रस्त्यात गाडी अडवून चालकाकडून जबरी चोरी करून पसार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हेप्रकटीकरण पथकाने २४ तासाच्या आत अटक केली आहे. प्रदीप चव्हाण (१९) आणि संजय वर्मा (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एक्टिवा मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी आयआयटी मेनगेट येथे पवईतील महात्मा फुलेनगर येथे राहणारे धर्मेंदर अरुण यादव यांची गाडी अडवून मोबाईल आणि […]
Tag Archives | पवई
पवईत सायकल चोराला अटक, महागड्या सायकली हस्तगत
पवईसह साकीनाका, मरोळ, एमआयडीसी भागात सायकल चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चोराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काल अटक केली आहे. मोहमद आरिफ अन्सारी (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून जवळपास १७ महागड्या सायकली सुद्धा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. पवईसह साकीनाका, मरोळ, एमआयडीसी भागात गेल्या काही महिन्यात सायकल चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला होता. […]
चोरीच्या गुन्ह्यात थेरपीस्टला अटक
उपचाराच्या नावावर चोरी करणाऱ्या एका थेरपिस्टला पवई पोलिसांनी अटक केली आहे. रवी चौरसिया (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घरात चोरी करताना रंगेहाथ पकडून त्याला पवई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पवईतील रहिवाशी असणाऱ्या प्रियांका मारडा यांच्या घरात चोरीचे प्रकार घडत होते. त्यांच्या घरातून डायमंड पेंडंटसह सोन्याची चैन आणि एक किंमती घड्याळ असे चार […]
पवईत महिलांसाठी मोफत नर्सिंग, ब्युटीपार्लर कोर्स डेमोचे आयोजन
आजच्या महिलांनी स्पर्धेच्या युगात स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे; हेच लक्षात घेऊन बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, पवई यांच्यातर्फे महिला तसेच युवतींसाठी रविवारी मोफत नर्सिंग तसेच ब्युटीपार्लर कोर्स डेमो लेक्चरचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून, इच्छुक महिला तसेच युवतींना दिलेल्या लिंकवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करता येणार आहे. बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, पवईचे […]
पवईत झाड कोसळण्याचे सत्र सुरूच
रविराज शिंदे/ रमेश कांबळे पावसामुळे शाळा बंद असल्याने अनर्थ टळला मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई सहीत अनेक पूर्व उपनगरात झाडे कोसळण्याचे सत्र मागील दोन आठवड्यापासुन सुरू आहे. मात्र पूर्व उपनगरातील पवई मध्ये मागील काही दिवसापासून झाडे कोसळण्याच्या घटनांना उधाण आले आहे. आयआयटी पवई येथील पद्मावती रोडवर, पद्मालय मेटरनिटी होमजवळ एक भले मोठे झाड येथे […]
पवईतील संरक्षक भिंत आणि दरडीचा प्रश्न ऐरणीवरच, पालिकेने उचलले हात
@रविराज शिंदे, रमेश कांबळे पवईतील डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होत असून, वस्त्यांमधील संरक्षक भिंतचा प्रश्न सुद्धा येथील नागरिकांना सतावत असल्यामुळे येथे राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात २० – २५ वर्ष जुने असणाऱ्या संरक्षक भिंतीची डागडुजी करावी आणि काही भागात नवीन संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून युथ […]
बर्थडे पार्टी साजरी करायला गेलेल्या इसमाचा विहार तलावात बुडून मृत्यू
@रविराज शिंदे साई बांगुर्डा येथे पोहायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल रविवारी विहार तलाव येथे मित्रांसोबत गेलेल्या एका ५२ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली आहे. अग्निशमन दलाच्या साहय्याने त्यांचा शोध सुरु असून, त्यांना अजूनपर्यंत यश लाभले नाही. मुंबईमध्ये मुसळधार पावसाने गेल्या तीन दिवसापासून हाहाकार माजवला आहे. […]
आवर्तन पवई दणका: देवीनगरच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास; कचरा उचलला
पवईकरांचे आपले हक्काचे माध्यम असणाऱ्या ‘आवर्तन पवई‘चा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. आयआयटी पवई येथील देवीनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षापासून कचऱ्याचा पडलेला ढिगारा आवर्तन पवईच्या बातमी आणि पाठपुराव्यानंतर अखेर कालपासून पालिकेने उचलायला सुरुवात केली आहे. लवकरच संपूर्ण साफसफाई करून औषध फवारणी सुद्धा या भागात पालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईचे […]
पवई, चांदिवली पाच तास थांबली
प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे, रमेश कांबळे “मुंबापुरी आणि मुंबईकर कितीही संकटे आली तरी कधीच थांबत नाहीत” असे म्हटले जाते. मात्र, मुंबईचा भाग असणारे पवई आणि चांदिवली आज जवळपास ५ तास वाहतूक कोंडीत थांबली. पवई आणि चांदिवली भागात सकाळी ९ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास पाच तास शाळेच्या […]
मार्केट सिग्नलजवळ मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवले; गंभीर जखमी
@अविनाश हजारे पवई गणेशनगर येथे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारसायकलने एका १९ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच, अशाच एका भरधाव मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवल्याची घटना आयआयटी मार्केट येथे घडली आहे. वेगाची ही झिंग फुलेनगर येथे राहणाऱ्या हिना कनोजिया (२०) या तरुणीच्या जीवावर बेतता बेतता राहिली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी सकाळी ८ […]
देवीनगरकरांचा रस्ता कचऱ्यातून
प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे भाजपा सरकार सत्तेत येताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतची हाक देत संपूर्ण देश कचरामुक्त करण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत याच पक्षाच्या निवडून दिलेल्या पवईच्या नगरसेवकांपर्यंत ही हाक पोहचलेली दिसत नाही. म्हणूनच की काय येथील देवीनगर भागात जाणाऱ्या लोकांच्या मार्गावर अंथरलेली कचऱ्याची चादर उचलण्याचा त्यांना विसर पडला आहे. […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती’ आणि ‘पोलीस दीदी’
@प्रमोद चव्हाण तरुण पिढीला सध्या सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण मुले-मुली त्याच्या आहारी गेल्याचे समोर येत असते. सोबतच लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा दिवसेंदिवस डोके वर काढत आहेत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य, एक वाकडे पाऊल कुठल्या कुठे घेवून जावू शकते याची माहिती करून देण्यासोबत कायदे योग्य […]
भरधाव मोटारसायकलने घेतला तरुणाचा जीव
@प्रमोद चव्हाण गाडी ही प्रवासाचे साधन नसून, भरधाव पळवण्याचे साधन आहे, अशी समजच काही तरुणांमध्ये रुजलेली आहे. या भरधाव गाडीच्या शर्यतीत अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पवईमधील जेव्हीएलआरवर सुद्धा रात्री (बुधवार) भरधाव वेगात मोटारसायकल चालवणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ऋषभ रमेश मोरे असे या तरुणाचे नाव असून, तो मुलुंड […]
चांदिवलीत सराफाला दहा लाखांचा गंडा
चांदिवली फार्मरोडवरील एका सराफाला १० लाख ४३ हजार रुपयांना एका ठगाने गंडवल्याची घटना घडली आहे. याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून, साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत. रमेश जैन यांचे चांदिवली फार्मरोड परिसरात दागिन्यांचे दुकान आहे. काही दिवसांपुर्वी दुकानामध्ये एक व्यक्ती दागिने पाहण्यासाठी आला होता. मी खूप दागिने खरेदी करणार असल्याचे सांगत […]
पवई तलाव ओसंडून वाहू लागला
@रविराज शिंदे, सुषमा चव्हाण शनिवार, रविवार दोन दिवस मुंबईमध्ये पावसाचा तडाखा सुरू आहे. तलाव भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे पवई तलाव तुडूंब भरून रविवारी वाहू लागला. पावसात भिजण्याचा आनंद आणि पिकनिक करण्यासाठी रविवारी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला […]
पवई तलावाजवळ सापडला ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह
पवई तलावाजवळ एक पन्नास वर्षीय पुरुषाचा मृतदेह बुधवारी सकाळी पवई पोलिसांना सापडला आहे. राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता नैसर्गिक रित्या मृत्यू झाले असल्याचे समोर येत आहे. विलास परशुराम आंब्रे (५०), राहणार मुलुंड असे मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पवईकरांना एक मध्यम वयाचा […]
पवईकरांनी गिरवले योगाचे धडे
योग हा ५००० वर्षांपूर्वीचा भारतात जन्मलेला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक आभ्यास आहे. शरीर आणि मन दोन्ही निरोगी, तणावमुक्त राखणाचे काम योग करतो. ११ डिसेंबर २०१४ मध्ये युनायटेड नेशन्स महासभेने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केले. ज्यानंतर संपूर्ण जगभर २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून पवईमध्ये सुद्धा या […]
वाहनचालकांची फसवणूक करणाऱ्या बनावट मॅकेनिकला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
तुमच्या गाडीतून धूर निघत आहे असे सांगून, गाडी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने अनेक मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या बनावट मॅकेनिकच्या पवई पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात काल मुसक्या आवळल्या. झाहिद नुर मोहमद शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोवंडी येथील रफिकनगर भागातून त्याला अटक करण्यात आली. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर टकटक गँग सोबतच, तुमच्या गाडीतून धूर निघत […]
बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध
सदर बेवारस पुरुष मन्नुभाई खदान येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला आहे. त्याला राजावाडी रुग्णालयात नेले असता, दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आले असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ०५ जून रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक इसम बेशुद्धावस्थेत पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या डीपी रोड ९ जवळील मन्नुभाई […]
जेठालालला भेटण्यासाठी राजस्थानमधून दोन मुलांचे पलायन
चित्रपट आणि मालिका कलाकारांचे चाहते त्यांच्या आवडत्या कलावंतांवर असणाऱ्या प्रेमापोटी सर्व मर्यादा ओलांडताना आढळून येतात. काही चाहते अगदी विचित्र वेडेपणा करत आपल्या आवडत्या कलाकाराला शॉक देवून जातात. असेच एक उदाहरण काल पवईत पहायला मिळाले, “तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेतील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीला भेटण्यासाठी राजस्थानच्या दोन भावंडांनी मजुरीतून चार हजार रुपये मिळवून, रविवारी […]