अपघात रोखण्यासाठी साकीनाका वाहतूक विभागाची रस्ता सुरक्षा जनजागृती

साकीनाका वाहतूक विभाग आणि डन अंड ब्राडस्ट्रीट इन्फोर्मेशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात रोखण्यासाठी ‘३० व्या रस्ता सुरक्षा अभियान २०१९’ अंतर्गत पवईच्या रस्त्यांवर जनजागृती उपक्रम राबवला गेला. यावेळी साकीनाका वाहतूक विभागाचे पोलीस उप-निरीक्षक जगदाळे आणि पोलीस उप-निरीक्षक भटकर यांनी वाहनचालकांना मार्गदर्शन केले.

राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. अपघातात दर वर्षी जवळपास १२ हजार प्रवाशांचा मृत्यू होतो. रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहून राज्यभर वाहनचालकांना जागृत करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकापर्यंत पोहचवण्याचे कार्य या माध्यमातून केले जाते.

‘दरवर्षी अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या १२ हजार लोकांपैकी ८० टक्के लोकांचे वय हे साधारणपणे १८ ते ३० वयोगटातील असते. राज्याचे तरुण मनुष्यबळ येवढय़ा जास्त प्रमाणात अपघातात नष्ट होणे राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, त्यामुळे रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पाठवून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. फक्त वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून देणे आमचा उद्देश आहे’, असे यावेळी बोलताना आवर्तन पवईशी बोलताना पोउनि जगदाळे आणि भटकर यांनी सांगितले.

४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान देशभर पाळल्या जाणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहातच का? प्रत्येक दिवशी आपले कर्तव्य बजावत असताना आपण ५ लोकांना सुद्धा रस्ता सुरक्षा विषयी जागृत केले तर नक्की बदल घडू शकतो असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शाळा व कॉलेजेसमध्ये मुलांचे प्रबोधन करणे, वाहतुकीचे नियम व त्याचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे, शाऴांमधील स्कूल बसेसची तपासणी करणे, त्यांना मार्गदर्शन करणे यांसारखे अनेक उपक्रम पुढील काळात साकीनाका वाहतूक विभागाकडून पवई, चांदिवली आणि साकीनाका भागात राबवले जाणार आहेत.

दुसऱ्या बाजूने वाहतूक नियमाची कठोर अंमलबजावणी करणे. हेल्मेट आणि सिटबेल्ट यांची तपासणी करणे, अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, मद्यपान करून गाडय़ा चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करणे अशी अशी रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमित कामे सुद्धा केली जाणार आहेत. ज्यामुळे लोकांच्यात जरब बसून रस्ता सुरक्षेचे नियमांचे पालन त्यांच्याकडून केले जाईल आणि देशाच्या तरुण मनुष्यबळाची हानी टाळली जाईल.

पुढील काही महिन्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतूक सुरक्षेचा एक मोठा प्रश्न समोर उभा ठाकला असून, त्यावर योग्य उपाय शोधण्याचे काम सुद्धा साकीनाका विभागाकडून सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!