बसमध्ये गर्दीचा फायदा घेवून हातसफाई करणाऱ्या त्रिकुटाला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रातिनिधिक

बसमधील गर्दीचा फायदा घेवून हातसफाईने चोरी करणाऱ्या टोळीच्या तिघांना साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इरफान इलियाज खान, रियाजुद्दीन करीममुल्ला सय्यद, सिकंदर मोहम्मद युनुस अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नोव्हेंबर महिन्यात घाटकोपर येथे राहणारे व्यावसायिक असल्फा येथून घाटकोपर येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत उभे होते. बस आल्यावर त्यांनी आपल्या जवळील कागदपत्रे आणि पैसे असणारी पिशवी हाताला अडकवून बसमध्ये चढू लागले, मात्र खूप गर्दी असल्याने ते चढू शकले नाहीत. परत खाली उतरल्यावर त्यांच्या हातात पिशवी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तपासादरम्यान खबऱ्याचे नेटवर्क वापरून माहिती मिळवत पोलिसांनी अंधेरी – कुर्ला मार्गावर पाळत ठेवली. परिसरात सापळा रचून त्या तिघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान तिघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयात हजर केले असता पुढील तपासकामी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तिघांचाही या व्यतिरिक्त आणखी किती आणि कुठल्या गुन्ह्यात सहभाग आहे याबाबत साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!