Author Archive | आवर्तन पवई

matrimonial site cheat

विवाह जुळवणाऱ्या साइटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलेने २३ लाखाला गंडवले

पवईतील कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीशी विवाह जुळवणाऱ्या साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे मैत्री करून, वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैसे देण्याच्या प्रत्याशावर एका महिलेने २३.४४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय तक्रारदाराने गेल्या वर्षी लग्न जुळवणाऱ्या साईटवर एका महिलेच्या प्रोफाइला […]

Continue Reading 0
accident

पवईत दारूच्या बाटल्यांचा टेम्पो उलटला, लोकांनी पळवल्या बाटल्या

बुधवारी दुपारी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मिलिंदनगर सिग्नलजवळ विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स दुकानांमध्ये घेऊन जाणारा एक छोटा टेम्पो उलटल्याची दुर्घटना घडली. याचा फायदा घेत रस्त्यावरून प्रवास करणारे आणि स्थानिक नागरिक यांनी दारूच्या बाटल्या पळवल्या. बाटल्या फुटल्यामुळे रस्त्यावर काचेचा ढीग लागला होता, सोबतच रस्त्यावर ऑइल आणि दारू पसरल्यामुळे बराच काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. याबाबत […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या मास्टरमाईंडला बँगलोरमधून अटक

मेडिकल कॉलेजेसना ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घालणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्यासह साथीदाराला पवई पोलिसांनी बँगलोर येथून अटक केली आहे. श्याम हरिप्रसाद यादव उर्फ आर के सिंह (३६) राहणार ओशिवरा आणि त्याचा साथीदार आनंद चांगदेव आघाव (३२) राहणार पंचकुटीर,पवई अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अभिषेक सिंग याचा पोलीस शोध घेत असून, ऑगस्ट महिन्यात […]

Continue Reading 0
powai-thief-broken-car-windows-and-stolen-cash-and-valuables

पवईत चोरट्यांचा सुळसुळाट; गाड्यांच्या काचा फोडून ५ लाखांची चोरी

आयआयटी पवई येथील मॅरेथॉनवेळी १२ गाड्या फोडून चोरीच्या घडलेल्या गुन्ह्याचे काहीच धागेदोरे हाती लागले नसतानाच, पवईत पुन्हा गाडीच्या काचा फोडून ५ लाखांपेक्षा जास्तीच्या रक्कमेच्या चोरीचा गुन्हा घडला आहे. हिरानंदानीतील वेरोना फ़ाऊंटन येथे दोन तर नोरिटा बस स्टॉप येथे हे गुन्हे घडले आहेत. परिसरात मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पवई पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला आहे. पाठीमागील महिन्यात […]

Continue Reading 0
dipak kute1

विहार तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

आपल्या महाविद्यालयीन मित्रांसोबत विहार तलाव भागात फिरण्यासाठी गेलेल्या पवईतील एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. दिपक शिवाजी कुटे (१८) असे या तरुणाचे नाव असून, तो आयआयटी कॅम्पसमध्ये आपल्या परिवारासोबत राहत होता. याबाबत मुलुंड पोलिस अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत. गेल्या काही वर्षात पवई आणि आसपासच्या भागात असणारे तलाव […]

Continue Reading 0
water pipeline iit

पवईत पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी रस्त्यावर

@रविराज शिंदे पवईमधील आयआयटी कॅम्पसमधून जाणारी पालिकेची मोठी जलवाहिनी आज (मंगळवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फुटली. पालिका अधिकारी तिथे पोहचून काम सुरु होईपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते. आधीच मुंबईत पाण्याची कपात सुरु असताना अशी घटना मुंबईकरांच्या संतापाचे कारण ठरले. याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजताच्या दरम्यान आयआयटीच्या कॅम्पस भागातून जाणारी पालिकेची भलीमोठी […]

Continue Reading 0
oil jvlr2

जेव्हीएलआरवर प्रसादाच्या तेलावरून गाड्या घसरल्या

जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोड़वर (जेव्हीएलआर) आयआयटी मेनगेट, बाटा शोरूमजवळ पडलेल्या तेलावरून घसरून अनेक मोटारसायकल चालक जखमी झाल्याची घटना आज सकाळी पवई परिसरात घडली. वाहतूक पोलिसांनी मोटारसायकल चालकांसाठी मार्ग बदलून आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन माती टाकून दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ नंतर जेव्हीएलवरून जाणाऱ्या मोटारसायकल पैकी एक गाडी आयआयटी […]

Continue Reading 0
bus fire

चांदिवलीत उभी बस जळाली, वाहक किरकोळ जखमी

चांदिवली फार्म रोडवर बुमरँग इमारतीजवळ एक खाजगी बस जळाल्याची घटना आज सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये बसचा वाहक प्रकाश राजकरण (२२) आग विझवण्याच्या धडपडीत किरकोळ जखमी झाला आहे. येथील चांदिवली फार्म रोडवर बुमरँग इमारत आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या इमारतीत काम करणाऱ्या लोकांना घेऊन येणाऱ्या खाजगी बसेस पैकी काही बसेस येथेच रस्त्याच्या किनाऱ्याला उभ्या केल्या […]

Continue Reading 0
ganesh visarjan incident

पवई तलावात विसर्जना वेळी मुर्ती पडून दोन तरुण जखमी

काल अकराव्या दिवशी पवई तलावावर विसर्जन सुरु असताना क्रेनवरील मूर्तीचा तोल बिघडून पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाल्याची घटना पवईत घडली. सागर चांडालीया (३२) आणि रफिक शेख (२९) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुणांवर राजावाडी येथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पवई तलावावरील […]

Continue Reading 0
hatya

दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा दगडाने ठेचून खून, आरोपीला अटक

दारू पिताना दोघांच्यात झालेल्या किरकोळ वादात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. गणेश प्रधान (२८) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, शनिवारी पवई पोलिसांनी त्याचा मित्र संदेश धिंग्रा याला गुन्ह्यात अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!