लेक होममध्ये बाहेरील वाहनांना ‘प्रवेश बंद’

@pracha2005

lake home no entryलेकहोम, पवई विहार व एव्हरेस्ट हाईट कॉम्प्लेक्स परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी येथील स्थानिकां व्यतिरिक्त बाहेरील वाहनांना आता कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. याबाबत तिन्ही कॉम्प्लेक्सच्या फेडरेशनच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असून, १५ सप्टेंबर पासून यांची संपूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांच्या पूर्व सुचणेसाठी संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी ‘Please leave our road alone’ व ‘कृपया करके इस रास्ते का उपयोग न करे’ अशा आशयाचे फलक ही लावण्यात आले आहेत.

कधी आग, तर कधी बिबट्या अशा एका पाठोपाठ एक समस्येशी लढणाऱ्या लेकहोम कॉम्प्लेक्सला गेल्या काही महिण्यांपासून वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासलेले आहे. चांदिवली फार्म रोड, ९० फिट रोड व हिरानंदानी भागात वाढलेल्या वाहतूक कोंडीतून Revised..... RTE - image - lead story - Lake Homesसुटका मिळवण्यासाठी लेकहोम, पवई विहार व एव्हरेस्ट हाईट कॉम्प्लेक्स परिसरातून वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी आता या परिसरात स्थानिकांच्या वाहनां व्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

येथील स्थानिक रहिवाश्यांच्या मते, ‘खाजगी असणाऱ्या आमच्या या रोडवर वाढलेल्या बाहेरील वाहनांच्या वर्दळीमुळे आम्हाला आमच्याच परिसरात फिरायला अडचणी निर्माण होत आहे. रुग्णवाहिका आणि प्रसंगाच्या वेळेस अग्निशमन दलास प्रवेशास आणि कार्यात वाहनांच्या वर्दळीमुळे अडथळे येतात. शांती आणि खाजगी रोड असणाऱ्या कॉम्प्लेक्सच्या उद्देशाने येथे ८०० पेक्षा जास्त परिवारांनी घरे खरेदी केली आहेत. मात्र वाहतुकीच्या समस्येने आमचे जीवनच विस्कळीत केले आहे. भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारसायकलींमुळे अपघात होण्याच्या शक्यता असल्याने आम्ही आमच्या मुलांना जवळच असणाऱ्या बागेत खेळण्यास सोडण्यास घाबरत आहोत.’

“आमच्या परिसरात या वाढत्या समस्येबाबत रहिवाशांकडून सतत तक्रारी केल्या जात आहेत. तिन्ही कॉम्प्लेक्सच्या व्यवस्थापकीय समिती व फेडरेशनने एकत्रित चर्चा करून शालेय बसेस आणि प्रवेशद्वारावर तैनात सुरक्षा यंत्रणेला येणारे पाहुणे किंवा मित्रांची पूर्व सूचना दिलेल्या वाहनांना वगळता बाहेरील सर्व वाहनांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व कॉम्प्लेक्सच्या लोकांना प्रवेश पास देवून १५ सप्टेंबर पासून आम्ही याची अंमलबजावणी करणार आहोत” असे आवर्तन पवईशी बोलताना व्यवस्थापकीय समिती अधिकाऱ्यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!