आयआयटी मुंबईने सोडलेल्या ‘प्रथम’ या उपग्रहाकडून तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसांपासून संदेश मिळत नव्हते. शनिवारी, १७ डिसेंबरला या उपग्रहाने दिवसभरात तीन वेळा संदेश दिल्याने आयआयटी कंपासमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. आता पर्यंत मिळालेल्या संदेशांपेक्षा शनिवारी मिळालेले संदेश हे अधिक शक्तिशाली असल्याचे उपग्रह टीमचा प्रमुख रत्नेश मिश्रा याचे मत आहे.
आयआयटी मुंबईच्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या प्रथम उपग्रहाचे २६ सप्टेंबरला श्रीहरीकोटा येथून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर यातून नियंत्रण कक्षाला योग्य संदेश मिळत होते. परंतु तांत्रिक बिघाडानंतर यातून संदेश मिळणे बंद झाले होते. यामुळे आयआयटी प्रथमची संपूर्ण टीम चिंतेत होती.
प्रथम उपग्रह ९० मिनिटात पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. या काळात संपूर्ण जगाचा आढावा घेतला जातो. १७ डिसेंबरला सकाळी २ वेळा आणि संध्याकाळी एक वेळ या उपग्रहाचे संदेश मिळाले. नेदरलंड, शिकागो, ब्राझील आणि इंडोनेशिया या देशांकडूनही प्रथमचे संदेश फाइल झाल्याची माहिती मिळत आहे असे टीम प्रमुख रत्नेश यांनी सांगितले.
१७ तारखेला मिळालेल्या अधिक शक्तिशाली संदेशामुळे प्रथमची वाटचाल यशस्वी चालली आहे हे स्पष्ट होते.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.