संघर्षनगर इमारत क्रमांक ९ जवळ आज संध्याकाळी जमीन आणि रस्ता धसून बराचसा भाग बाजूलाच सुरु असणाऱ्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडला. बांधकाम बंद असल्याने जिवित हानी टळली आहे. अग्निशमन दल आणि साकीनाका पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून परिसरातील वाहतूक आणि वर्दळ यावर बंदी घालत सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. घटनास्थळा शेजारच्या इमारतींना असणारा धोका पाहता इमारत क्रमांक […]
Author Archive | आवर्तन पवई
पवईतील ज्वेलरचे अपहरण करणाऱ्या ७ जणांना क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या
पवईतील ज्वेलर जितेश परमार व दुकानातील कामगार प्रकाश सिंग यांचे मिलिंदनगर येथून अपहरण करून त्यांना मारहाण करून १.८० लाखाची लुट करून ठाण्यात सोडून पसार झालेल्या ७ अपहरणकर्त्यांना अखेर काल क्राईम ब्रांच युनिट ११ ने अटक केली आहे. अन्वर सय्यद (२६), युनुस सय्यद उर्फ शेरू (२१), रेहान शेख (३६), निझाम मकरानी (२०), समीर शेख (२८), तबरेज […]
पवई इंग्लिश हायस्कूलने साजरा केला ‘योगा डे’
योगामुळे विद्यार्थ्यांचे मन स्वस्थ व तणावमुक्त राहल्याने त्याचा लाभ त्यांना अभ्यासात होत असल्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देत शाळेत बुधवारी जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या निवेदिता यांनी यावेळी विद्यार्थ्यांना तणावमुक्त करणाऱ्या योगाचे मार्गदर्शन केले. पहाटे आईच्या कुशीतून उठून आलेल्या पूर्व-प्राथमिकच्या चिमुकल्यांसह समजदारीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माध्यमिकच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी या शालेय उपक्रमात आपला सहभाग […]
मनसे उपाध्यक्ष उदय सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) महाराष्ट्र उपाध्यक्ष उदय सावंत यांचे आज मीरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. टागोरनगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. साईश्रद्धा अपार्टमेंट, गोदरेज हॉल समोर, विक्रोळी पूर्व येथून आज संध्याकाळी त्यांची अंतयात्रा निघणार असून, टागोरनगर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, […]
पवईत व्यापाऱ्याचे अपहरण; हत्यारांच्या धाकात लुटमार करून आरोपी पसार
पवईतील मिलिंदनगर येथील एक सोनार व त्याच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, पैसे आणि मोबाईल काढून घेत त्यांना बांधून मारहाण करून ठाणे येथे सोडून अपहरणकर्ते पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत पोलिसांनी अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. पवईतील चैतन्यनगर आयआयटी येथे राहणारे जितेश परमार यांचे मिलिंदनगर येथे […]
विजय विहार रोडला उजाळी; आमदार फंडातून रोड दुरुस्तीचे काम
पवई येथील विजय विहार रोड जो गेली ७ वर्षापासून खितपत पडला होता त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच सुरु झाले आहे. आमदार आरिफ नसिम खान यांच्या फंडातून रोड दुरुस्तीचे काम केले जात असून, पावसाळ्यापूर्वी रोडचे काम पूर्ण होणार असल्याचे याच्या ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे. पवई विहार आणि लेक होम या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी हिरानंदानी व जेव्हीएलआरकडून जलवायू […]
शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे पवईत सरकार विरोधात निदर्शने
– अविनाश हजारे – ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी वणवा पेटला असतानाच, त्याची ठिणगी शहरी भागातही येऊन पोहोचली आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे येत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय व अन्य समविचारी संघटनेंच्यावतीने बुधवारी ७ जूनला पवईमध्ये सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इतिहासात पाहिल्यांदाच शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत […]
आयआयटी बॉम्बे नव्हे मुंबईच; मनसेचे आयआयटी प्रशासनाला पत्र
आयआयटी बॉम्बेचा उल्लेख आयआयटी मुंबई असा करणे चुकीचे आहे अशी नाराजी व्यक्त करत गुरुवारी प्रसारमाध्यमांना आयआयटी प्रशासनाने बॉम्बे असा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. आयआयटी प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवत सोमवारी मनसेचे विक्रोळी विधानसभा विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम, अशोक जाधव व शाखा अध्यक्ष (१२२) शैलेश वानखेडे, […]
हनुमान रोडचे मारुती मंदिर वाचवण्यासाठी शिवसेना सरसावली
[ditty_news_ticker id=”2224″] हनुमान रोड आयआयटी मार्केट पवई येथे असणाऱ्या मारुती मंदिराला सुद्धा पालिकेने पाडण्याची नोटीस दिली आहे. हे मंदिर कोणालाही अडथळा बनणारे नाही, केवळ कोण्या एका विकासकाच्या फायद्यासाठी आम्ही याला पाडू देणार नाही, असा पवित्रा घेत शिवसेना आता याच्या बचावासाठी पुढे आली आहे. स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी गुरुवारी संध्याकाळी मंदिराला भेट देवून मंदिर वाचवण्यासाठी […]
रहेजा विहारच्या घरकाम करणाऱ्या महिलांचे कामबंद आंदोलन तात्पुरते मागे
चांदिवली, रहेजा विहार येथील रहेजा विस्टा सोसायटीने घरकाम करणाऱ्या महिलांसाठी नवीन दरपत्रक काढत सरसकट सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याच्या घातलेल्या घाटाच्या विरोधात येथील घरकाम करणाऱ्या महिलांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ज्याबाबत काल मनसे विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी दोन्ही पक्षांना समजावत आंदोलन पाठीमागे घेतले आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी योग्य मोबदला नाही दिला गेल्यास पुन्हा […]
पवईच्या पावसाळापूर्व कामांची आमदारांनी केली पाहणी
स्थानिक आमदार व पवईचे लाडके नेते आरिफ नसीम खान यांनी आज पवई परिसराला भेट देवून पावसाळा पूर्व कामांची पाहणी केली. यावेळी पवईतील नागरिकांना भेटून त्यांनी परिसरातील समस्यांही जाणून घेतल्या. यावेळी पालिका अधिकारी, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, वाहतूक विभाग अधिकारी, मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पवईकर उपस्थित होते. पावसाळा आता काही दिवसांवरच येवून ठेपलेला आहे. गेल्या दहा […]
पवईत खाजगी बसचा अपघात, १ ठार १७ जखमी
रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण मालाड येथून मुंब्रा येथे लग्नाच्या रिसेप्शनला जाणाऱ्या एक खाजगी बसचा ट्रिनीटी चर्चजवळ भीषण अपघात झाल्याची घटना काल दुपारी पवईमध्ये घडली. या घटनेत बसमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत. ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पार्कसाईट पोलिसांनी यावेळी बोलताना दिली. यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळावरून पसार झालेल्या बसचालका विरोधात […]
कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती; पवईकरांचा मिठाई वाटून, फटाके फोडून जल्लोष
भारतीय गुप्तहेर असल्याचा दावा करून पवईकर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचे वस्त्रहरण करत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष रॉनी अब्राहम यांच्या अध्यक्षतेखालील ११ न्यायाधीशांच्या पिठाने अंतिम निर्णय येईपर्यंत कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली. या आनंददायी बातमीनंतर कुलभूषण यांच्या हिरानंदानी येथील घरासमोर जमा झालेल्या पवईकरांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून […]
कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकचा बुरखा फाटला
पाकिस्तानने कथित ‘रॉ’चे एजंट म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव हे एक व्यावसायिक असून, भारताला खबर न देता नागरिकाला अटक करणे, त्याला फाशीची शिक्षा देणे हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे. जाधव यांच्याकडून जबरदस्ती आरोप कबुली केली असल्याचा आरोप करत भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपला दमदार पक्ष ठेवत पाकिस्तानचे सगळे पितळ उघडे पाडले आहे. गेल्या महिन्यात मिलिटरी कोर्टाचा […]
पवईत धावत्या बसने एकाला चिरडले
बस थांब्यावर बसची वाट बघत उभ्या असणाऱ्यापैकी एकाला चिरडून बस निघून गेल्याची घटना सोमवारी सकाळी पवईतील रामबाग येथे घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सदर बसचा तपास सुरु केला आहे. चांदिवली येथील संघर्षनगर परिसरात राहणारे शुभम शंकर वाघ (२९) हे सकाळी अंधेरी सिप्झ येथे आपल्या कामाच्या ठिकाणी निघाले होते. तिकडे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी सकाळी […]
आयआयटी येथील मारुती मंदिरावर कारवाईची टांगती तलवार
आयआयटी येथील मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्तगणांनी आंदोलन, सह्याची मोहीम, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असे सर्वोतोपरी खटाटोप करूनही मारुती मंदिराच्या निष्काशनाची टांगती तलवार अजूनही लटकत आहे. गेल्या आठवड्यात पालिकेतर्फे या मंदिराला हटण्यासाठीची दुसरी नोटीस मंदिर मालकांना देण्यात आली आहे. आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) गेल्या ९२ वर्षापासून उभ्या असणाऱ्या मारुती (हनुमान) मंदिराला पिटीशन फॉर लिव्ह टू […]
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
पवईत एका १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या व गर्भपात करण्यास दबाव टाकणाऱ्या दोघा भावांना पवई पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. अजय बनसोडे व बालभिम बनसोडे असे अटक तरुणांची नावे आहेत. अजयवर बलात्काराचा तर त्याचा भाऊ बालभिमवर गर्भपातास प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. अजय व पिडीत तरुणी हे पवईतील एकाच परिसरात राहतात. त्यांचे गेल्या […]
गटारात पडलेला फोन काढायला गेलेल्या दोघांचा मृत्यू
गटार सफाईवेळी आतमध्ये पडलेला मोबाईल काढायला गेलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साकीनाका परिसरात घडली. पवईतील तुंगा गावात राहणारा सचिन सुरेश पवार (२३), कुर्ला येथे राहणारा अजय उर्फ श्रीनिवास भगत कुंचीकरवे (२१) अशी या तरुणांची नावे आहेत. अजय आणि सचिन हे पालिकेच्या सफाई विभागात कंत्राटवर सफाई कामगार म्हणून काम करतात. याव्यतिरिक्त फावल्या […]
पवईत कारचालक महिलेची नाकाबंदीमध्ये पोलिसांना धक्का बुक्की
पवई, हिरांनंदानी येथे नाकाबंदी सुरु असताना ‘नो एन्ट्री’मधून आलेली कार थांबवून, नियम मोडल्याबाबत दंड भरण्याची मागणी करणाऱ्या पवई पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपायाला कारचालक महिलेने धक्काबुक्की करून पळ काढल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेचा शोध सुरु केला आहे. पवई पोलिसांच्यावतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करून पवईमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्या सोबतच गुन्हेगारी […]
संविधान किंवा आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मी सोडणार नाही – रामदास आठवले
@रविराज शिंदे भाजप सरकार बाबासाहेबांनी लिहलेलं संविधान आणि मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण नष्ट करण्याच्या तयारीत आहे अशी अफवा काहीजण पसरवत आहेत. मात्र हे सत्य नसून, भाजप सरकार विरोधात खोट्यानाट्या अफवा पसरवून आंबेडकरी चळवळीतील लोकांना भडकविण्याचे कारस्थान सुरू आहे. मात्र, जर कोणी संविधान किंवा आरक्षणाला नष्ट करण्याचा प्रयत्न जरी केला तर मी त्यांना सोडणार नाही. असा इशाराच […]