पवईतील पथदिव्यांच्या इलेक्ट्रिक बॉक्सची झाकणे चोरी करून विकणाऱ्या टोळीतील तिघांना काल दुपारी हिरानंदानी (कमांडो) एसटीएफ पथकाने चोरी करताना रंगेहाथ पकडून, पवई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्याजवळ त्यावेळी १० पेक्षा जास्त अल्युमिनियमची झाकणे आढळून आली आहेत. तिन्ही तरुण हे विशीच्या वयातील असून, महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. याबाबत हिरानंदानी एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात परिसरात लावण्यात आलेल्या […]