जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४
महिला डॉक्टरशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकाला अटक
पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या एका नामांकित रुग्णालयातील २६ वर्षीय महिला डॉक्टरशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका ४३ वर्षीय इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या एका नामांकित रुग्णालयात आरोपी इसम संजय गांधी याने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या आईला कॅन्सर उपचारासाठी दाखल केले होते. तो […]
मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवून देण्याचा बहाणा करून वैद्यकीय कर्मचाऱ्याची १६ लाखाची फसवणूक
पवईत मुख्यमंत्री कोट्यातून स्वस्तात घर मिळवून देतो असा बहाणा करून सायन रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची १६ लाखाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचे या शहरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते, मात्र प्रत्येकाचे हे […]
पवईत शाळेतील छताचा भाग कोसळल्याने विद्यार्थी जखमी
पवईतील आयआयटी भागात असणाऱ्या ज्ञान विद्यामंदिर शाळेच्या छताचा काही भाग कोसळून शाळेत असणारे ४ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी पवईत घडली. शाळेने त्वरित विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करून पालकांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे पालकांच्यात नाराजी असून, वेळच्या वेळी विद्यार्थ्यांकडून फी उकळणारे शाळा प्रशासन इमारतीच्या डागडुजीत कानाडोळा करत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. या […]
पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यात दोन वेळा लागू झाला जमावबंदीचा आदेश
आरेमधील मेट्रो कारशेड उभे करण्यासाठी सुरु असणाऱ्या वृक्षतोडीवेळी पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडे कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी आणि […]
मॅरेथॉन पडली महागात, चोरट्यांनी गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू लांबवल्या
पवई आयआयटीमध्ये रविवारी पहाटे मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्या चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास ५ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. चोरट्यांनी गाड्याच्या काचा फोडल्यानंतर महागडे मोबाईल, पाकीट तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड लंपास केले आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांना माहिती देण्यात आली असून, ते अधिक […]
ऑनलाईन साडी खरेदी करायला गेली आणि ५० हजार घालवून बसली
सध्या उत्सवाचे दिवस असून, ऑनलाईनवर खरेदीला उधान आले आहे. मात्र अशाच प्रकारे ऑनलाईन खरेदी केलेल्या ७९९ रुपयांच्या साडीसाठी रहेजाविहार येथे राहणाऱ्या एका गृहिणीला चक्क ५० हजार रुपये मोजावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून पवई पोलिस अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील रहेजा विहार येथे राहणारी गृहिणी […]
जेव्हीएलआरवर अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
गुरुवारी (१० ऑक्टोबर) जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर पंचकुटीर येथे झालेल्या अपघातात मोटारसायकलवरून जात असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना पवई परिसरात घडली. सदाशिव येरम (२३) आणि शैलेश मिडबावकर (२३) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांचा अजून एक मित्र अनिकेत महेश जांभळे (२१) हा गंभीर जखमी झाला असून, […]
जनावरांची दूधक्षमता वाढविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘ऑक्सिटोसीन’ औषधाचा मोठा साठा पवईत पकडला
दूध देणाऱ्या जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यांना दिल्या जाणाऱ्या ‘ऑक्सिटोसीन’ नामक औषधाचा मोठा साठा मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पवई येथे पकडला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ‘ऑक्सिटोसीन’च्या दीड हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. या औषधाचा मुंबईतील विविध तबेल्यांमध्ये पुरवठा करण्यात येणार होता. नजीब खोटाल, अनिस खांदे आणि मासी सादिक खोत अशी […]
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत साक्षी गुप्ताला सुवर्ण पदक
मुंबईतील, कांदिवलीतील प्रकाश कॉलेज येथे आयोजित मुंबई जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत पवईकर साक्षी गुप्ताने सुवर्णपदक मिळवत पवईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. साक्षी पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. ४ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यापूर्वीही ती जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण तर राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदकाची मानकरी ठरली आहे.
हिरानंदानी फाऊडेशन शाळेने कोरले ‘फ्रँक अँथनी इंटरस्कूल डिबेट’ ट्रॉफीवर आपले नाव
हिरानंदानी फाऊडेशन शाळेच्या (एचएफएस) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामुळे येथील विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र गेली कित्येक वर्षे हुलकावणी देत असणाऱ्या ‘फ्रँक अँथनी मेमोरियल अखिल भारतीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धे’च्या ट्राफिवर आपले नाव कोरत अजून एक मानाचा तुरा शाळेच्या शिरपेचात खोवला आहे. कोलकाता येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्रँक अँथनी मेमोरियल अखिल भारतीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धा […]
फार्मा कंपनीला सायबर फ्रॉडद्वारे ४५ लाखाला गंडवले
ईमेल हॅकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन घोटाळेबाजांनी पवई पोलिसांच्या अखत्यारीतील एका फार्मासिटिकल कंपनीला ४५ लाखाला गंडवले आहे. थेट दुसर्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून, कंपनीचे मेल खाते हॅक करून त्यातील सगळे पुराव्यांचे मेल डिलीट करून कोणताही मागमूस न ठेवता मोठ्या सफाईने हे काम करण्यात आले आहे. कंपनीच्या वरिष्ठ संचालकानी यासंदर्भात अज्ञात आरोपींविरोधात ६३.४३५ डॉलर्सच्या (जवळपास ४५ लाख रुपये) […]
नाट्य स्पर्धेत पवई इंग्लिश हायस्कूलला द्वितीय पुरस्कार
पवई इंग्लिश हायस्कूलच्या (पीईएचएस) विद्यार्थ्यांनी शिक्षणासह नाटक आणि परफॉर्मिंग आर्टचे महत्त्व कायम ठेवत सलाम बॉम्बे फाउंडेशन कला अकादमी आयोजित आंतरशालेय कला महोत्सव २०१९ स्पर्धेत नाट्य विभागात दुसरे स्थान मिळवले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना थिएटर प्रॉडक्शनमध्ये काम करण्याची किंवा पडद्यामागे मदत करण्याची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य दाखविता यावे या उद्देशाने “सलाम बॉम्बे फाउंडेशन” क्रीडा, नाटक, […]
पवई सिनिअर सिटीझन असोसिएशनतर्फे बालवाडीच्या मुलांना शालेय वस्तूंचे वाटप
पवई सिनिअर सिटीझन असोसिएशनतर्फे गुरुवारी, २० सप्टेंबर २०१९ रोजी पवईमधील तिरंदाज शाळेच्या ३ बालवाडीतील सर्व मुलांना गणवेश, शाळेची बग, लंच बॉक्स आणि पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले. भाजपा नगरसेविका वैशाली पाटील यांनी पवई सिनिअर सिटीझन असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले. आयआयटी जवळील तिरंदाज येथील पालिका शाळेतील तीन बालवाडी पवई सिनिअर सिटीझन असोसिएशनने दत्तक घेतल्या आहेत. दरवर्षी […]
पवई तलावातील जलपर्णी काढण्यापासून पालिकेची चालढकल
पवई तलावाला हळूहळू नष्ट करणाऱ्या जलपर्णीना काढण्याबाबत विचारले असता पालिकेच्या अधिका्यांनी नुकतेच केले असल्याचे निर्दोषपणे सांगितले. एका अधिकाऱ्याने प्रतिनिधीना सांगितले की, आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर काही वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले “कोई हायसिंथ नजर ही नहीं आयी है.” त्याच्यावर प्रतिनिधींनी उत्तर दिले “अगर आप इस मामले में अपना हाथ गंदा करना चाहेंगे और गाड़ी से उतरेंगे […]
वाहतूक कोंडीचा ‘महामार्ग’; जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गर्दीच्या काळात व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेव्हीएलआर) वाहतुक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड वापरण्यास हलक्या व मध्यम व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जेव्हीएलआरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत […]
जेव्हीएलआरवर आयआयटीजवळ कंटेनर पलटला, ३ तास वाहतूक कोंडी
दुभाजक ठरतोय अडथळा, यापूर्वीही या ठिकाणी अपघाताच्या, दुभाजकावर गाड्या चढल्याच्या अनेक घटना. स्थानिकांची दुभाजक हटवण्याची मागणी. पालिका – वाहतूक विभाग यांची टोलवाटोलवी. आज (गुरुवार, १९ सप्टेंबर) पहाटे सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर आयआयटी मेनगेट येथे एक कंटेनर (एमएच ४६ एफ ४९७१) पलटल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत कंटेनर चालकाने बाहेर उडी मारल्यामुळे तो बचावला. मात्र […]
सायबर फसवणुकीत ५२ वर्षीय व्यक्तीने गमावले १.५८ लाख
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २०१७ पासून ते ई-वॉलेट वापरत आहे. सायबर फसवणूकीच्या घटनेत एका ५२ वर्षीय प्रकल्प व्यवस्थापकाला १.५८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पवई येथे रिअल इस्टेट कंपनीत नोकरीस आहेत. फसवणूक करणार्याने मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे तक्रारदार यांच्या फोनवर ताबा मिळवत त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. २०१७ पासून तक्रारदार […]