@रविराज शिंदे एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच मुंबईच्या तापमानाच्या पाऱ्याने अनेकदा ४० अंशाचा आकडा ओलांडला आहे. वाढत्या पारयामुळे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना हैराण करून सोडले आहे. कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाल्यावर रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेकांना याचा खूप त्रास होत आहे. चक्कर येणे किंवा थकवा जाणवण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत. त्यातच पवईतील अनेक बस स्थानकांवर […]
Author Archive | आवर्तन पवई
“राष्ट्र संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान” अंतर्गत पवई तलाव समितीने केली तलावाची साफसफाई
मुंबईतील पर्यटनाचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या आणि मुंबईकरांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या पवई तलावावर “राष्ट्र संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत ‘पवई तलाव समिती’च्यावतीने रविवारी साफसफाईचे काम करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पवईकरांनी यात सहभाग नोंदवला. पाठीमागील काही वर्षात पवई तलाव भागात वाढणाऱ्या लोकसंख्यामुळे अतिक्रमण निर्माण झाले आहे. सोबतच परिसरात असणाऱ्या रहिवाशी आणि औद्योगिक वसाहतीतील घाण पाणी सुद्धा […]
पवईतील ‘तो’ लोखंडी बीम रॉड अखेर पडला; सुदैवाने जीवितहानी नाही
@अविनाश हजारे गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असलेला व केव्हाही कोसळेल या अवस्थेत असलेला पवईतील पासपोली कडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी बीम रॉड अखेर पडला असून, त्यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही मात्र या प्रकाराने प्रशासन लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती उदासीन आहे हे या निमित्ताने पहायला मिळत आहे. एस विभाग अंतर्गत येत असलेल्या पवई येथील एल अँड […]
पवईत रिक्षा पलटी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
रविराज शिंदे, रमेश कांबळे पवई आयआयटी मेनगेट येथे गाडीवरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन २० वर्षीय रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल गुरूवारी मध्यरात्री घडली. अंकुश सोनावणे असे या रिक्षा चालकाचे नावअसून, तो पवईतील गरिबनगर येथे परिवारासोबत राहत होता. अंकुश हा नियमितरित्या रात्रपाळीत रिक्षा चालवण्याचे काम करत असे. गुरुवारी रात्री नेहमी प्रमाणे तो रात्रपाळीवर आपली […]
संपत्तीच्या वादातून पुतण्याने केला काकीचा खून
पवईतील फिल्टरपाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाने संपत्तीच्या वादातून आपल्याच काकीचा खून केल्याची घटना पवईत मंगळवारी घडली. यानंतर तरुणाने स्वतःवर घाव करून घेत पवई पोलीस ठाणेत हजर झाला. रईसा शेख (४५) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून, तिचा पुतण्या तौसीफ शेख (२६) याला पवई पोलिसांनी उपचारानंतर अटक केली आहे. “मंगळवारी सकाळी रईसा आणि तौसीफ यांच्यात संपत्तीच्या […]
मेट्रो प्रकल्पामुळे पवई तलावाचे ‘मगर उद्यान’ लांबणीवर
मुंबईतील पवई तलावाच्या परिसरात महापालिकेतर्फे बनवण्यात येणारे ‘मगर उद्यान’ मेट्रो प्रकल्पाच्या नियोजनामुळे तूर्तास लांबणीवर पडले आहे. पवई तलावाजवळून मेट्रोचा ट्रॅक जाणार असल्याने प्रस्तावित मगरीचे उद्यान तूर्तास लांबणीवर टाकण्यात आले आहे. या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदांना सुद्धा पालिकेने स्थगिती दिली आहे. पवई तलावात गेल्या काही वर्षात प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. आसपासच्या निवासी संकुलांमधील घाण सांडपाणी […]
एनटीपीसीजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू
पवईतील जेव्हीएलआरवर (आदी शंकराचार्य मार्ग) एनटीपीसी सिग्नलवर एक भीषण अपघात होऊन, एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना काल (सोमवार) दुपारी घडली. रामसंजीवन राजकुमार जैस्वाल (२६) असे या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी मुंबईतील शिवाजीनगर भागात राहणारा जैस्वाल आपल्या अजून एक मित्रासोबत कामानिमित्त मोटारसायकलवरून जोगेश्वरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी पाण्याच्या टॅंकरखाली आल्याने हा […]
पवई तलावात मासेमारीला विरोध केल्याने सुरक्षारक्षकावर हल्ला
पवई तलावात मासेमारी करण्यास विरोध दर्शवल्याने पवई येथील महाराष्ट्र स्टेट अँग्लिग असोसिएशनच्या पर्यवेक्षकासह सुरक्षारक्षकाला काही अज्ञात इसमांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. मध्यरात्री काही इसमांनी काठ्या घेवून क्लबच्या कार्यालयात घुसून हा हल्ला चढवला. यासंदर्भात पवई पोलिसांनी ७ जणांविरोधात भादवि कलम ३२४, ५०६, १४३, १४७, १४९ नुसार गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. […]
पवईत सशस्त्र जबरी चोरी, १४.५ लाखांची लूट
पवईतील तुंगागाव, एल-अँड-टी गेट क्रमांक ५ समोरील परिसरात असणाऱ्या जुहूर पॅलेस इमारतीत घुसून दोन अज्ञात चोरट्यांनी शाळा ट्रस्टीच्या घरातून १३ लाखाची रोकड आणि ६ तोळे दागिने असा ऐवज शस्त्राच्या धाकावर लुटून नेल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत पवई पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून सिसिटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरु केला आहे. पवईतील जुहूर पॅलेस इमारतीत […]
जुन्या नोटांसह पवईत व्यावसायिकाला अटक
भारतीय चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या ९९.६५ लाख रुपयांच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्या एका व्यावसायिकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. केशव मनोहर कोरगावकर असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. रक्कम बदलून घेण्यासाठी पवईमध्ये आला असताना पवई पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. नोटबंदीनंतर पैसे बदलून घेण्याचा काळ संपला असून, आजही या १६ ते […]
तरुणीला अॅसिड हल्ल्याची धमकी देवून सतावणाऱ्याला पवईत अटक
विवाहाच्या मागणीला नकार दिला म्हणून एका सव्वीस वर्षीय तरुणीला अॅसिड हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पवई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. विनायक गवळी (२८) असे या तरुणाचे नाव असून, तो बेरोजगार आहे. एका मित्राच्या ऑक्टोबर २०१६ मधील वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरोपी आणि तक्रारदार तरुणीची भेट झाली होती. ज्यानंतर दोघांच्यात मैत्री झाली होती. अधून मधून दोघांच्यात भेटी […]
छळवणूकीला कंटाळून महिलेचा मुलांसह विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न
आयआयटी, गरीबनगर येथे राहणाऱ्या एका महिलेने स्वतःसह आपल्या दोन मुलांना विष देवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री पवईमध्ये घडली आहे. तिघांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रेचाळीस वर्षीय गीता वाघमारे (बदलेले नाव) पवईतील […]
सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसास तरुणांकडून मारहाण
पवई, हिरानंदानी येथील हेरीटेज उद्यान येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बसलेल्या तरुणांना तिथे दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पोलीस हवालदाराला काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली.जवाहरलाल राठोड असे या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते पवई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून ४ तरुणांना अटक केली असून, अजून दोन तरुणांचा शोध […]
चैतन्यनगरमध्ये पाण्याच्या पाईप बदलण्याच्या, गटार सफाईच्या कामाला सुरुवात
मुंबईत उन्हाच्या झळा वाढू लागलेल्या असतानाच, आता काही महिन्यांवर पावसाला ऋतू येवून ठेपल्याने नगरसेवक निधीतून चैतन्यनगर भागात नवीन ४ इंची पाईपलाईन टाकण्याचे तसेच गटारात असणाऱ्या पाण्याच्या पाईप बाहेर काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासोबतच गटार साफ करण्याचे काम सुद्धा सुरु झाले आहे. पावसाला सुरु झाला की गटारांची साफ सफाईचे काम करण्यात आले नसल्याने अनेक […]
बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध
सदर इसम नामक निपेंद्र महोन्तो (अंदाजे वय ४०) अशोक टॉवर मरोळ येथे आजारी अवस्थेत मिळून आला होता. याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २६ मार्च रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक आजारी इसम मरोळमधील पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या अशोक टॉवर, मारवाह […]
पवईकरांच्या साथीने प्राणी मित्रांनी वाचवले घार, कोब्रा व धामणीचे प्राण
@सुषमा चव्हाण पाठीमागील आठवड्यात चांदिवली म्हाडा कॉलनी येथे उष्माघाताने जखमी पडलेली घार आणि पवई विसर्जन घाटावर विसाव्याच्या शोधात रस्त्यांवर आलेल्या कोब्रा व धामणीचे प्राण पवईकरांच्या मदतीने प्राणी मित्रांनी वाचवले. अम्मा केअर फाऊंडेशन (ACF) आणि प्राणी मित्र संघटना पॉज मुंबई (PAWS) यांनी बचाव करून निसर्गाच्या सानिध्यात त्यांना परत सोडले आहे. चांदिवली म्हाडा कॉलनी येथील रहिवासी राहूल […]
हिरानंदानीत फुटपाथवर येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी लागणार बुलेट बॅरिअर
हिरानंदानी भागात फुटपाथवर चढून येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी ८ ठिकाणी बुलेट बॅरिअर बसवण्यात येणार आहेत. नगरसेवक फंडातून पालिकेतर्फे हे काम केले जाणार आहे. रविवारी या कामाच्या सुरुवातीचा नारळ नगरसेवक (१२२) वैशाली पाटील, स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, अभिनेता मुकेश रिशी आणि हिरानंदानी नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. पवईतील हिरानंदानी भागात मोठे, सुटसुटीत आणि वाहतूक कोंडी रहित रस्त्यांमुळे महाविद्यालयात […]
पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत
३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो […]
पोलिस शिपायाने कर्तव्यावर असताना रक्तदान करुन जपली सामाजिक बांधिलकी
प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे एका रुग्णाला रक्ताची गरज आहे आणि तो रक्तगट आपलाही आहे, हे समजताच पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस शिपाई गणेश कट्टे यांनी रुग्णालयात जावून रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपत एक उदाहरण जगासमोर निर्माण केले आहे. आयआयटी पवई येथील झुरी कंपाऊंड भागात राहणारे निलेश नागे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या […]
घरकामास नकार दिल्याने महिलेला मारहाण करणाऱ्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रामबाग म्हाडा, पवई लेकहाईटस इमारतीत घरकाम करणाऱ्या एका महिलेला, घरकामास येण्यास नकार दिला म्हणून मारहाण करणाऱ्या बक्षी याला पवई पोलिसांनी अखेर आज अटक केली. वॉलेंटीनो राफेल कॅन अहमद बक्षी (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाईल. रामबाग येथील पवई लेकहाईटस इमारतीत राहणाऱ्या बक्षी नामक एका इसमाने त्याच इमारतीत […]