मुंबई तेलुगु समिती (MTS) पवई यांच्यावतीने गुलमोहर हॉल येथे “बटुकम्मा’ (पारंपारिक तेलुगु उत्सव) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन मुंबई तेलुगु समिती पवईच्या सचिव गुंडुपुणेनी शर्मिला यांच्या मार्गदर्शनाखाली कोटामार्थी सुनीता विनोद यांच्या अध्यक्षतेखाली महिला विंगने केले होते.
“बटुकम्मा – देवी गौरीचा पुष्पोत्सव प्रामुख्याने तेलंगणा राज्य, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात साजरा केला जातो”, असे समितीच्या अध्यक्षा एसविआर मूर्ति यांनी सांगितले.
महिला विंगच्या सदस्या झाशी आणि राधिनी पुढे म्हणाल्या, बटूकम्मा ही सुंदर फुलांची आरास आहे. यामध्ये वेगवेगळ्या अनोख्या हंगामी फुलांची मांडणी केलेली असते. त्यापैकी बहुतेकात औषधी मूल्ये आहेत. मंदिराच्या बुरुजाच्या आकारात सात केंद्रित थरांमध्ये, गौरी देवी हळदीने बनवलेली आहे. ही गौरी देवी वरच्या थरावर ठेवली जाते. स्त्रिया बटुकम्मा भोवती गाणे आणि नृत्य करत तिची प्रशंसा करतात.
ऐतिहासिकदृष्ट्या, बटूकम्मा म्हणजे “जीवनाचा सण” आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादासाठी देवी पार्वतीचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. देवी पार्वतीकडे पुढील वर्षासाठी आशीर्वाद यावेळी तिच्याकडे मागितला जातो.
महिलांच्या सन्मानाचा हा सण असतो. यावेळी महिला पारंपारिक साडीसह दागिने घालून सजतात तर किशोरवयीन मुली लेहंगा-वोनी/हाफ-साडी घालतात. पुरुष त्यांच्या धोती आणि कंदुवाच्या पारंपारिक पोशाखात बटुकम्मा तयार करण्यासाठी फुले गोळा करतात, असे यासंदर्भात व्यवस्थापकीय समितीने सांगितले.
यासंदर्भात बोलताना कोटमार्थी सुनीता पुढे म्हणाल्या की, “कोविडमुळे २ वर्षांच्या कालावधीनंतर साजरा होणाऱ्या या उत्सवात पवईतील अनेक तेलगु सदस्यांसह इतर लोकांनीही या महोत्सवाला हजेरी लावली. पवई तलावात गौरीसह बटुकम्माच्या पारंपारिक विसर्जनाने कार्यक्रमाची सांगता झाली.”
No comments yet.