जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४
जेवणाचे १० रुपये मागितले म्हणून मित्रानेच केला मित्राचा खून
जेवण करत असताना जेवणाचा खर्च म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राला १० रुपये मागितल्याचा राग येवून बांबूने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केल्याची घटना काल पवईतील साई बांगुर्डा परिसरात घडली. दिनेश लक्ष्मण जोशी (३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, आरोपी मित्र खुनानंतर पळून गेला आहे. पवईमधील गौतमनगर येथे राहणारा दिनेश हा आपल्या […]
फुलेनगरमध्ये शौचालय दुरुस्तीत दिरंगाई; तरुणास सर्पदंश
@अविनाश हजारे पवईच्या राष्ट्रपिता महात्मा फुलेनगर वसाहतीमधील मुख्य शौचालय बांधणीस मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागाकडून होत असलेली दिरंगाई आणि या भागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या विभागातील एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. वैभव भगत असे या तरुणाचे नाव असून, परिसरात शौचालय उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या अन्य एका मित्रासोबत तो बाजूच्या जंगलात शौचास गेला असताना विषारी सापाने त्याला दंश केल्याची […]
आयआयटी, पवई येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानातील झाडांच्या कत्तली विरोधात शिवसेनेचे श्रद्धांजली आंदोलन
पवई, आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात शिवसेनेच्या आमदार फंडातून सुरु असलेल्या कामाच्यावेळी लावलेली रोपटी स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली पालिका ‘एस’ उद्यान विभागाने उपटून टाकून त्यांची हत्या केल्याचा आरोप करत शिवसेनच्यावतीने आज पवईमध्ये श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दुर्गादेवी शर्मा उद्यानात जमा होत उद्यानात काढून फेकलेल्या आणि सुकलेल्या रोपट्यावर सफेद कपडा टाकून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. […]
मुंबईमध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पवई दुसऱ्या स्थानावर
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये शहरात नोंदवलेल्या बलात्काराच्या तक्रारींची संख्या पाहता या प्रकरणांमध्ये मुंबईत पवई दुसऱ्या स्थानावर असून, ओशिवरा पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पवईमध्ये गेल्यावर्षी १८ गुन्हे दाखल करण्यात आले होते तर ओशिवरा येथे बलात्काराच्या २६ गुन्ह्यांची नोंद आहे. ज्यामध्ये श्रीमंत उद्योजक आणि बॉलीवूडमधील कलाकारांनी एक चतुर्थांश बलात्कार प्रकरणे रेकॉर्ड केली […]
आयआयटीतील मांसाहार वाद बंद करा, युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
@अविनाश हजारे, रमेश कांबळे पवईतील आयआयटी कॅम्पसमध्ये मागील काही दिवसांपासून शाकाहारी- मांसाहारी वाद पेटलेला असतानाच युवासेनेने यात उडी घेत, संस्थेतील सर्व कँटिंगमध्ये सारखीच नियमावली लागू करावी अशी मागणी करणारे निवेदन घेवून सोमवारी आयआयटीत धडक दिली. आयआयटी मुंबईचे कुलसचिव प्रेमकुमार यांची भेट घेवून, त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन करण्याचा […]
हिरानंदानीत फेब्रीकेशन युनिटला आग
हिरानंदानीमधील जयभीमनगर परिसरात असणाऱ्या फेब्रीकेशन युनिटला रविवारी रात्री १०.२० वाजता आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ३ बंबांच्या मदतीने १५ मिनिटाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानीची नोंद नाही. सध्या मुंबईत आगीचे सत्रच सुरु आहे. या आगींमध्ये अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पवईमध्ये सुद्धा वारंवार आगीच्या घटना घडत […]
कथा ♥ ‘प्रीत’ ♥ भाग २ अमित मरगजे (स्वतेज) काल तिने आग्रह केला, ऑफिसमधून सोबत निघू. मी नाही म्हणालो पण नाईलाज झाला होता. मी तिच्यासोबत चालू लागलो. रेल्वेस्थानक येईपर्यंत चालणं अपरिहार्य होतं. चालतांना एकमेकांना होणारा स्पर्श आणि त्यातून उठणारे रोमांच, डोळ्यांमधील लपलेले भाव, ओठातलं हास्य, सगळं काही मनात कारंजे उभे करीत होतं. ती १० मिनिटे […]
पवईत टेंपोच्या धडकेत महिलेचा मृत्यू
@रविराज शिंदे पवई, आयआयटी मार्केट जंक्शन येथे रस्ता ओलांडताना एका भरधाव टेंपोच्या धडकेत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवारी) दुपारी ३ वाजता घडली. प्रमिला सिंह असे मृत महिलेचं नाव असून, टेम्पो चालकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. प्रमिला, पती आणि चार मुलांसहीत सुर्यनगर परिसरात राहत होती. आपल्या इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या मुलाची टयूशनची […]
****प्रीत**** अमित मरगजे (स्वतेज) तिच्यासाठी मला लिहायचं होत, वाट पाहत होतो योग्य वेळ यायची, बहुदा आजपासून सुरुवात करायला हरकत नाही. राजेश, मी यापूर्वी यांच्याविषयी लिहिलंय, हा कसा आहे आणि का तसा आहे, हे आजवर नाही कळलं, पण याच व्यक्तिमत्व मला विचार करायला नेहमीच भाग पाडत. पुन्हा पुन्हा मी आणि माझे शब्द या माणसासाठी लिहू लागतात. […]
इमारतीत घुसून माजी आयआयटी प्रोफेसरच्या कारची तोडफोड
११ जानेवारी २०१८ रोजी रात्री ९.१५ वाजता दोन अज्ञात लोकांनी एसएम शेट्टी शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या आयआयटी बॉम्बे स्टाफ कॉटर्समध्ये रिक्षातून प्रवेश करून, वरिष्ठ नागरिक प्रोफेसर डॉ एस जी मेहंदळे (आयआयटी बॉम्बेचे सेवानिवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी) यांच्या एस्टिलो कारची विंडशील्ड काच फोडल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली असून, पवई पोलीस त्या दोन अज्ञात […]
पवईकरांनी दिल्ली जिंकली; राजपथावर संचालनात महाराष्ट्राचे नेतृत्व
@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण २६ जानेवारी, देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर संचलनात महाराष्ट्राचे नेतृत्व करताना पवईकर सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी संकल्पित केलेल्या चित्ररथाला सर्वोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे महाराष्ट्रासोबतच पवईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे नेत्रदीपक दर्शन या चित्ररथातून समस्त भारतवासीयांना […]
स्वस्तात गाडी मिळवून देण्याच्या बहाण्याने ठगणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बँकेने जप्त केलेल्या गाडय़ा कमी किमतीत मिळवून देतो सांगून मुंबईकरांना लाखो रुपयांना ठगणाऱ्या भामटय़ाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किशनचंद जगतीयानी उर्फ मनीष लालवाणी (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुनीलने मुंबई, ठाणेसह पुणे, दिल्ली आणि हरियाणा भागात अनेकांची फसवणूक केली असून, त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. हप्ते न-भरल्याने बँकेने जप्त […]
आयआयटीत खाजगी कँटिंगमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही
रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण पवईतील आयआयटी कॅम्पसमध्ये एका खाजगी कँटिंगमध्ये आग लागल्याची घटना आज संध्याकाळी ९.१० च्या सुमारास घडली. विद्यार्थी, आयआयटी सुरक्षारक्षक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, कँटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. आज (सोमवारी) संध्याकाळी ९.१० वाजताच्या सुमारास आयआयटी कॅपसमध्ये येथील हॉस्टेल क्रमांक ४ जवळ असणाऱ्या […]
साकीनाका पोलीसांची गुन्हेगारी रोखण्यासाठी भित्तीचित्राद्वारे जनजागृती
चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार बघूनच अनेक गुन्हेगार गुन्हे करत असतात. साकीनाका पोलिसांनी यावरच एक युक्ती लढवत चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या “व्हिलन”ची भित्तीचित्रे बनवून त्यांच्या आधारे संदेश देताना अधिक मनोरंजक करण्यासाठी त्यांचे प्रसिद्ध संवाद वापरून परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृतीची शक्कल लढवली आहे. साकीनाका पोलिस स्टेशनच्या भिंतीवर चित्रपटातील नामांकित व्हीलनस गुन्हेगारी वाईट आहे, कायदा सुव्यवस्था आणि […]
पवईकर चेतन राऊतने नोंदवला चौथा विश्वविक्रम
हॉकिंग झोनला आयआयटीकरांचाही विरोध
पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीतून हॉकिंग झोन हटवल्याचे दाखवत असतानाच आयआयटी भागात मात्र बनणाऱ्या हॉकिंग झोन्समध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे येथील नागरिक सुद्धा निराश झाले असून, त्यांनी याला आपला कडक विरोध दर्शवला आहे. सोशल माध्यमातून याची जनजागृती करत लोकांनी पालिकेच्या समोर आपला विरोध ठेवला आहे. […]
रामबाग खदानीत तरुणी पडल्याचा संशय; शोध सुरु
चांदिवली येथील मन्नुभाई चाळीत राहणारी सतरा वर्षीय तरुणी फिझा खान ही जवळच असणाऱ्या रामबाग खदानीत मंगळवारी दुपारी पडल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला आहे. मुंबई अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) जवानांच्या मदतीने दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरुच आहे. फिझा ही आपल्या परिवारासोबत चांदिवली येथील मन्नुभाई चाळीत राहते ३ वर्षापूर्वी तिचे लग्न ठरले असून, […]
एमडी ड्रग्जसह पवईत दोघांना अटक
पवईमध्ये ग्राहकाला मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या २ तरुणांना शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. मेहंदीहसन जहीरहसन मिर्झा (२३), नरेश सुरेश माला (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबईत मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रगचा सुळसुळाट वाढला असतानाच, मुंबईत एमडी पुरवणाऱ्या […]
हिरानंदानी हॉकिंग झोन मुक्त?
हिरानंदानी रहिवाशांसाठी आनंदाची बातमी असून, गेल्या दोन महिन्यांपासून हिरानंदानी परिसरात येणाऱ्या हॉकिंग झोनला घेवून असणारी टांगती तलवार पालिकेने जाहीर केलेल्या नव्या यादीनुसार आता त्यांच्यावरून हटली आहे. पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीत इस्ट अव्हेन्यू रोड वगळता कोणत्याच रस्त्यावर हॉकिंग झोन दाखवण्यात आलेले नाही. यावरून २०१४ साली झालेल्या […]
‘दलित उद्योजकांची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रकाशन सोहळा : शनिवार २० जानेवारी,सायंकाळी ४.३० वाजता दादर क्लब, स्वामी नारायण मंदिरजवळ, दादर (पूर्व) @सुषमा चव्हाण लेखक, व्यावसायिक आणि शिक्षक प्रमोद सावंत लिखित, स्वच्छंद प्रकाशनचे ‘दलित उद्योजकांची संघर्षगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज, २० जानेवारीला संध्याकाळी ४.३० वाजता दादर क्लब येथे संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक किशोर खरात, […]