प्रदूषण वाढीमुळे निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास रोखण्यासाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने पवईमधील नागरिकांना तुळशीची रोपे भेट देवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला.
नेत्याचा वाढदिवस आला की गल्ली बोळात साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर पोस्टर झळकतात. मात्र १४ जून रोजी असणारा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस पोस्टर्स लावून किंवा त्यांना पुष्पगुच्छ देवून निसर्गाची हानी करून साजरा करण्यापेक्षा, निसर्गरक्षणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय मनसे कार्यकर्त्यांनी घेत, वायु शुध्दीकरणात असणारी तुळशीची महत्वाची भुमीका लक्षात घेवून मंगळवारी पवईत विद्यार्थी सेनेच्यावतीने तुळशीच्या रोपांचे वाटप करून प्रत्यक्षातही आणला गेला.
या संदर्भात बोलताना मनसे विद्यार्थी सेनेचे वार्ड ११५ चे शाखा अध्यक्ष महेश देढे यांनी सांगितले, “गेल्या काही वर्षात सिमेंटचे जंगल तयार करण्यात आणि स्वार्थासाठी निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले गेले आहे. या निसर्गाच्या नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे. तेव्हा साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना पुष्पगुच्छ देवून निसर्गाची हानी करण्यापेक्षा निसर्ग संवर्धनासाठी लोकांच्यात तुळशी किंवा झाडांच्या रोपांचे वाटप करावे अशी संकल्पना वहिनीसाहेब शर्मिलाताई ठाकरे यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेनुसारच आज आम्ही लोकांना तुळशीच्या पवित्र रोपट्यांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.”
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.