पेटीएम सुरळीत करून देण्याचा बहाणा करून मुंबईभर अनेक पेटीएम वापरकर्त्यांना चुना लावणाऱ्या टोळीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमित यादव (२८), ब्रिजकुमार यादव (२६), जावेद शेख (२५), संदेश कनोजे (२८) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
अमित हा ऑनलाईन सर्वेचे काम करत असल्याने आणि पूर्वी पैशाचे आदानप्रदान करण्यासाठी वापरात येणाऱ्या पेटीएमसाठी काम करत असल्याने मुंबईमध्ये पेटीएम अपमध्ये प्रोब्लेम असल्याची माहिती तो सहज मिळवत असे.
“पेटीएममध्ये प्रोब्लेम असणाऱ्या व्यक्तीला गाठून ‘आम्ही तुमचा हा प्रोब्लेम ठिक करून देतो’ असे त्याला सांगून त्याची सगळी वैयक्तिक माहिती मिळवून त्याच्या पेटीएम अकाऊंटमधून पैशाचा अपहार करत असत.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल फोपळे यांनी सांगितले.
पवईतील एका नामांकित हॉटेलचा मनेजर हॉटेलचे पेटीएम अकाऊंट हाताळतो. त्याला या टोळीचा म्होरक्या अमित याने गाठून त्यात असणारी अडचण दूर करून देतो असे सांगितले. त्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती आणि वन टाईम पासवर्ड आपल्या मोबाईलनंबर मिळवून त्याने त्याच्या माध्यमातून सोळा हजाराची रक्कम काढून घेतली होती.
“गुन्ह्याची टेक्नीकल माहिती मिळवत पैसे कोणकोणत्या अकाऊंटला टाकले गेले? त्याचे वापरकर्ते अशी माहिती मिळवत आम्ही अखेर काल त्यांना ठाणे आणि पवई भागातून अटक केली आहे.” असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नडविनकेरी यांनी सांगितले.
पवई पोलिसांनी भाद्वी कलम ४१९, ४२०, ३४ नुसार गुन्हा नोंद करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
No comments yet.