एके काळी केवळ कलकत्ता पर्यंत मर्यादित असणारी दुर्गापूजा, आज कामानिमित्त विविध शहरात स्थायिक झालेल्या बंगाली लोकांमुळे जगभर पोहचलेली आहे. नवरात्रीच्या शेवटच्या पाच दिवसात साजरा होणाऱ्या या उत्सवात शष्टीपासूनच धूम असते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या या उत्सवात खास आकर्षण असते ते ढाकीच्या तालावर होणारा ‘धुनुची नाच’ आणि दसऱ्याच्या दिवशी दुर्गामातेच्या विसर्जनापूर्वी सुवासिनींनी मिळून खेळला जाणारा […]