गायक आणि पॉपस्टार शाल्मली खोलगडे यांनी त्यांच्या वडिलांच्या ६८व्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देत त्यांना एक गोड भेट दिली. त्यांनी आपल्या वडिलांना आणि आईला आश्चर्यचकित करत दिलेल्या या भन्नाट भेटीचे चित्रीकरण आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
या व्हिडिओमध्ये शाल्मली खोलगडे म्हणतात “आज बाबांचा वाढदिवस आहे आणि मी त्याच्यासाठी खास त्यांच्या आवडीचा ‘आलू पराठा’ बनवित आहे आणि मी माझ्या घरी जाऊन त्यांना आश्चर्यचकित करणार आहे.” या व्हिडिओमध्ये त्या त्यांनी आपल्या हाताने बनवलेला आलू पराठा घेवून प्रवास करत पवई येथे राहत असणाऱ्या आपल्या पालकांना भेटायला निघालेल्या दिसत आहेत. त्या जवळपास तीन महिन्यांनंतर आपल्या पालकांना पाहणार आहेत असेही त्या या व्हिडिओमध्ये म्हणतायत.
इमारतीच्या खाली पोहचल्यावर त्या आपल्या आईला व्हिडीओ कॉल करून इमारतीच्या बाहेर आल्याचे सांगत आपल्या आई-वडिलांना एक सुखद धक्का देतात. आपल्या आई-वडिलांना इमारती खाली बोलावून शुभेच्छा देतात. त्यांच्या या भेटीमुळे आई-वडील खूपच खूष झाल्याचे या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. त्यानंतर आपल्या हाताने बनवलेले आलू पराठे वडिलांना देत त्यांना वाढदिवसाची गोड भेट देताना सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झालेला पहायला मिळतो. तू हे तुझ्या हाताने बनवले आहेस? असे त्यांची आई त्यांना आनंदाने विचारते.
वडिलांच्या वाढदिवसाचे हे संपूर्ण आनंददायी क्षण शाल्मली यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाह्त्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.