चांदिवली येथील रहेजा विहार भागात वाढत्या नशेखोरीला रोखण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे, रविवारी येथील रहिवाशांनी मैदानात उतरत धरणे आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. बाहेरील भागातून येणाऱ्या मुलांमुळे येथे नशाखोरी वाढत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी लेक साईड इमारत समोरील पालिका मैदानात मोठ्या प्रमाणात हजेरी लावत प्रशासना विरोधात हे धरणे आंदोलन केले. जवळपास […]
Tag Archives | पवई
घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अटक
पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार रोड भागात घरात घुसून घरातील मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नुकतीच अटक केली आहे. दिपक उर्फ लीचू जगबीर सारसर (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या ३ गुन्ह्यांची उकल त्याच्या अटकेतून झाली आहे. पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार […]
ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या तरुणाची आत्महत्या
ऑनलाईन पोर्टलवर केलेल्या खरेदीमध्ये फसवणुक झाल्यामुळे सोळा वर्षीय एका तरुणाने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. ओम बली असे तरुणाचे नाव असून, कांजूरमार्ग येथे लोकलखाली उडी मारून त्याने आत्महत्या केली. दहा हजार चारशे रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीनंतर त्याने हे पाऊल उचलले. त्याच्या खिशातून सापडलेल्या चिठ्ठीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसानी […]
निर्वाणा पार्क आता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान
पवईतील सर्वांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या निर्वाणा पार्कचे आज (बुधवार, १६ जानेवारी) नामकरण करण्यात आले असून, आता हे उद्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, महानगरपालिका ‘एस’ उद्यान विभागाच्या म्हात्रे मॅडम आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी हा कार्यक्रम पार पडला. पवई म्हटले कि, पर्यटन प्रेमींच्या आकर्षणाचे […]
मुंबई श्रमिक कामगार संघटनेचे पवईत आंदोलन
सरकारच्या एकतर्फी आणि कामगार विरोधी धोरण आणि सुधारणा विरोधात मंगळवार पासून दोन दिवस केंद्रीय कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. या बंदला साथ म्हणून मुंबई श्रमिक संघटनेच्यावतीने आयआयटी मेन गेटजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी भांडूप विभागातून अनेक कामगार संघटनांनी यात सहभाग घेतला. असोसिएशनने सोमवारी संयुक्तपणे दिलेल्या वक्तव्यात बंदमध्ये देशभरातून २० दशलक्ष कर्मचारी सामील होणार असल्याचे सांगण्यात […]
धावत्या ट्रकला आग; पवई पोलिसांच्या सजगतेमुळे टळली मोठी दुर्घटना
आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आदी शंकराचार्य मार्गावर धावणाऱ्या एका ट्रकला आग लागल्याची घटना पवई परिसरात घडली. पवई पोलिसांच्या आयआयटी बिट चौकीत असणाऱ्या पोलिसांनी स्थानिक दुकानदारांसह धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओ डी सी ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच १० एडब्ल्यू ७३२७ ट्रक जोगेश्वरी येथून लाकडी खुर्च्या, टेबल, कॉम्पुटर, एअर […]
साकीनाका, तरुणाला मारहाण करून एटीएमबाहेर लुटले
शुक्रवारी साकीनाका येथे दोन अज्ञात इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. तरुण एटीएममधून पैसे काढून निघाल्यानंतर काही मिनिटांत ही घटना साकीनाका येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोमध्ये काम करणारा ऋषिकेश दास साकीनाका येथील एटीएममधून पैसे काढून जात असताना तेथेच उपस्थित असणाऱ्या इसमांनी त्याचा पाठलाग करत त्याला मारहाण करून त्याच्याजवळील रक्कम […]
टम – टम गेल्या, इलेक्ट्रीक बग्गीज आल्या
आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांच्या कॅम्पस भ्रमंतीसाठी १० इलेक्ट्रीक बग्गीज जानेवारी अखेर पासून होणार दाखल. व्यवस्थापनाने १७ मिनी बस सेवा ज्यांना टम-टम म्हणून ओळखले जात होते त्यांना बंद केल्याच्या काही महिन्यांनंतरच ई-बग्गीज सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन कॅम्पस पुढाकाराचे पुढील एक पाऊल म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी-बी) कॅम्पस परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी जानेवारीच्या अखेरीस १४-सीटर […]
पवईत सुखद गारवा, तापमान १३ अंशावर
बुधवारपासूनच उत्तर मध्य महाराष्ट्रात गारवा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा नोंदवला गेला आहे. सर्वात कमी १.८ अंशाची नोंद निफाड तालुक्यात होत, दवबिंदू गोठले आहेत. मुंबईत सुद्धा पाठीमागील तीन वर्षांतील किमान म्हणजेच १२.४ तापमानाची नोंद झाली. यात सर्वाधिक गारठलेल्या ठिकांणीपैकी पवई एक असून, येथे १३ अंशाची नोंद झाली आहे. दोन महिन्यापूर्वीच ऑक्टोबर महिन्यातही […]
ज्ञानमंदीर शाळेच्या मीटर बॉक्सला आग; विद्यार्थी सुखरूप
रविराज शिंदे, रमेश कांबळे पवईतील आयआयटी माता रमाबाई नगर भागात असणाऱ्या ‘ज्ञानमंदीर विद्यालय’ शाळेच्या मीटर बॉक्सला आग लागल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. शाळेच्या पाठीमागील बाजूस हा मीटर बॉक्स असल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही. शाळेतील कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवांनाच्या साहय्याने विद्यार्थ्यांना त्वरित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टाळता आला.सोमवारी मरोळ भागात असणाऱ्या […]
आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये कोट्यावधीच्या पॅकेजेसचे जॉब ऑफर्स
भरमसाठ पगाराच्या पॅकेजेससाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी प्लेसमेंटचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये १ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत हा टप्पा पार पडला. नेहमीप्रमाणे आयआयटीयन्सला मिळणारे कोट्यवधीचे पॅकेजेस या वेळीही पहायला मिळाले. पहिल्या टप्प्यात प्लेसमेंट प्रक्रियेत निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग हे या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या टप्यात अकराशे […]
बँकेचा ऑनलाईन पत्ता शोधणं पडलं महागात; वृद्धाला ९८ हजारांना गंडा
सजेस्ट अँड एडिट पर्यायामुळे भामटे बॅंक ग्राहकांना करत आहेत लक्ष्य आपल्या बँकेचा नवीन पत्ता शोधणे पवईतील एका वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्याने बँकेच्या नंबरच्या जागेवर आपला नंबर दिला आणि वृद्धाची वैयक्तिक माहिती मिळवून त्यांच्या पेंशन खात्यातून ९७००० हजारावर हात साफ केला. पवई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. […]
संपत्तीसाठी मृत आईला केले जिवंत; तिघांना अटक
वडिलोपार्जित संपत्तीत वारसा हक्काने मुलांनाच अधिकार मिळतो. मात्र ही संपत्ती आपल्याला एकट्याला मिळावी म्हणून कधी कधी असे डाव आखले जातात की मृत व्यक्तींना सुद्धा कागदोपत्री जिवंत केले जाते. असाच एक डाव आखून आपली आई जिवंत असल्याचे भासवून, २८५ करोडच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या, मेणबत्ती उत्पादन करणाऱ्या कंपनीचे संचालक असणाऱ्या व्यावसायिक सुनील गुप्ता, त्याची पत्नी […]
सोशल मिडियावर तरुणीची ‘फेक प्रोफाईल’ बनवणाऱ्या तरुणाला कलकत्तामधून अटक
पवईतील हिरानंदानी येथील टीसीएस कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीची फेक (खोटी) प्रोफाईल बनवून, ओळख चोरीचा गुन्हा करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय शॉ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कलकत्ता येथील २४ परगणा भागच आहे.सोशल माध्यमे सध्याच्या युगात तरुणांची मुलभूत गरज होऊन बसली आहेत. यामाध्यमात अकाऊंट नाही असा […]
विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्राध्यापक विरोधात गुन्हा दाखल
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मध्ये शिक्षण घेणाऱ्या रामबाग येथील संकेत तांबे प्राध्यापकांच्या अपमानास्पद बोलण्यानंतर निराशेत असताना सोमवारी आत्महत्या केल्यानंतर पवई पोलिसांनी प्राध्यापकाला समन्स पाठवले आहेत. एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवईतील रामबाग येथे राहणारा संकेत तांबे टीसमध्ये शिक्षण घेत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याने तिथे जाणे बंद केले होते. याबाबत पालकांनी विचारणा केली […]
मानसिक तणावातून पवईत दोन तरुणांची आत्महत्या
मानसिक त्रासाला कंटाळून पवईतील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना पाठीमागील दोन दिवसात घडल्या आहेत. पवईतील कॉस्मोपॉलिटिन इमारतीत राहणारा संकेत तांबे याने सोमवारी राहत्या इमारतीच्या ८ मजल्यावरील रीफ्युजी एरियातून उडी मारून आत्महत्या केली. तर फिल्टरपाडा येथे राहणारा तरुण ओम बाली (१८) याने कांजुरमार्ग येथे लोकलखाली आत्महत्या केली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा हुशार विद्यार्थी होता. […]
पवईत सोन्याच्या दुकानात कामगाराची ३५ लाखाची चोरी, राजस्थानमधून अटक
सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने रोकड आणि सोने मिळून जवळपास ३५ लाखाच्या मालावर हात साफ केल्याची घटना पवईतील हिरानंदानीत घडली. या संदर्भात पवई पोलिसांच्या विशेष पथकाने एक वर्षांपासून लपाछपी खेळणाऱ्या रामजास जाट (२९) याला अटक केली आहे. जाट याने रोख रक्कम खर्च केली असून, सोन्याच्या वस्तू त्याच्याकडून हस्तगत झाल्या नाहीत. २९ वर्षीय आरोपी जाट […]
रिक्षातून जाणाऱ्या महिलेवर हल्ला करून चोरटयानी लुटले
परदेशी स्थायिक असणाऱ्या जूही आपटे यांनी मुंबई पोलिसांना ट्विटमध्ये टॅग करून, त्यांची बहिण नेहा उपाध्याय रिक्षामधून प्रवास करत असताना रात्री ८.१० वाजता एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करून तिच्याजवळचा मोबाईल चोरी केला असल्याची तक्रार केली होती. याच ट्विटच्या आधारावर उपाध्याय यांचा जवाब नोंदवत पवई पोलिसांनी मारहाण आणि चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. […]
पवईत टेम्पोखाली आल्याने मोटारसायकल चालकाचा मृत्यू
एका मोटारसायकल चालकाचा टेम्पोखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पवईत घडली. साकीविहार रोडवर हा अपघात घडला. मोहम्मद खान (२०) असे अपघातात मृत्यू पावलेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी टेंम्पो चालक रामसुंदर यादव (२९) याला अटक केली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान आपला अजून एक मित्र मोहम्मद कुरेशी (२०) याच्यासोबत मोटारसायकलवरून […]
एमबीए फाऊंडेशनतर्फे “स्ट्राइड २०१८, वॉक विथ डिग्निटी”चे आयोजन
५ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या पवईतील एमबीए (म्यूचअली बेनिफिशिअल ऑफ अॅक्टिव्हिटीज) फाऊंडेशन संस्थेतर्फे “स्ट्राइड २०१८, वॉक विथ डिग्निटी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एमबीए सोबत २०११ पासून काम करणारी सेल्फ इस्टीम फाऊंडेशन या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख […]