भरमसाठ पगाराच्या पॅकेजेससाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी प्लेसमेंटचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये १ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत हा टप्पा पार पडला. नेहमीप्रमाणे आयआयटीयन्सला मिळणारे कोट्यवधीचे पॅकेजेस या वेळीही पहायला मिळाले. पहिल्या टप्प्यात प्लेसमेंट प्रक्रियेत निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग हे या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या टप्यात अकराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभागी कंपन्यांकडून ऑफर्स मिळाल्या आहेत.
पहिल्या दिवशी कंपन्यांमध्ये परिपूर्ण विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचण्याची चढाओढ दिसून आली. पहिल्या दिवशी देण्यात आलेल्या २०० ऑफर्स पैकी १८३ ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या. यावेळी सॅमसंगने सगळ्यात जास्त ऑफर्स विद्यार्थ्यांना दिल्याचे प्रशानाकडून सांगण्यात आले. अमेरिका, जपान, नेदरलँड, सिंगापूर, तैवान, साउथ कोरिया अशा देशांकडून ८९ ऑफर्स विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत.
प्लेसमेंटचा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये होणार असून, विद्यार्थ्यांची कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे.
No comments yet.