मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण हल्ल्याला यावर्षी १० वर्षं पूर्ण झाली. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, सैन्यदलातील जवान आणि नागरिकांना पवई पोलीस फ्रेंड्सच्या वतीने आयआयटी पवई येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑल मुंबई असोसिएशन फॉर स्पोर्ट्स अँड फिटनेस फॉर ऑल, राष्ट्रीय एकता संघ, महाराष्ट्र पोलीस संघटना महा. राज्य यांच्यावतीने आयआयटी, पवई पोलीस बिट चौकीजवळ […]
Tag Archives | पवई
पवईकर विद्यार्थिनींची जागतिक कराटे स्पर्धेत सुवर्ण किक
पवईतील एस एम शेट्टी शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय किमीक्षा सिंग या विद्यार्थिनीने आबूधाबी येथील अल-जजिरा क्लब इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या “विनर कप २०१८ जागतिक कराटे स्पर्धेत” दोन सुवर्ण पदके मिळवत, भारतासोबतच पवईकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. काता आणि कुमिते अशा दोन कलांमध्ये तिने ही सुवर्ण पदके मिळवली. भारतासह ६ देश […]
“खिसेकापू, चोरांपासून सावधान” पवई पोलिसांची पोस्टर जनजागृती
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी बसमधे, ट्रेनमध्ये चढणाऱ्या लोकांची पाकिटे, मोबाईल, किंमती सामान लांबवणाऱ्या टोळ्या संपूर्ण मुंबईभर धुडगूस घालत आहेत. पवई, साकीनाका भागात गेल्या महिनाभरात अशा प्रकारच्या ७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांना आळा बसावा आणि मुंबईकरांच्यात जनजागृतीसाठी पवई पोलीस ठाण्याच्यावतीने पवईतील गर्दीच्या आणि प्रमुख बस थांब्यांवर “खिसेकापू, मोबाईल चोरांपासून सावधान” असा इशारा देणारे […]
हरिओमनगर येथे पार्किंगच्या वादातून मारहाण करून पसार झालेल्या ‘थापा’ला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पाठीमागील आठवड्यात आयआयटी पवई येथील हरिओम नगर येथे मोटारसायकल पार्किंगवरून झालेल्या वादानंतर, सुखदेव खडका उर्फ थापा (३६) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी मिळून शैलेश सिंग (३४) याला मारहाण केली होती. दुसऱ्या दिवशी शैलेश याचा मृत्यू झाल्यानंतर ऐश्वर्याला अटक करण्यात आली होती, तर मृत्यूची बातमी समजताच थापा पसार झाला होता. पवई पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. […]
विना हेल्मेट जाताना तरुणांना अडवणाऱ्या पोलिसाला तरुणाच्या वडिलांकडून मारहाण; तिघांना अटक
हेल्मेटशिवाय फिरत असणाऱ्या १९ वर्षीय तरुण बाईकर, त्याच्या मित्राला रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना पवईत घडली. एलएन्डटी येथे पोलिसांनी विनाहेल्मेट आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या लोकांच्यावर कारवाईसाठी लावलेल्या नाकाबंदीत हा प्रकार घडला. तिघा आरोपीना सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यात अटक करून पवई पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी तिथे ही धिंगाणा घातला. नशेत गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना […]
पवईत जेव्हीएलआरवर धावती कार पेटली, तीन दिवसात दोन घटना
पवईतील गणेशनगर (पंचकुटिर) येथे गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या महिंद्रा झायलो कारला आग लागून, जळून खाक झाल्याची घटना काल (मंगळवार, २१ नोव्हेंबर) रात्री घडली. तर दुसऱ्या घटनेत रविवारी रात्री गांधीनगरच्याच दिशेने जाणारी स्विफ्ट कार आयआयटी मार्केटजवळ जळाल्याची घटना घडली. दोन्ही घटनेत आगीचे नक्की कारण समजू शकले नसून, वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात […]
पवईत कामाच्या आश्वासनांचे नारळ; थूकपट्टीची कामे
कामाचा दर्जा सुमार असतानाही वीस वर्षापासून पवईत मनपाचा एकच ठेकेदार. हा योगायोग की गौडबंगाल – स्थानिक नागरिक बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागांतर्गत अनेक कामे हाती घेतली गेल्याचे बॅनर्स, पोस्टर्स गल्ली बोळात झळकवली जात असून, काही ठिकाणी तर चक्क उदघाट्नाचे नारळ फोडले सुद्धा जात आहेत. मात्र सत्ता कोणाचीही असो त्यानंतर प्रत्यक्षात कामे होताना काही दिसत नाहीत. जी […]
वडिलांवर असणारे कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन भावंडे घरातून पळाली
आपल्या वडिलांच्यावर असणारे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मेहनत केली पाहिजे, हा चंग बांधून साकीनाका येथील आपल्या घरातून पळून गेलेल्या ४ मुलांना सामाजिक कार्यकर्त्यांनी ताब्यात घेऊन साकीनाका पोलिसांच्या मदतीने सुखरूप घरी परतवले आहे. बिहारला जाणारी ट्रेन पकडण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. पळून गेलेली मुले ८ ते ११ वर्ष वयोगटातील भावंडे आहेत. गोलू अनिल शाहू (वय […]
मेट्रो – ६ भूमिगत मार्गाने करण्याची पवईकरांची मागणी
स्वामी समर्थनगर – जोगेश्वरी – कांजुरमार्ग – विक्रोळी या मार्गावर होणारा मेट्रो – ६ प्रकल्प भूमिगत करण्याची मागणी पवईकरांकडून केली जात आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड़वर होणाऱ्या वाहतूक कोंडीसह हा एलिवेटेड मार्ग पवई तलाव आणि परिसराचे सौदर्य बिघडवणार असल्याने, पवईकरांनी याला विरोध दर्शवत भूमिगत मार्गाने करण्याची मागणी केली आहे. पवईकरांमध्ये याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वृत्तपत्रांमधून पत्रके […]
पवई तलाव घाटावर छठ पूजा हर्षोल्हासात
उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा सण, सूर्य आणि त्याची पत्नी उषा यांना समर्पित असलेली ‘छठ पूजा’ पवईत हर्षोल्हासात साजरी झाली. पवई तलाव घाटावर हजारोच्या संख्येने भाविकांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत छट पूजा साजरी केली. उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी विविध संस्थांकडून सोयी-सुविधा देण्यात पुढाकार दिसला. यावेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या, आमदार नसीम खान यांच्यासह भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास […]
भररस्त्यात चाकूहल्ला करून चोरी करणाऱ्या टोळीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवईत दोन जणांवर भररस्त्यात चाकूहल्ला करून, चोरी करून पळून गेलेल्या तिघांच्या टोळीला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अश्रफ ऊर्फ सोनू अमीन शेख, स्वॅलेन ऊर्फ सोहेल शाहनवाज चौधरी आणि फैजान मन्नान सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांनाही न्यायालयाने १६ तारखेपर्यंत (शुक्रवार) पोलिस कोठडी सुनावली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुले […]
पंचकुटिर पादचारी पुलावर विधी शाखेच्या विद्यार्थ्यासोबत लूटमार
पवई, आयआयटी कॅम्पसमध्ये राहणार २१ वर्षीय विधी शाखेचा विद्यार्थी अनिरुद्ध सावंत याला तीन अज्ञात इसमांनी पंचकुटिर पादचारी पुलावर गाठून, त्याच्या जवळील पैसे व मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री पवई परिसरात घडली. रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. विद्यार्थ्याने याबाबत पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पैसे, फोन देण्यास […]
चोरी करून पळून गेलेल्या कामगाराला लोणावळ्याच्या हॉटेलमधून अटक
पवईतील एका हॉटेलमधून ५० हजाराची रोकड आणि दुधव्यावसायिकाची मोटारसायकल पळवून नेणाऱ्या चोराला पवई पोलिसांनी अटक केली आहे. कमरूल इस्लाम जुबेद अहमद तफादार (३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा नेपाळचा आहे. लोणावळा येथील एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीला गेलेली ऍक्टिवा मोटारसायकल (एम एच ०३ सी डब्ल्यू ८३१६) पोलिसांनी हस्तगत […]
हरिओमनगरमध्ये मलनिःसारण वाहिनी टाकण्याच्या कामाचा नारळ फुटला
पवईतील हरिओमनगर भागातून मुख्य वहिनीला जोडणाऱ्या मलनिःसारण वाहिनी टाकण्याच्या कामाच्या मुहूर्ताचा नारळ आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या हस्ते गुरुवारी (२५ ऑक्टोबर) फुटला. यावेळी स्थानिक नागरिकांसह शाखाप्रमुख (१२२) सचिन मदने, माजी शाखा प्रमुख निलेश साळुंखेसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत अजूनही काही परिसर असे आहेत जिथे लोकांना मूलभूत गरज मिळू शकलेल्या […]
गौतमनगरकरांच्या रिकाम्या हंड्यात पालिकेचे पाण्याचे आश्वासन
प्रभाग क्रमांक १२२ मधील गौतमनगर, आयआयटी पवई येथे पाठीमागील दोन महिन्यापासून कमी दाबाने पाणी येत आहे. यासंदर्भात महानगरपालिका ‘एस विभाग’ यांना वारंवार तक्रार करून सुद्धा पालिका कानाडोळा करीत आहे. स्थानिक नगरसेवक यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रविवारी स्थानिकांनी नगरसेवक कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आपला राग व्यक्त केला होता. त्यानंतर पालिकेने आता या भागात लोकांना नवीन […]
पवई थंडावली, किमान तापमान १९.०९ अंशावर
कमाल आणि किमान तापमानात १४ अंशाचा फरक. सकाळी हवेत गारवा, तर सायंकाळचे वातावरण काहीसे गरम आॅक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण झालेले असतानाच गेल्या दोन दिवसात मुंबईच्या तापमानात घसरण नोंदविण्यात येत आहे. बुधवार सकाळच्या आकड्यांनुसार सांताक्रुझ वेधशाळेत किमान तापमान २० अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे २४ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. मुंबईत जाणवणारे तापमानातील फरक पवईतही अनुभवयास […]
तिरंदाज व्हिलेजमध्ये उभे राहिले पवईतील पहिले सुसज्ज सार्वजनिक शौचालय
पाठीमागील अनेक वर्षांपासून शौचालयाच्या समस्येने त्रस्त, मोठ्या हलाखीत जगणाऱ्या तिरंदाज व्हिलेज मधील रहिवाशांना आता दिलासा मिळाला आहे. खासदार फंडातून सोयी-सुविधांनी भरपूर असे एक सुसज्ज शौचालय येथे बांधण्यात आले आहे. यामुळे पवईतील सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या तिरंदाज व्हिलेज मधील रहिवाशांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आहे. मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे पवई. […]
शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध पवईत मानवी साखळी
वाढती बेरोजगारी व शिक्षण बाजारीकरणाविरुद्ध रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. याचाच भाग म्हणून सत्ताधारी वर्गाला याची जाणीव करून देण्यासाठी पवईमध्ये रविवारी संध्याकाळी मानवी साखळी संयोजन समितीच्यावतीने आयआयटी मेनगेट येथे मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव मानवी साखळी आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, युवक,महिला, शिक्षणप्रेमी सह सर्वपक्षीय पवईकरांनी सहभाग नोंदवला. आयआयटी […]
हवाई सुंदरीच्या नोकरीच्या अमिषाने तरुणींची फसवणूक
हवाई सुंदरीची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन तरुणींना गंडा घालणाऱ्या नासिर हुसेन मोहमद्दीन खान या ठगाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वीही साकीनाका आणि नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खानने अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पवईमध्ये राहणारी निता (बदललेले नाव) हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेऊन चांगल्या नोकरीच्या […]
रमाबाईनगरमधून चोरट्याने मोबाईल पळवले; संशयित सिसिटीव्हीत कैद
पवई, आयआयटी येथील रमाबाईनगर येथील घरात घुसून दोन मोबाईल लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे पवईत घडली आहे. मोबाईल चोरी करून पसार होणारा हा संशयित चोरटा येथील सिसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरु आहे. अशा प्रकारे घरात घुसून चोरी करणारी टोळीच परिसरात कार्यरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गणेश गायकवाड हे आयआयटी येथील रमाबाईनगर येथे […]