८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविकिरण विद्यालयाच्या आंबेडकर हॉलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे कौतुक आणि आर्थिक नियोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई’च्या संचालिका सविता गोविलकर आणि संचालिका डॉ कमलिनी पाठक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
शिक्षिका, आया, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, रुग्णसेविका, बचत गट प्रमुख अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ६० पेक्षा अधिक महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
रविकिरण विद्यालयाचे विश्वस्त श्री विलास पवार आणि सौ. पवार यांच्या संकल्पनेतून शाळेच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील मुलांनी मराठी लोक नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
सौ. गोविलकर यांनी यावेळी महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या बद्दल रोजच्या जीवनातील काही टिप्स दिल्या. आयुष्याचे आणि जीवनावश्यक गरजांचे योजनाबद्ध आर्थिक नियोजन कसे करता येईल याच्या टिप्स देखील गोविलकर यांनी महिलांना दिल्या.
No comments yet.