आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत १३ वर्षीय कामिक्षा सिंगने तोडली स्पर्धकांची हाडे. हाडे चिरडण्याच्या या स्पर्धेत तिने सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली. युक्रेन, जॉर्डन, इराण, नेपाळ, कझाकस्तानमधील लढाऊ स्पर्धकांवर तिने मात केली.
बंट संघाच्या एस एम शेट्टी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या चौदा वर्षीय किमिक्षा सिंगने स्पर्धात्मक ‘आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चँपियनशिप २०२०’मध्ये अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक आपल्या नावे केले. या युवा लढाऊ क्रीडा अॅथलीटने देशाचा ध्वज उच्चांकीत केला आहेच, शिवाय असंख्य तरुण मुली आणि मुलांना लढाऊ क्रीडा कलेच्या आयुष्यात प्रवेश करण्यासाठी प्रेरित केले आहे.
दिल्लीत आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा
यावर्षीची वाको इंडियन ओपन किक बॉक्सिंग चँपियनशिप ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील टाकाटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती. पॉईंट फाइट, लाईट कॉन्टॅक्ट आणि ग्रांड चम्पिअनशिप अशा विविध स्पर्धा प्रकारात तिने सहभाग घेतला होता. देशातील सर्वोत्तम किकबॉक्सर्स आणि जगाच्या इतर भागांतील खेळाडूं या स्पर्धेत समोर असल्यामुळे ही स्पर्धा कठीण होती.
यावेळी स्पर्धेत स्पर्धकांबरोबरच तिच्यासाठी दिल्लीतील बदलणारे तापमान सुद्धा महत्वाचे होते. मात्र स्वत:ला शांत ठेवत आणि नवीन तापमानाशी जुळवून घेत मानसिकदृष्ट्या तिने स्वत:ला तयार केले. स्पर्धेत युक्रेन, जॉर्डन, इराण, नेपाळ, कझाकस्तान देशांतील कुशल खेळाडूंसमोर कामिक्षाने एक कडवे आव्हान ठेवले होते. किमिक्षाबरोबरच भारतातील दिग्गज खेळाडूही यात सहभागी झाले होते.
वर्षभरापूर्वी या तरुण किकबॉक्सरने आपल्या स्पर्धात्मक जीवनाची सुरुवात केली. फोकस आणि आत्मविश्वासाने ती स्ट्राइकिंग मशीनमध्ये विकसित झाली आहे. तिच्या प्रशिक्षकांसह कुटूंबियांनी दिलेला पाठिंबा आज तिच्या यशाचा मोठा भाग आहे.
“मी प्रत्येक स्पर्धकाचा खेळ बारकाईने पाहत होती. शांतपणे त्यांचा खेळ पाहताना त्यांच्या खेळातील पॅटर्न, ओपनिंग आणि कमकुवत जागा शोधत होते. त्यानंतर प्रत्येक लढाईपूर्वी मी याच अभ्यासाच्या बळावर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची वैध रणनीती तयार केली.” असे आपल्या यशाबद्दल बोलताना किमिक्षाने सांगितले.
तिच्या या उत्तम कामगिरीबद्दल आणि तरुणांनी या स्पर्धेत येण्याविषयी तुझा काय संदेश असेल विचारला असता किमिक्षा म्हणाली, “माझा हाच संदेश आहे की सर्व मुला-मुलीना, युवकाना मार्शल आर्ट, किकबॉक्सिंग अशा क्रीडा प्रकारासाठी प्रोत्साहन द्या. त्यांच्यासोबत निर्भयपणे उभे रहा.”
ती पुढे म्हणाली, “मी जसजसे पुढे वाढत गेली तसतसे सुधार आणि आत्मविश्वास वाढत गेला. माझ्या ध्येयासाठी मी पुढे जात राहीन, मला अशी आशा आहे की मी माझ्या देशासाठी असे आणखी गौरव आणि कौतुक जिंकेन.”
No comments yet.