मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने मुंबईतील वरळी, मालाड आणि पवई येथे रात्र बाजार भरणार आहे. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये २६ आणि २७ जानेवारीला पवईमधील पवई तलाव भागात हा उत्सव रंगणार आहे.
संध्याकाळी ४ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हा बाजार चालणार असून, मनोरंजन आणि खरेदी असे दुहेरी हेतू या रात्र बाजारातून लोकांना साध्या करता येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने दुबई आणि सिंगापूर शॉपिंग फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबईमध्ये सुद्धा प्रायोगिक तत्वावर रात्र बाजार भरवण्याची संकल्पना अंमलात आणली आहे.
मालाड येथील इन ऑरबिट मॉल येथे १९ आणि २० जानेवारीला तर पवईतील पवई तलाव भागात २६ आणि २७ जानेवारीला हा बाजार भरणार आहे. यावेळी अनेक नावाजलेल्या ब्रांडसच्या खरेदी सोबतच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आनंद सुद्धा घेता येणार आहे.
No comments yet.