प्राध्यापकाच्या मित्राचा मेल हॅक करून त्याच्या आधारे कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी पैशांची मागणी करत आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाची २ लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत समोर आला आहे. या संदर्भात माहिती तंत्रद्यान कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलीस तपास करत आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश अडकून पडलेला असताना, या सगळ्यांचा ऑनलाईन चोरट्यांनी फायदा उचलला […]
Tag Archives | ऑनलाईन गंडा
निवृत्त शास्त्रज्ञाला मैत्रिणीचा साडेतीन लाखाचा ऑनलाईन गंडा
पवईत राहणाऱ्या एका निवृत्त शास्त्रज्ञाला त्याच्या मैत्रिणीने ३.५ लाखाला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ऑनलाईन मैत्री जुळवणाऱ्या साईटवर तक्रारदार याच्याशी मैत्री करत आपण लंडनमधील औषध कंपनीत काम करत असल्याचे भासवून, मोठा व्यवसाय मिळवून देण्याचा बहाणा करून तिने हा डाव साधला. यासंदर्भात पवई पोलीस फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास करत आहेत. ६७ वर्षीय […]
सिमकार्ड पडले ‘लाख’ रुपयाचे
नवीन सिमकार्डसाठी ऑनलाइन बुकिंग करणे एका पवईकराला चांगलेच महागात पडले आहे. सिमकार्डसाठी पाच रुपये ऑनलाइन भरण्यास सांगून सायबर ठगाने त्याच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. रामबाग पवई येथे राहणारे सौरभ घोष (४७) यांनी नवीन मोबाईल फोन खरेदी केला […]
२.५ दशलक्ष पौंडचे आमिष दाखवून पवईत महिलेची ४५.६९ लाखाची ऑनलाईन फसवणूक
पवईतील ३१ वर्षीय महिला व्यावसायिकेला २.५ दशलक्ष पौंड देण्याचे आमिष दाखवत एका अज्ञात व्यक्तीने ४५.६९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर चोराने इमेल द्वारे आपण यूकेचा नागरिक असल्याची बतावणी करून, तिला भारतात २.५ दशलक्ष पौंड देणगी द्यावयाची आहे, जेणेकरुन ती भारतात चॅरिटीचे काम करू शकेल असे सांगत तिची फसवणूक केली […]
ओएलएक्सवर सामान विक्रीसाठी ठेवलेल्या दोन पवईकरांना सायबर चोरांचा ८५ हजाराचा गंडा
ओएलएक्सवर आपल्या घरातील जुने फर्निचर आणि गादी विक्रीसाठी जाहिरात करणाऱ्या दोन पवईकरांना बनावट ग्राहक बनून सायबर चोरांनी ८५ हजाराला गंडवल्याचा प्रकार आज (शनिवारी) पवईत उघडकीस आला आहे. पवई पोलीस माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. आयआयटी मुंबई येथे कार्यरत असणारे सनी सदाना (३५) हे आपल्या परिवारासह पवईतील विजय विहार येथे राहतात. […]
कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून दोन बहिणींना सव्वालाखाचा गंडा
कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करत एका ठगाने पवईतील दोन बहिणींच्या खात्यातील सव्वा लाखावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. पवईतील आयआयटी परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाने १८ ऑक्टोबरला माथेरानला फिरायला जाण्यासाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून कॅब बुक केली होती. भाड्याचे पेमेंट करण्यासाठी […]
ऑनलाईन साडी खरेदी करायला गेली आणि ५० हजार घालवून बसली
सध्या उत्सवाचे दिवस असून, ऑनलाईनवर खरेदीला उधान आले आहे. मात्र अशाच प्रकारे ऑनलाईन खरेदी केलेल्या ७९९ रुपयांच्या साडीसाठी रहेजाविहार येथे राहणाऱ्या एका गृहिणीला चक्क ५० हजार रुपये मोजावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून पवई पोलिस अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील रहेजा विहार येथे राहणारी गृहिणी […]
फार्मा कंपनीला सायबर फ्रॉडद्वारे ४५ लाखाला गंडवले
ईमेल हॅकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन घोटाळेबाजांनी पवई पोलिसांच्या अखत्यारीतील एका फार्मासिटिकल कंपनीला ४५ लाखाला गंडवले आहे. थेट दुसर्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून, कंपनीचे मेल खाते हॅक करून त्यातील सगळे पुराव्यांचे मेल डिलीट करून कोणताही मागमूस न ठेवता मोठ्या सफाईने हे काम करण्यात आले आहे. कंपनीच्या वरिष्ठ संचालकानी यासंदर्भात अज्ञात आरोपींविरोधात ६३.४३५ डॉलर्सच्या (जवळपास ४५ लाख रुपये) […]
‘गुगल पे’च्या माध्यमातून कॉलेज तरुणीची फसवणूक
ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी असलेल्या वेबसाईटवर सामान विक्री करताना गुगल पेच्या माध्यमातून पैसे स्वीकारण्यासाठी आपला गुगल पे क्युआर कोड देताच ठगाने तिच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारला आहे. आपल्या खात्यातील पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच तिने याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पवईतील एका कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असलेली तेजस्विनी ही मैत्रीणीसोबत पवईतील बीएसएनएल कॉलनीमध्ये पेईंग […]
९ हजारांच्या परताव्याच्या नावाखाली ठगाने बँक खात्यातून सव्वा लाख उडवले
परदेश वारीच्या वेळी केलेल्या नाश्त्याचे नऊ हजार रुपये ट्रव्हल एजेन्सीकडून परत मिळविण्याच्या नादात एका गृहिणीला सव्वा लाख रुपयाचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवई पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या ३९ वर्षीय तक्रारदार गृहिणीने मार्च महिन्यात पर्यटन सुविधा देणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या वेबसाईटवरून सिंगापूर येथे फिरण्यास जाण्यासाठी […]