भविष्य निर्वाह निधी (provident fund) परत करण्याच्या बहाण्याने ७२ वर्षीय व्यक्तीची ₹३ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल पवई पोलिसांनी फसवणुकीचा (cheating) गुन्हा दाखल केला आहे. ईपीएफओचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्याने हा डाव साधला आहे. फसवणूक करणाऱ्याने ₹६ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी शिल्लक आहे आणि ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शुल्काच्या बहाण्याने पैसे देण्यास भाग पाडले.
७ डिसेंबर रोजी, उर्मिला ठाकूर नामक महिलेने तक्रारदार यांना फोन करून ती नवी दिल्ली येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील (EPFO) अधिकारी (Officer) असल्याचे सांगितले. “तिने तक्रारदार यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत सुमारे ₹६ लाख रक्कम विभागाकडे प्रलंबित असल्याने संपर्क साधला असल्याचे सांगितले. पुढील संवादासाठी तिने एका अधिकाऱ्याचा संपर्क दिला. तसेच ठाकूरने तक्रारदार यांना चारकोपमधील एका बँकेतून त्याचे पेन्शन दिले जाते अशी माहिती दिल्याने तक्रारदारांनी तिच्यावर विश्वास ठेवला,” असे पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “भविष्य निर्वाह निधी मिळवण्यासाठी समोरील व्यक्तीकडून सुरुवातीला त्यांना ₹५२३० भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सीजीएसटी चार्जेस म्हणून ₹९०,६८४ आणि ट्रान्सफर चार्जेसच्या बहाण्याने ₹८७,००० अशा वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली पैसे उकळणे सुरू ठेवले.”
पुढील दोन आठवड्यात तक्रारदार यांनी त्यांना ₹३.०४ लाख दिल्यानंतरही अधिक पैशांची मागणी करत राहिल्याने तक्रारदार यांना संशय आला आणि त्यांनी वांद्रे येथील ईपीएफओ कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना ते या कार्यासाठी कोणतीही रक्कम आकारत नाहीत आणि ही सर्व फसवणूक आहे अशी माहिती देत पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले.
भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४१९ (तोतयागिरी करून फसवणूक) आणि ४२० (फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६सी (ओळख चोरीसाठी शिक्षा) आणि ६६डी (संगणक संसाधनांचा वापर करून तोतयागिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
English Summary
Powai police have registered a case of cheating after online cheaters cheat a 72-year-old man for `3 lakh under the pretext of returning his provident fund. The cyber thief has made this move by pretending to be an EPFO officer. The fraudster told the victim that he has a provident fund balance of `6 lakh and was forced to pay various fees to get it.
Police have registered a case under the charges of Indian Penal Code (IPC) Section 419 (cheating by impersonation) and 420 (Cheating) along with Section 66C (Punishment for Identity Theft) and 66D (Punishment for Fraud by Using Computer Resources) under the Information Technology Act. and investigation is underway.
No comments yet.