पवई तलावात विसर्जना वेळी मुर्ती पडून दोन तरुण जखमी
काल अकराव्या दिवशी पवई तलावावर विसर्जन सुरु असताना क्रेनवरील मूर्तीचा तोल बिघडून पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाल्याची घटना पवईत घडली. सागर चांडालीया (३२) आणि रफिक शेख (२९) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुणांवर राजावाडी येथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पवई तलावावरील […]
दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा दगडाने ठेचून खून, आरोपीला अटक
दारू पिताना दोघांच्यात झालेल्या किरकोळ वादात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. गणेश प्रधान (२८) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, शनिवारी पवई पोलिसांनी त्याचा मित्र संदेश धिंग्रा याला गुन्ह्यात अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या […]
ऐन गणेशोत्सवात पवईकरांचे पाणी पळवले; रविवारी विजेचे झटके
@रविराज शिंदे, रमेश कांबळे गुरुवार पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामुळे सगळीकडे त्याची लगबग असतानाच पवईमधील जुनी पवई मानल्या जाणाऱ्या आयआयटी भागातील अनेक परिसरात शनिवारी आणि रविवारी पालिकेने कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय पाणी गुल केले. ही समस्या कमी होती की काय, रविवारी परिसरातील वीज सुद्धा गायब झाली. ऐन गणेशोत्सवात शनिवार – रविवारची सुट्टी गाठून आखलेल्या पवईकरांच्या […]
आयआयटीजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू
@रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण आयआयटी मेनगेटजवळ काल (शुक्रवारी) रात्री ७.३० वाजता झालेल्या अपघातात एका इसमाला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली. संजय सदानंद मयेकर (४३) असे या मृत इसमाचे नाव आहे. ओल्या रस्त्यावरून मोटारसायकल घसरून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे. पवई पोलीस त्याला चिरडणाऱ्या अज्ञात वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत. यासंदर्भात पवई […]
दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]
भारत बंदला पवईत संमिश्र प्रतिसाद, पेट्रोलपंप बंद ठेवल्याने वाहनचालकांची कोंडी
@रविराज शिंदे, रमेश कांबळे इंधन दरवाढी विरोधात सोमवारी (१० सप्टेंबर) विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदचे संमिश्र पडसाद पवईतही पहायला मिळाले. येथील कॉग्रेस, मनसे, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेत, निदर्शने करत जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) आयआयटी मेनगेट येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवणेच व्यापाऱ्यांनी पसंद केले होते. […]
पवईत विधी शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
पवईतील हिरानंदानी येथे असणाऱ्या महाराष्ट्र नॅशनल लॉ-युनिवर्सिटीमध्ये विधी शाखेत शिकणाऱ्या सायली मेश्राम (२०) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पवई पोलिस तिच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आपल्या सहकारी विद्यार्थीनीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. बुधवारी तिची मैत्रीण वैय्यक्तिक कामानिमित्त बाहेर गेली होती. […]
आईला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा छोट्या भावाने केला खून
नशेच्या आहारी जावून आपल्या आईला दररोज मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा त्याच्याच छोट्या भावाने खून केल्याची घटना साकीनाका येथे घडली आहे. ब्रिजभान संतू लोध असे मृत तरुणाचे नाव असून, साकीनाका पोलिसांनी त्याचा छोटा भाऊ सूर्यभान ऊर्फ मोनू (२६) याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काजूपाडा येथे सोनू आणि मोनू हे दोघे […]