पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. त्यांना बघूनच मुले त्यांचे अनुकरण करत असतात, ही बाब लक्षात घेत पवई इंग्लिश हायस्कूलतर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत फ्लॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
माजी वायुसेना अधिकारी दिनेश नायर आणि महिला उद्योजिका सुनिता विनोद यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्वातंत्र्य दिवस म्हटले की प्रत्येक शाळेत रंगतात त्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ. मात्र आयआयटी पवई येथील पवई इंग्लिश हायस्कूलने मात्र या सोबतच मुलांचे पहिले शिक्षक मानल्या जाणाऱ्या पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि आपल्या देशाचा राष्ट्रध्वजाचे महत्व लक्षात यावे यासाठी पालकांची ‘फ्लॅग मेकिंग’ स्पर्धा आयोजित केली होती.
पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा तीन गटात १४ ऑगस्ट रोजी शाळेच्या प्रांगणात ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी तिन्ही गटातील पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आप-आपल्या कल्पकतेतून तिरंगा साकारला.
यावेळी माजी वायुसेना अधिकारी दिनेश नायर यांनी आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल मार्गदर्शन करतानाच, त्याच्या सन्मानासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत उपस्थितांचे मार्गदर्शन केले.
आवर्तन पवईशी बोलताना माजी वायुसेना अधिकारी दिनेश नायर म्हणाले की, ‘अनेक भारतीयांना आपल्या राष्ट्रध्वजाबाबत काहीच माहिती नाही. अशा स्पर्धा त्यांना याबाबत जागृत करत असतात. आपण स्वतः राष्ट्रध्वज बनवण्यासाठी त्याबाबत वाचून आल्यामुळे त्याबाबत चांगली, खरी माहिती मिळते आणि तेव्हाच त्याचा सन्मान आणि राष्ट्रप्रेम स्पष्ट होऊ शकते.’
यावेळी तिन्ही गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांसोबतच सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना मुख्य अतिथीसह शाळेच्या मुख्याध्यापिका शिरली उदयकुमार, लता प्रसाद पिल्लाई आणि भावना मांगो यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रशस्ती पत्रक देवून सन्मानित करण्यात आले.
A WELL ORGANISED EVENT WITH HUGE PARTICIPATION FROM PARENTS. GREAT GOING PEHS