आर्थिक राजधानी असणारी मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर आली आहे. मात्र सध्याच्या कोरोना महामारीचे संकट पाहता अनेकांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था अन्नधान्य तसेच जेवण वाटप करून त्यांना मदतीचा हात देत आहेत. हिच परंपरा पुढे घेवून जात पवईकराने आपला वाढदिवस या गरीब गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करत त्यांच्यात आनंद वाटला.
पवईकर मोहित नवनाथ मोरे या तरुणाने आपला वाढदिवस वसईच्या कुष्ठरोग्यांच्या आश्रमात तसेच जुहू, गोरेगाव, सांताक्रूझ, सिप्झ, अंधेरी, विलेपार्ले येथील गरीब गरजू आणि अनाथ बेघर मुलांसोबत साजरा केला.
विविध भागात जावून तेथील मुलांना बिस्कीट, चॉकलेट देण्यासोबतच केक कापून त्यांच्यासोबत आनंद साजरा केला. तसेच वसई येथील कुष्ठरोग्यांच्या आश्रमात जावून तिथे त्यांना चादर वाटून त्यांच्या सोबत आपला हा आनंद साजरा केला.
“महाविद्यालयीन जीवनात एनएसएसमध्ये असल्यापासून सामाजिक कार्यात रस निर्माण झाला होता. या लोकांसोबत असताना यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद मला समाधान देवून जातो. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या परीने सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. पाठीमागील ७ वर्षापासून मी आपला वाढदिवस या अनाथ मुले, वृद्धाश्रमातील लोक यांच्यासोबत साजरा करतो.” असे याबाबत बोलताना मोहित याने सांगितले.
No comments yet.