तुमच्या गाडीतून धूर निघत आहे असे सांगून, गाडी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने अनेक मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या बनावट मॅकेनिकच्या पवई पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात काल मुसक्या आवळल्या. झाहिद नुर मोहमद शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोवंडी येथील रफिकनगर भागातून त्याला अटक करण्यात आली. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर टकटक गँग सोबतच, तुमच्या गाडीतून धूर निघत […]
Archive | Crime
बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध
सदर बेवारस पुरुष मन्नुभाई खदान येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला आहे. त्याला राजावाडी रुग्णालयात नेले असता, दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आले असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ०५ जून रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक इसम बेशुद्धावस्थेत पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या डीपी रोड ९ जवळील मन्नुभाई […]
हिरानंदानी कमांडोंनी पकडले दोन लॅपटॉप चोरांना
मुंबईतील विविध भागात गाड्यांमध्ये असलेले लॅपटॉप आणि किंमती वस्तू गाड्यांच्या काचा फोडून लांबवणाऱ्या टोळीतील दोघांना हिरानंदानी येथे चोरी करताना एसटीएफ कमांडोनी पकडून पवई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वासिम सय्यद (४८) आणि अन्वर शेख (४५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून, ते दोघेही मालाड परिसरात राहतात. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्रमांक एमएच ०२ एसी ४६२७ […]
पवईत दोन मोबाईल चोरांना अटक
पवईतील हिरानंदानी भागात हातातील मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना पवई पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी अटक केली. चोरीच्या मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. मोहमद कैफ मोहमद शोएब खान (२७), निखील संदीप बोढारे (२१) अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजीव रामकेवल प्रजापती […]
डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना पवईत अटक
भारतीय चलनाच्या बदल्यात अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना पवई पोलिसांनी काल अटक केली आहे. @प्रमोद चव्हाण माझ्याकडे खूप सारे डॉलर आहेत, मात्र मला त्याबदल्यात थोडे पैसे द्या, ते मी तुम्हाला देतो असे सांगून मुंबईकरांना टोप्या घालणाऱ्या टोळीतील दोघांना पवई पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. तीन लाखाचा गंडा घालून पशार होत असताना त्यांना […]
विनयभंगाच्या गुन्ह्यात कॅब चालकाला अटक
पवईतील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असताना, बँकर असणाऱ्या तरुणीशी अॅप बेस्ड कॅब चालकाने तिचा विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर पवई पोलिसांनी त्या कॅब चालकाला अटक केली आहे. सुरेश कुमार यादव (३६) असे अटक करण्यात आलेल्या कॅब चालकाचे नाव आहे. एका २५ वर्षीय तरुणीने सोमवारी संध्याकाळी ५ वाजता नरिमन पॉईंट येथून आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी एक अॅप सेवेतील […]
क्रुझ जहाजावर नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक
क्रुझ जहाजावर नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांना फसवणाऱ्या भामट्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ३५ हजार ते एक लाख रुपये घेवून या भामट्याने अनेक तरुणांना गंडा घातला असून, पवई पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरार येथील गोकुळ टाऊनशिप येथे राहणारा अमित मोडक (अंदाजे वय ३५) याने हॉटेल […]
पवईत रिक्षा पलटी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
रविराज शिंदे, रमेश कांबळे पवई आयआयटी मेनगेट येथे गाडीवरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन २० वर्षीय रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल गुरूवारी मध्यरात्री घडली. अंकुश सोनावणे असे या रिक्षा चालकाचे नावअसून, तो पवईतील गरिबनगर येथे परिवारासोबत राहत होता. अंकुश हा नियमितरित्या रात्रपाळीत रिक्षा चालवण्याचे काम करत असे. गुरुवारी रात्री नेहमी प्रमाणे तो रात्रपाळीवर आपली […]
संपत्तीच्या वादातून पुतण्याने केला काकीचा खून
पवईतील फिल्टरपाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाने संपत्तीच्या वादातून आपल्याच काकीचा खून केल्याची घटना पवईत मंगळवारी घडली. यानंतर तरुणाने स्वतःवर घाव करून घेत पवई पोलीस ठाणेत हजर झाला. रईसा शेख (४५) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून, तिचा पुतण्या तौसीफ शेख (२६) याला पवई पोलिसांनी उपचारानंतर अटक केली आहे. “मंगळवारी सकाळी रईसा आणि तौसीफ यांच्यात संपत्तीच्या […]
एनटीपीसीजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू
पवईतील जेव्हीएलआरवर (आदी शंकराचार्य मार्ग) एनटीपीसी सिग्नलवर एक भीषण अपघात होऊन, एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना काल (सोमवार) दुपारी घडली. रामसंजीवन राजकुमार जैस्वाल (२६) असे या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी मुंबईतील शिवाजीनगर भागात राहणारा जैस्वाल आपल्या अजून एक मित्रासोबत कामानिमित्त मोटारसायकलवरून जोगेश्वरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी पाण्याच्या टॅंकरखाली आल्याने हा […]
पवईत सशस्त्र जबरी चोरी, १४.५ लाखांची लूट
पवईतील तुंगागाव, एल-अँड-टी गेट क्रमांक ५ समोरील परिसरात असणाऱ्या जुहूर पॅलेस इमारतीत घुसून दोन अज्ञात चोरट्यांनी शाळा ट्रस्टीच्या घरातून १३ लाखाची रोकड आणि ६ तोळे दागिने असा ऐवज शस्त्राच्या धाकावर लुटून नेल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत पवई पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून सिसिटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरु केला आहे. पवईतील जुहूर पॅलेस इमारतीत […]
जुन्या नोटांसह पवईत व्यावसायिकाला अटक
भारतीय चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या ९९.६५ लाख रुपयांच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्या एका व्यावसायिकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. केशव मनोहर कोरगावकर असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. रक्कम बदलून घेण्यासाठी पवईमध्ये आला असताना पवई पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. नोटबंदीनंतर पैसे बदलून घेण्याचा काळ संपला असून, आजही या १६ ते […]
बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध
सदर इसम नामक निपेंद्र महोन्तो (अंदाजे वय ४०) अशोक टॉवर मरोळ येथे आजारी अवस्थेत मिळून आला होता. याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २६ मार्च रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक आजारी इसम मरोळमधील पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या अशोक टॉवर, मारवाह […]
पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत
३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो […]
घरकामास नकार दिल्याने महिलेला मारहाण करणाऱ्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रामबाग म्हाडा, पवई लेकहाईटस इमारतीत घरकाम करणाऱ्या एका महिलेला, घरकामास येण्यास नकार दिला म्हणून मारहाण करणाऱ्या बक्षी याला पवई पोलिसांनी अखेर आज अटक केली. वॉलेंटीनो राफेल कॅन अहमद बक्षी (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाईल. रामबाग येथील पवई लेकहाईटस इमारतीत राहणाऱ्या बक्षी नामक एका इसमाने त्याच इमारतीत […]
चांदिवलीत बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मजूरांची सुखरुप सुटका
@प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे चांदिवली येथील हिरानंदानी विकासकाच्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारी १२.१५ वाजता घडली आहे. अग्निशमन दलाच्या २० – २५ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीतून ७० – ८० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, धूर शरीरात गेल्याने श्वसनास त्रास जाणवू लागलेल्या ६ कामगारांना […]
हिरानंदानी लेबर कॅम्पमध्ये पाण्याची टाकी पडून ७ कामगार जखमी, दोघांची स्थिती गंभीर
आज सकाळी हिरानंदानी कॉम्प्लेक्स, पवई येथील कामगार शिबिरात (लेबर कॅम्प) एक प्रचंड प्लास्टिकची पाण्याची टाकी पडून, सात बांधकाम मजूर जखमी झाल्याची घटना घडली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी खैरलाल अलाम (३५) याला हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी कामगार जितेंद्र निषाद (२१), रुपचंद निषाद […]
पवईत म्हाडा इमारतीत घरकाम करणाऱ्या महिलेला मारहाण
– रमेश कांबळे, अविनाश हजारे पवईतील म्हाडा, पवई लेकहाईटस इमारतीत घरकाम करणाऱ्या एका महिलेला इमारतीत राहणाऱ्या इसमाने मारहाण केल्याची घटना रविवारी पवईत घडली आहे. घरकामास येण्यास मनाई केल्याने तिला मारहाण करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना इमारतीच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, आरोपीचा शोध घेत आहेत. ईश्वरा नायडू […]
आयआयटी येथील हर्बल कंपनीच्या कार्यालयात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक
आयआयटी, पवई येथील एका हर्बल कंपनीच्या कार्यालयात घुसून, मँनेजरला बांधून ठेवून त्याच्याकडून ९.५० लाखाची जबरी चोरी करून फरार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. रेहमत मोहमद अली (२१) आणि शिवकुमार प्रताप सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६.३५ लाखाची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. रेहमत अली […]
विकासकाला २० कोटीची खंडणी मागणाऱ्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
पवईतील एका नामांकित विकासकाला २० करोडची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे (४५) आणि त्याचा गाडी चालक विठ्ठल फालके (४२) याला न्यायालयाने आज (गुरुवार) दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बुधवारी पवई पोलिसांनी त्यांना मुलूंड येथील हॉटेलमधून खंडणीचा १ करोड रुपयाचा हप्ता स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. विकासक यांच्याकडे २७ वर्ष नोकरी करणारा पाखरे २०१६ […]