पवईच्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक पवई इंग्लिश हायस्कूल (पीईएचएस) तर्फे १३ सप्टेंबरला विद्यार्थ्यांना हिंदीचे महत्त्व सांगण्यासाठी “हिंदी भाषा दिवस” साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाट्य अभिनेते नितेश पांडे प्रमुख अतिथी होते.
सरस्वती वंदनेने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रभाग स्तरावर प्रथम पारितोषिक मिळवलेल्या या गाण्याला संगीत शिक्षक अमित खोत आणि स्वाती जोशी यांनी गायले. हिंदी दिवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या हिंदी कथा, गुलजार यांचे कविता पठण, वक्तृत्व स्पर्धा आणि हाताने लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी एक हिंदी नाटक सुद्धा सादर केले.
विद्यार्थ्यांना संबोधित करतांना नितेश पांडे म्हणाले, ‘हिंदी ही भारताची सर्वात प्राचीन भाषा असून, ती सांस्कृतिक वारसाने समृद्ध आहे. हे भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा सुद्धा आहे. याचा समृद्ध वारसा जिवंत आणि वाढत ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हिंदी वाचन करून त्याच्या प्रसारासाठी आपले नाते घट्ट ठेवने आवश्यक आहे.’
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिर्ले उदयकुमार म्हणाल्या, ‘आम्ही या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एकंदर सांस्कृतिक संस्कार करण्यासह देशाचा अभिमान आणि त्यांना परिपूर्ण करण्यासाठी आम्ही भर आणि महत्व देतो. त्यांना यशस्वी बनवण्यासाठी आमचे शिक्षक अविरत परिश्रम घेत असतात.’
शिक्षणावरील सुंदर नाट्याद्वारे हा कार्यक्रम अधोरेखित करण्यात आला. यावेळी हिंदी शिक्षकांचा आणि त्या बरोबरच नुक्कड नाटक – माधवी कुळे, कृष्णा यादव आणि बेट्सी बेनी, श्रीमती अनघा (मोनो अभिनय), श्रीमती प्रमिला (रेखांकन), स्वाती जोशी आणि श्री अमित खोत (गायन) या शिक्षकांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यावर्षी शाळेने प्रभागस्तरीय स्पर्धेत बरीच बक्षिसे मिळविली होती, यात सहभागी विद्यार्थ्यांचा सुद्धा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments yet.