पवई तलावात विसर्जना वेळी मुर्ती पडून दोन तरुण जखमी

काल अकराव्या दिवशी पवई तलावावर विसर्जन सुरु असताना क्रेनवरील मूर्तीचा तोल बिघडून पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाल्याची घटना पवईत घडली. सागर चांडालीया (३२) आणि रफिक शेख (२९) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुणांवर राजावाडी येथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पवई तलावावरील मुख्य गणेश घाट आणि गणेशनगर गणेशघाट येथे करण्यात आले. १० फुटापेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी दोन्ही ठिकाणी नेहमीप्रमाणे क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री ३.२० वाजता साकीनाका येथील डोंगरी सदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती क्रेनच्या सहाय्याने तलावात उतरवत असताना हा अपघात घडला.

‘क्रेनच्या सहाय्याने तलावात असणाऱ्या तराफ्यावर गणपतीची मूर्ती उतरवत असताना पट्टीच्या आधारावर असणाऱ्या मूर्तीचा समतोल बिघडून मूर्ती पडल्याने त्यावेळी तराफ्यावर असणारे दोन तरुण जखमी झाले आहेत.’ इतर मुलांनी पाण्यात उड्या टाकल्याने ते बचावले, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जखमी तरुणांपैकी एकाच पाय फ्रॅक्चर झाला असून, एका तरुणाला पाठीला मार लागला असल्याचे याबाबत बोलताना अजून एक अधिकाऱ्याने सांगितले.

दोन्ही तरुणांवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

(विशेष सूचना: कोणत्याही भाविकांची किंवा श्रदाळूच्या भावना दुखावल्या जाव्यात असा संपादकांचा उद्देश नसून, केवळ घडलेल्या घटनेचे वार्तांकन या दृष्टीने याकडे पाहावे. – वृत्तसंपादक)

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!