Author Archive | pracha2005
कविता: शाळा मराठी भाषेची
– प्रतिक कांबळे – पवई – ९७०२२०६३७२
हिरानंदानीत ‘बॉंब’ बोंब; निघाले तापमान मोजणारे उपकरण
काल (सोमवार) दुपारी पवईतील हिरानंदानी शाळेच्या बाजूला कोणीतरी अज्ञात इसमाने बॉंब ठेवला असल्याची बोंबा बोंब झाल्याने पालकांसह संपूर्ण पवई या बातमीने हादरून गेली. पालकांनी धावपळ करत आपल्या मुलांना ताब्यात घेण्यासाठी सरळ शाळा गाठली. मात्र, पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर रिकामा करून बंद करत सुरक्षित केल्याने पालकांची चांगलीच धांदल उडाली. अखेर दोन तासानंतर पोहचलेल्या बॉंब स्कोडने दिसणारी […]
स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून २४ लाखाची फसवणूक
जोगेश्वरीमध्ये एसआरएअंतर्गत स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून २४ लाख रुपयांना ठगणाऱ्या एका भामट्याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. शिवलिंग कोळे असे या अटक आरोपीचे नाव असून, त्याला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारदार मोहमद आमीर हे आपल्या परिवारासोबत साकीनाका परिसरात राहतात. मुंबईत हायवेजवळ एखादे स्वस्तातील घर मिळावे म्हणून ते आणि […]
हिरानंदानीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेची दुसऱ्यांदा कारवाई
काही दिवसांपूर्वीच कारवाई केल्यानंतर सुद्धा पुन्हा उभे राहिलेल्या हिरानंदानीतील मार्केटवर मंगळवारी परत एकदा महानगरपालिका ‘एस’ विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात हिरानंदानीतील सायप्रेस, डैफोडिल मार्केटमधील फुटपाथवर थाटण्यात आलेल्या दुकान व अनधिकृत बांधकामांसह, पवई प्लाझा भागात रस्त्यावर उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या गाड्यांवर सुद्धा पालिकेने कारवाई करत या भागातील अनधिकृत व्यवसायाला दणका दिला आहे. एकेकाळी मोकळ्या […]
घाटकोपर-हिरानंदानी जोडरस्त्याची गणेशोत्सवापूर्वी डागडूजी
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला घाटकोपर-हिरानंदानी जोडरस्त्यावरील खड्यांना भरण्याचे काम या गणेश उत्सवापूर्वी करून, पवईकरांचा गणेशोत्सव तरी खड्डेमुक्त करण्याचे काम यावेळी पालिका एस विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी हाती घेतले आहे. याबाबत आवर्तन पवईकडून होत असलेल्या पाठपुराव्याला उत्तर देताना त्यांनी घाटकोपर-हिरानंदानी जोडरस्त्याचे काम सुरु करत असल्याबाबत एसएमएस करून कळवले आहे. पवई परिसरात अनेक कंपन्यांनी आपली प्रमुख […]
आमच्या सिंघमला फसवले आहे, खाटपेंच्या समर्थनात स्थानिक जनता रस्त्यावर, मूक मोर्चा आणि सह्यांची मोहीम
साकिनाका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील खाटपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सूर्यवंशी आणि पोलिस शिपाई योगेश पोंडे सह एकूण आठ जणांना मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी गुन्हे शाखेने एका मॉडेलवर बलात्कार आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मात्र ह्या प्रकरणात स्थानिकांचे वेगळेच मत आहे. हे सर्व कट-कारस्थान आहे, कोणीतरी त्यांना ह्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आहे, […]
तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या, अडी-अडचणी, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच ‘आवर्तन पवई’.
मला इंग्रजी उत्तम येते परंतू मी विचार मराठीत करतो. मला इंग्रजी येत नाही परंतू मला भरपूर काही बोलायचे आहे. मला माझ्या शब्दात माझ्या भाषेत बोलायला देणार माध्यमच नाहीये. अश्या सर्वांसाठी त्यांचे सर्वांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ‘आवर्तन पवई’. तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या, अडी-अडचणी, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच ‘आवर्तन […]