आकाशाच्या मैदानात भरला होता मेळा सूर्य बोले बाळांनो रे चला आता खेळा वारा बोलला खेळूया शिवाशिवीचा डाव प्लुटो आणि नेपचून जाऊन दूर लपले राव पृथ्वी बोलली माझ्याकडे आहे खूप पाणी मी तर खेळीन एकटीच गोल गोल राणी चंद्र बोलला लपाछुपी मी रोज रोज खेळतो ढगामागे लपतो आमवशेला गायब होतो तेवढ्यात आला धूमकेतू शेपूट त्याची लांब […]
Tag Archives | पवई इंग्लिश हायस्कूल
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी पाऊले पडली पुढे
२७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ पासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या दोन्हीचे औचित्य साधत पवई इंग्लिश हायस्कूल ने गुरुवार, २७ फेब्रुवारीला […]
पवई इंग्लिश हायस्कूलच्या शिरपेचात ‘एस वॉर्ड’मधील सर्वोत्कृष्ट शाळेचा मुकुट
पवई इंग्लिश हायस्कूल (पीईएचएस), प्राथमिक विभागाने आणखी एक विक्रम नोंदविला आहे. यावेळी ‘बेस्ट स्कूल’चा मुकुटावर आपले नाव कोरले आहे. ४६ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, त्यांच्यावर मात करत पीईएचएसने हा सन्मान आपल्या नावे केला आहे. पीईएचएसच्या बिन्नू नायर यांनी आपल्या शालेय यशाबद्दल आवर्तन पवईशी बोलताना सांगितले “पीईएचएसला त्याच्या वचनबद्धतेसाठी, स्पर्धात्मक अभ्यासक्रमाचे समर्पण आणि २०१९ […]
पवई इंग्लिश हायस्कुल ४०व्या वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सवाची ‘झलक’
पवईतील सर्वात जुनी इंग्रजी माध्यमातील शाळा पवई इंग्लिश हायस्कूलने यावर्षी आपली ४० वर्षे पूर्ण केली आहेत. या आनंदाचा भाग म्हणून शुक्रवारी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात त्यांचा ४०वा वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव “झलक” मोठ्या उत्साहात पार पडला. दोन भागात झालेल्या या शालेय उत्सवात यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध […]
नाट्य स्पर्धेत पवई इंग्लिश हायस्कूलला द्वितीय पुरस्कार
पवई इंग्लिश हायस्कूलच्या (पीईएचएस) विद्यार्थ्यांनी शिक्षणासह नाटक आणि परफॉर्मिंग आर्टचे महत्त्व कायम ठेवत सलाम बॉम्बे फाउंडेशन कला अकादमी आयोजित आंतरशालेय कला महोत्सव २०१९ स्पर्धेत नाट्य विभागात दुसरे स्थान मिळवले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना थिएटर प्रॉडक्शनमध्ये काम करण्याची किंवा पडद्यामागे मदत करण्याची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य दाखविता यावे या उद्देशाने “सलाम बॉम्बे फाउंडेशन” क्रीडा, नाटक, […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये साजरा झाला ‘हिंदी भाषा दिवस’
@प्रमोद चव्हाण पवईच्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक पवई इंग्लिश हायस्कूल (पीईएचएस) तर्फे १३ सप्टेंबरला विद्यार्थ्यांना हिंदीचे महत्त्व सांगण्यासाठी “हिंदी भाषा दिवस” साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाट्य अभिनेते नितेश पांडे प्रमुख अतिथी होते. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रभाग स्तरावर प्रथम पारितोषिक मिळवलेल्या या गाण्याला संगीत शिक्षक अमित खोत आणि स्वाती […]
वृक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
विद्यार्थ्यांनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून, ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पोर्णिमेचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणि त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये रंगली पालकांची ‘फ्लॅग मेकिंग’ स्पर्धा
पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. त्यांना बघूनच मुले त्यांचे अनुकरण करत असतात, ही बाब लक्षात घेत पवई इंग्लिश हायस्कूलतर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत फ्लॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी वायुसेना अधिकारी दिनेश नायर आणि महिला उद्योजिका सुनिता विनोद यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्वातंत्र्य दिवस म्हटले की प्रत्येक शाळेत रंगतात त्या म्हणजे […]
दहावी परीक्षेत पवईच्या विद्यार्थ्यांची भरारी
@प्रमोद चव्हाण पवईतील अनेक विद्यार्थी शैक्षणिक करिअरच्या स्तरावर पदार्पण करत आहेत. मार्चमध्ये झालेल्या एसएससी (दहावी) परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात बऱ्याच विद्यार्थ्यांनी ९७% पेक्षा अधिक गुण मिळवून त्यांचे कुटुंब आणि शाळा दोघांना गौरव मिळवून दिला आहे. आम्ही पवईंच्या शाळांमधील समृद्ध मिश्रणाचा थोडक्यात घेतलेला आढावा. एस एम शेट्टी हायस्कूल व कनिष्ठ […]
पवई इंग्लिश हायस्कूलने साजरा केला ‘योगा डे’
योगामुळे विद्यार्थ्यांचे मन स्वस्थ व तणावमुक्त राहल्याने त्याचा लाभ त्यांना अभ्यासात होत असल्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देत शाळेत बुधवारी जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या निवेदिता यांनी यावेळी विद्यार्थ्यांना तणावमुक्त करणाऱ्या योगाचे मार्गदर्शन केले. पहाटे आईच्या कुशीतून उठून आलेल्या पूर्व-प्राथमिकच्या चिमुकल्यांसह समजदारीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माध्यमिकच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी या शालेय उपक्रमात आपला सहभाग […]
चिमुकल्यांच्या कलागुणांनी रंगले पवई इंग्लिश हायस्कूलचे स्नेहसंमेलन
@सुषमा चव्हाण आयआयटी येथील पवई इंग्लिश हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन “रिफ्लेक्शन” मंगळवारी अय्यप्पा मंदिरा समोरील मोकळ्या मैदानात दणक्यात पार पडले. यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत शर्मा यांच्या मातोश्री श्रीमती सुनितादेवी गोपाल शर्मा, सून सौदामिनी शर्मा व भारतीय सशस्त्र सेनेचे निवृत्त अधिकारी कर्नल एस के सुरी […]
अंध विद्यार्थ्यांसाठी मदतीचा ‘आवाज’
अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांच्या ‘आवाज’ उपक्रमास पवई इंग्लिश हायस्कूलच्या १९ विद्यार्थ्यांनी आपला आवाज देत त्यांच्या शिक्षणाट मोलाचा वाटा उचलला आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कविता आणि गोष्टी रेकॉर्ड केल्या आहेत. अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. अंधांमध्ये ‘दृष्टी’ नसली तरी ‘दृष्टिकोन’ असतो. एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा ते भरभरून बोलतात […]
पवईकरांसाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य शिबीर
रविवारी सुट्टीचा दिवस साधत देवनायक आचार्य बिपीन शांतीलाल शाह मेमोरिअल ट्रस्ट तर्फे व सुखशांती हॉस्पिटल आणि एस बी नर्सिग होम यांच्या संयुक्त सहकार्याने, पवई इंग्लिश हायस्कूल, आयआयटी येथे पवईकरांसाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ६ वेळेत हे शिबीर तमाम पवईकरांसाठी खुले असणार आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये भरली वाहतूक नियमांची शाळा
आयआयटी: प्रतिनिधी भावी पिढीला वाहतुकीचे नियम समजावेत आणि जनजागृती व्हावी म्हणून, मुंबई वाहतूक पोलीस व पवई इंग्लिश हायस्कूल तर्फे शाळेच्या प्रांगणात प्रात्यक्षिक स्वरूपातील ‘वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण’ या विषयावर एका कार्याक्रमाचे आयोजन केले होते. यात शाळेतील लहान मोठ्या अशा सर्व मुलांनी सहभाग घेऊन वाहतुकीचे नियम समजून घेतले. वाहन ही चैनीची वस्तू नसून, ती सध्याची […]