रुपयाच्या बदल्यात रियाल देण्याचा बहाणा करून ठगणाऱ्या ६ जणांना पवई पोलिसांनी केली अटक

riy-vs-rsवईत वाटसरू आणि रिक्षाचालकांना रुपयाच्या बदल्यात मोठ्या रकमेचे रियाल देण्याचा बहाणा करून, प्रत्यक्षात मात्र त्यांना कागदी बंडल सोपवून ठगणाऱ्या ६ जणांना पवई पोलिसांनी मुंब्रा येथे चिखलातून पाठलाग करून अटक केली आहे. गोदू शहा उर्फ जुनैद (२८), शाहीद काझी (३५), रिपन फकीर (२५), आलम शेरीफ (३५), उबेद्दुल खान (२३) आणि लियाकत आली (३२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई परिसरात या गँगने गेल्या दोन महिन्यात ३ ते ४ लोकांना ठगल्याच्या तक्रारी आहेत.

खान याने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, रिक्षाचालक अब्दुल खान यांच्या रिक्षातून सप्टेंबर महिन्यात एक महिला जोगेश्वरी – पवई असा प्रवास करताना रडत असल्याचे त्याला जाणवले. रडण्याचे कारण विचारले असता तिने ‘आम्ही सौदी अरेबियाला होतो, माझ्या नवरा तिथे खूप चांगला कमावत होता, मात्र त्याच्या खूप दारू पिण्याच्या सवईमुळे त्याला त्याची नोकरी गमवावी लागली आणि आम्ही मुंबईला आलो आहोत. आमच्याकडे मोठ्या प्रमणात रियाल आहेत, मात्र त्याचे रुपयात बदल कसा करायचा हे मला माहित नाही आहे.’ असे तिने खानला सांगितले. पवईमध्ये आल्यावर तिने खानला भाडे म्हणून काही रियाल दिले आणि यांची किंमत ७०० रुपये आहे सांगून त्याच्याकडून केवळ २०० रुपये परत घेतले.

“खानला रियालच्या बदल्यात ७०० रुपये मिळाल्यावर त्याचा त्या महिलेवर विश्वास झाला आणि त्याने ४००० रियालच्या (७ लाख रुपये किमतीचे) बदल्यात ३ लाख रुपये देण्याचे कबूल केले. पवईतील एका हॉटेलमध्ये कपड्यात बांधलेला एक बंडल खानला देवून बदल्यात ३ लाख रुपये घेवून ती महिला लगेच निघून गेली. त्यानंतर बंडल उघडून पहिले असता त्यात फक्त कागद होते.” असे पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

कॉल रेकॉर्ड्स आणि खबरींच्या माहितीच्या आधारावर पवई पोलिसांच्या तपासी पथकाने मुंब्रा येथील त्यांच्या अड्यावर छापा मारत, चिखलातून पाठलाग करून सहा आरोपींना अटक केली आहे. खान याला फसवणारी महिला आणि मुख्य सूत्रधार अजून पोलिसांच्या हाती लागले नाही आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!