जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत, पवईकरांच्यात जनजागृती करण्यासाठी ‘निव फौंडेशन’च्या वतीने शनिवारी २५ जूनला संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानीतील ‘गलेरिया मॉल ते हेरिटेज गार्डन’ येथे जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी पथनाट्याद्वारे लोकांच्यात जनजागृती केली जाणार असून, अंमली पदार्थ विरोधी पथक व अंमली पदार्थ नियंत्रक पथकाचे अधिकारी सुद्धा लोकांना मार्गदर्शन करणार आहेत.
अनेक परिसरात सहजगत्या प्राप्त होत असलेल्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण याच्या आहारी जात आहेत. पवईमध्ये सुद्धा अनेक तरुण यांच्या व्यसनांनी ग्रासले आहेत. येथील डॉक्टरांकडे मुले नशेच्या आहारी गेल्याच्या पालकांच्या तक्रारी नेहमीच येत असतात. पवईकरांच्यात, विशेषतः तरुणाईमध्ये या संदर्भात जनजागृती करण्यासाठी, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत ‘निव फौंडेशन’ तर्फे जनजागृती मोहिमेचे आयोजन केले गेले आहे.
नशामुक्तीसाठी निघणाऱ्या शांतता मार्चच्या सोबतच, ठिकठिकाणी थांबून ‘नुक्कड मंच’ द्वारे सादर होणाऱ्या पथनाट्याच्या आधारे लोकांच्यात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती केली जाणार आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक, घाटकोपर व अंमली पदार्थ नियंत्रक पथकाचे अधिकारी उपस्थित राहणार असून, उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
९८७०९९८८६७ या क्रमांकावर “I PLEDGE” असा एसएमएस करून आपणही या रॅलीत सहभागी होवू शकता
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.