व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यास आलेल्या दोघा तस्करांना पवई परिसरातून शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट १० ने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सुनील कुलकर्णी (४९), राहणार कोथरूड पुणे आणि अन्वर अब्दुल खुदुस शेख (५५) वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ किलो वजनाची […]
Archive | Crime
सोशल माध्यमाव्दारे मैत्री करून २०.४७ लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपींना उत्तरप्रदेशमधून अटक; पवई पोलिसांची कारवाई
पवईतील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी परदेशी नागरिक असल्याचे भासवत सोशल माध्यमात बनावट खाते बनवून, मैत्री करून नंतर मोबाईलवर संपर्क साधत भारतातील गरीब कोविड रुग्णांना मदत म्हणून पैसे पाठवण्याच्या बहाण्याने २०.४७ लाखाची फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना पवई पोलिसांनी शनिवारी नोएडा, उत्तरप्रदेश येथून बेड्या ठोकल्या आहेत. राहुल विनोद तिवारी (वय २१ वर्ष), आसिम समशाद हुसेन (वय २३ […]
चांदिवलीत माजी महिला पत्रकाराची ७ वर्षाच्या मुलासह आत्महत्या
इंग्रजी दैनिकाच्या माजी पत्रकार महिलेने चांदिवली येथील नहार अमृत शक्ती येथील तुलीपिया इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून आपल्या ७ वर्षीय मुलासह उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रेश्मा ट्रेंचिल (४४) असे या महिलेचे नाव असून, तिने लिहलेल्या सुसाईडच्या नोटच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंद करत एका […]
३० लाखाचे दागिने चोरी करून पसार झालेल्या इसमास पवई पोलिसांनी ६ तासात ठोकल्या बेड्या
पवईतील ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करून ३० लाख किंमतीच्या दागिन्यांसह पसार झालेल्या एका २६ वर्षीय व्यक्तीला पवई पोलिसांनी अवघ्या ६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. हिरालाल लेहरुलाल कुमावत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरालाल यावर्षी २० मे रोजी जामिनावर सुटला होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. दोन वर्षापूर्वी जुगारात हरल्याने कर्ज फेडण्यासाठी […]
कस्टम अधिकारी, पत्नीला १.९ लाखाचा गंडा
सीमाशुल्क विभागाच्या एका इन्स्पेक्टर आणि त्यांच्या पत्नीला एका तोतयाने तिचा भाऊ असल्याचे सांगत १.९ लाखाला गंडवले आहे. तत्काळ पैशांची गरज असलेल्या आपल्या मित्राच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत या तोतयाने त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात पवई पोलीस गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पवई पोलिसांनी सांगितले की, सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या पत्नीने […]
पवईत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; एकाला अटक
पूर्व वैमनस्याचा राग मनात ठेवून भांडण काढत एका तरुणावर ४ लोकांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. इसाकीमुत्तू तेवर कटेन असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३४ (दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाने केलेल कृत्य) नुसार गुन्हा नोंद करत मुत्तू […]
पवई पोलिसांच्या गाडीवर दगडफेक; ३ आरोपींना अटक
प्रमोद चव्हाण पवई परिसरात गस्त घालत असताना पोलीस गाडीवर हल्ला करणाऱया ३ तरुणांच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राहुल सिंग, इस्माईल शेख, शिवकुमार उर्फ भैय्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपी हे नशेखोर असून, पोलिसांना घाबरवण्यासाठी त्यांनी हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे. पोलीस शिपाई अजय बांदकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी […]
शाब्बास पवई पोलीस; सायबर चोरट्याने उडवलेले २ लाख मिळवले परत
सध्याच्या काळात सायबर चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, दररोज कोणी-ना-कोणी त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहे. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून तांत्रिक मदतीने गुन्हे करत असल्याने त्यांना पकडणे म्हणजे एक दिव्यच असते. मात्र भल्या भल्या गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवत वठणीवर आणणाऱ्या मुंबई पोलिसांनी या सायबर चोरट्यांना सुद्धा वठणीवर आणण्यास सुरुवात केली आहे. पवई पोलिसांनी अशाच प्रकारे सायबर […]
महागड्या सायकल चोराला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई आणि आसपासच्या परिसरातून महागड्या सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवई पोलिसांनी त्याच्याकडून ११ मे रोजी चोरी केलेली एक महागडी सायकल सुद्धा हस्तगत केली आहे. अश्विन ईश्वरलाल मोहिते (१९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनाकीया रेंनफॉरेस्ट सोसायटी, येथे राहणारे ४३ वर्षीय फिर्यादी […]
पोलीस असल्याची बतावणी करत महिलेचे २.१२ लाखाचे दागिने लांबवले
पोलीस असल्याची बतावणी करत पवईतील एका महिलेची फसवणूक करून तिच्याजवळील २.१२ लाखाचे दागिने भामट्यांनी लांबवले आहेत. बुधवारी पवई परिसरात ही घटना घडली असून, पवई पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी आपल्या कामासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेला मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी रस्त्यावर अडवले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे त्या महिलेला सांगत […]
बीएमसी अधिकारी असल्याचे सांगून मास्क का लावला नाही म्हणत लूट
बीएमसी अधिकारी असून, मास्क का लावला नाही? असे सांगत एका छोट्या व्यावसायिकाला लुटल्याची घटना पवईत घडली आहे. कोरोना काळात असणाऱ्या या सक्तीचा फायदा घेवून, लुटारूनी नवीन शक्कल लढवली आहे. या संदर्भात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईसह अडकलेला महाराष्ट्र आता हळूहळू निसटू लागला आहे. मात्र […]
आंतरराष्ट्रीय कॉलिंग अॅपचा वापर करून तरुणीला धमकी देण्याऱ्या रोमिओला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रेमात असताना एका १७ वर्षीय महाविद्यालयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय कॉलिंग अॅपचा वापर करून तरुणीला धमकी दिल्याबद्दल एका १९ वर्षीय रोमिओला साकीनाका पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. अटक आरोपीने महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावरच सोडले आहे. १९ वर्षीय आरोपी दोघांच्यामधील संबंध संपवल्यानंतरही आणि तिचा मोबाईल नंबर बदलल्यानंतरही तिचा पाठलाग करत असल्याची तक्रार पीडित मुलीने ५ […]
रिक्षा चोरीच्या संशयातून पेटवले घर
रिक्षा चोरी केल्याच्या संशयातून रिक्षा मालकांनी ४३ वर्षीय व्यक्तीचे घर जाळल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. याबाबत पवई पोलिस गुन्हा नोंद करून आरोपींना ताब्यात घेवून अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, तो पवईतील फिल्टरपाडा भागात राहतो. पवईसह, साकीनाका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. वर्षभरापूर्वी जामीनावर […]
जामिनावर सुटलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीसह तिघांना हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक
पवई परिसरातील शिवशक्ती नगर येथील एका साडीच्या दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून, दुकान मालकाला चाकूने जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या ४ आरोपींना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीला काही महिन्यांपूर्वीच जामिनावर सोडण्यात आले होते. तो खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. २१ एप्रिलला ४ अज्ञात इसम हे […]
पवईत १७ वर्षीय तरुणाचा खून; मारहाणीचा व्हिडीओ केला शूट; आरोपींना ५ तासात अटक
पवईतील मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, ३१ मार्चला पहाटे उघडकीस आली होती. अनिकेत रामा बनसोडे असे या तरुणाचे नाव असून, त्याला मारहाण करत त्याचा खून केल्याचे समोर येताच पवई पोलिसांनी पाच तासात ४ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपी जेविएलआरवर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम […]
मोटारसायकल चोराच्या ८ तासाच्या आत आवळल्या मुसक्या; पवई पोलिसांची कारवाई
पवई पोलिसांच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्याच्या ८ तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. सरफराज शेख (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत केली असून, अजूनही काही गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत. व्यवसायाने फोटोग्राफर असणारे हर्षद दिलीप जिमकाडे […]
१.६ किलो गांजासह पवईत एकाला अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रेते आणि सेवन करणारे यांच्यावर धडक कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी पुन्हा कारवाई करत १.६ किलो गांजासह एका विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. इर्शाद सरताज अली शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]
रामबाग उड्डाणपुलाजवळ डिव्हायडरला धडकून अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू
पवई, रामबाग उड्डाणपुलाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी रात्री पवईत घडली. २० वर्षीय तरुण विक्रोळीच्या दिशेने जात असताना डिव्हायडरला (दुभाजक) धडकून हा अपघात झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे. स्वप्नील सुभाष अहिवले (२०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रपाळी कर्तव्यावर असणाऱ्या पवई […]
सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई परिसरात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी गुरुवारी पार्कसाईट येथून बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय उर्फ लंब्या अरुण बाईत (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पवई येथील एक घरफोडी आणि चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. २ मार्च रोजी पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये घुसून मौल्यवान वस्तू आणि रोकड […]
बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नागेश शंकर गायकवाड (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. पवई परिसरात जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेविएलअर) मार्गावरून बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल, मौल्यवान […]