधारणा विरोधात मंगळवार पासून दोन दिवस केंद्रीय कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. या बंदला साथ म्हणून मुंबई श्रमिक संघटनेच्यावतीने आयआयटी मेन गेटजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी भांडूप विभागातून अनेक कामगार संघटनांनी यात सहभाग घेतला. असोसिएशनने सोमवारी संयुक्तपणे दिलेल्या वक्तव्यात बंदमध्ये देशभरातून २० दशलक्ष कर्मचारी सामील होणार असल्याचे सांगण्यात […]
धावत्या ट्रकला आग; पवई पोलिसांच्या सजगतेमुळे टळली मोठी दुर्घटना
आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आदी शंकराचार्य मार्गावर धावणाऱ्या एका ट्रकला आग लागल्याची घटना पवई परिसरात घडली. पवई पोलिसांच्या आयआयटी बिट चौकीत असणाऱ्या पोलिसांनी स्थानिक दुकानदारांसह धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओ डी सी ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच १० एडब्ल्यू ७३२७ ट्रक जोगेश्वरी येथून लाकडी खुर्च्या, टेबल, कॉम्पुटर, एअर […]
पवई धावली: हिरानंदानी – पवई रन २०१९
साकीनाका, तरुणाला मारहाण करून एटीएमबाहेर लुटले
शुक्रवारी साकीनाका येथे दोन अज्ञात इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. तरुण एटीएममधून पैसे काढून निघाल्यानंतर काही मिनिटांत ही घटना साकीनाका येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोमध्ये काम करणारा ऋषिकेश दास साकीनाका येथील एटीएममधून पैसे काढून जात असताना तेथेच उपस्थित असणाऱ्या इसमांनी त्याचा पाठलाग करत त्याला मारहाण करून त्याच्याजवळील रक्कम […]
टम – टम गेल्या, इलेक्ट्रीक बग्गीज आल्या
आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांच्या कॅम्पस भ्रमंतीसाठी १० इलेक्ट्रीक बग्गीज जानेवारी अखेर पासून होणार दाखल. व्यवस्थापनाने १७ मिनी बस सेवा ज्यांना टम-टम म्हणून ओळखले जात होते त्यांना बंद केल्याच्या काही महिन्यांनंतरच ई-बग्गीज सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन कॅम्पस पुढाकाराचे पुढील एक पाऊल म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी-बी) कॅम्पस परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी जानेवारीच्या अखेरीस १४-सीटर […]