पवई तलावाजवळ एक पन्नास वर्षीय पुरुषाचा मृतदेह बुधवारी सकाळी पवई पोलिसांना सापडला आहे. राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता नैसर्गिक रित्या मृत्यू झाले असल्याचे समोर येत आहे. विलास परशुराम आंब्रे (५०), राहणार मुलुंड असे मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पवईकरांना एक मध्यम वयाचा पुरुष पवई तलावाजवळ निश्चल पडलेला आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला राजावाडी रुग्णालय येथे दाखल केले असता, दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
‘प्रथमदर्शनी नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होत आहे. आम्ही अपमृत्यू नोंद करून तपास सुरु केला आहे. त्याच्या परिवार आणि नातेवाईकांचा जवाब घेण्यात येत आहे’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.