पवईस्थित ‘समिकरण चॅरिटेबल ट्रस्ट’ मार्फत रविवारी पवई, साकीनाका, काजूपाडा आणि विद्याविहार भागात ७०० पेक्षा जास्त गरजू आणि गरीब मुलांना अन्नदान करण्यात आले. या भागात रस्त्यावर आणि सिग्नल भागात राहणाऱ्या निराधार, गरजू लोकांना संस्थेतर्फे हे वाटप करण्यात आले.
समिकरण चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मोहित मोरे आणि उपाध्यक्षा सौ शिवानी मोरे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध भागात जात या फूड पाकिटांचे वाटप केले. संस्थेचे विश्वस्त श्री अशोक भगत, कल्पेश मोहिते, पंकज कुमार गुप्ता यांनी यांनी हे कार्य पूर्ण करण्यास विशेष योगदान दिले.
No comments yet.