छायाचित्र: सुषमा चव्हाण, प्रमोद चव्हाण
Tag Archives | पवई
पवईत सापडले दीड महिन्याच्या बालकाचे शव
पवईमधील पवई तलाव भागात काल (मंगळवारी) सकाळी दीड महिन्याच्या बालकाचे शव सापडल्याने एकच खळबळ उडाली. पवई पोलिसांनी शव विच्छेदनासाठी पाठवले असून, अधिक तपास करत आहेत. मंगळवारी सकाळी पालिका उद्यान विभागातील सुपरवायझर अरविंद चिंतामणी यादव पवई तलाव भागात फेरफटका मारत असताना त्यांना एका बालकाचे शव पवई तलावाच्या रामबाग येथील भागात गाळात पडल्याचे आढळून आले. “यादव याने […]
पवई, गणेशनगर येथे आत्महत्या केलेल्या ४५ वर्षीय इसमाला २५ तासानंतर बाहेर काढण्यात यश
रमेश कांबळे पवईतील गणेशनगर परिसरातील पडक्या विहीरीत उडी मारून आत्महत्या करणाऱ्या, ४५ वर्षीय मंगेश रामचंद्र मोरे यांचे शव बाहेर काढण्यात आज संध्याकाळी शोध पथकाला यश आले. २५ तासानंतर संध्याकाळी ५.३० वाजता शव बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. गणेशनगर पंचकुटीर येथे राहणारे मंगेश मोरे यांनी मंगळवारी दुपारी रागाच्या भरात घराजवळच असणाऱ्या पडक्या विहिरीत […]
पवईत ४५ वर्षीय इसमाची विहीरीत उडी मारून आत्महत्या; शोधकार्य सुरूच
रविराज शिंदे, रमेश कांबळे पवईतील गणेशनगर परिसरातील पडक्या विहीरीत उडी मारून एका ४५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली. मंगेश रामचंद्र मोरे(४५) असे या इसमाचे नाव असून, तो मनोरूग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. आई, मुली आणि भावासह तो गणेशनगर येथील चाळीत राहत होता. आज दुपारी घरात झालेल्या किरकोळ वादाच्या रागातून […]
प्रामाणिक रिक्षा चालकांचा पवई पोलिसांनी केला सन्मान
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या रिक्षात दोन वेगवेगळ्या प्रवाशांनी विसरलेल्या बॅग दोन्ही रिक्षा चालकांनी प्रामाणिकपणा दाखवत पोलीस ठाण्यात जमा करून मूळ मालकाला मिळवून दिल्याची अभिमानास्पद घटना पवईमध्ये घडल्या. रिक्षाचालकांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पवई पोलिसांनी त्यांचा सन्मानही केला. पहिल्या घटनेत रामबाग क्रिस्टलकोर्ट येथील रहिवाशी जगदीश एन जोशी यांनी रविवारी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे समान घेवून हिरानंदानी हॉस्पिटल येथून […]
पंचश्रीष्टी रस्त्यावर वाहनांना बंदी?
पवईमधील पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्समधून जाणारा रोड हा चांदिवली – हिरानंदानी भागाला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा आहे. मात्र या रोडवर खाजगी वाहनांना प्रवेश निषिद्ध केला जाणार आहे. रहिवाशी संघटनेतर्फे तशा आशयाचे बोर्डस सुद्धा दोन्हीकडील प्रवेशाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. “हा पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्सचा एक खाजगी रस्ता आहे म्हणून येथून बाहेरचे वाहन आणि जड वाहन यांना ये-जा करण्याची परवानगी […]
पवई तलावावर सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
पवई तलाव भागात वाढणाऱ्या गैरकृत्यांना रोखण्यासाठी तसेच मुंबईकरांचे आकर्षण असणाऱ्या पवई तलावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पवई तलावावर सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे येथे चालणाऱ्या गैरकृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा पवईकरांकडून व्यक्त केली जात आहे. पूर्वीपासूनच मुंबईकरांच्या आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या पवईतील पवई तलावाकडे जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित व्हावेत, तलावाचे रुपडे पालटण्यासाठी करोडो रुपये खर्च करून येथील […]
आयआयटीत ९.५० लाखाची जबरी चोरी
आयआयटी, पवई येथील एका हर्बल कंपनीच्या कार्यालयात घुसून, कामगाराला बांधून ठेवून, मारहाण करून त्याच्याकडील ९.५० लाखाची रक्कम जबरी चोरून नेल्याची घटना काल (रविवारी) दुपारी १२.३५ वाजता घडली. याबाबत पवई पोलिसांनी भादवि कलम ३९२, ३४२, ४५२, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंद करून सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. आयआयटी येथील भवानी इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये असणाऱ्या […]
पवई पोलीस ठाण्यात साजरा झाला तक्रार देण्यासाठी आलेल्या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस
पवई पोलीस ठाण्यात किरकोळ वादातून तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांपैकी एका जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस आहे, हे कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच केक मागवून दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करत, दोघांच्यामधील वाद मिटवून समजूत घालून हसतमुखाने परतवले. गुन्हेगारी आणि पोलीस यांचे अतूट नाते असते. पोलीस ठाण्यात केवळ चोरी, मारामारी, खून, बलात्कार, अत्याचार अशा घटनांचीच नोंद होत […]
पवई तलावावरील प्रेमी युगलांच्या अश्लील चित्रफीती व्हायरल, गुन्हेगारांना अटक करण्याची युथ पॉवरची मागणी
@रविराज शिंदे पवई तलाव भागात प्रेमरसात मग्न असणाऱ्या प्रेमी युगलांचे फोटो आणि चित्रफिती काढून सोशल मिडियामार्फत व्हायरल करणारी टोळीच या भागात सक्रीय झाली आहे. मुंबईतील युथ पॉवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हातात या चित्रफिती पडताच, त्यांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल फोपळे यांची भेट घेवून याबाबत लेखी निवेदन देत चित्रफिती व्हायरल करणाऱ्यावर त्वरित कारवाई […]
ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार, लेखक पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (बुधवारी) सकाळी १०.३० वाजता विक्रोळी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. पद्मश्री मुझफ्फर हुसेन प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून सुपरिचित होते. त्यांना […]
रोड नुतनीकरणात होणाऱ्या दिरंगाई विरोधात शिवसेनेचे रांगोळी आंदोलन
पालिका रस्ते विभागाकडून आयआयटी, पवई येथील प्रशांत अपार्टमेंट रोडवर गेल्या दोन महिण्यापासून सिमेंटकॉक्रीट रोड निर्मितीचे काम सुरु आहे. रोड निर्मितीच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे लोकांना त्रास होत असल्याकारणाने शिवसेनेने आज रोडवर उतरत खोदकाम केलेल्या रस्त्यावर रांगोळी काढून आंदोलन केले. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी व्हिडीओ लिंकवर क्लिक करा.
साई बांगुर्डा खून प्रकरणात आरोपीला अटक
पवईतील साई बांगुर्डा येथे मित्राचा खून करून पसार झालेल्या मित्राला अखेर पवई पोलिसांनी आज अटक केली. जीवन रवी मोरे (४०) असे अटक आरोपीचे नाव असून, उद्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. पवईमधील गौतमनगर येथे राहणारा दिनेश लक्ष्मण जोशी (३०) आपला मित्र जीवन मोरे सोबत गुरुवारी साई बांगुर्डा येथील स्काऊट गाईडच्या बंद असणाऱ्या इमारतीमध्ये पार्टी […]
जेवणाचे १० रुपये मागितले म्हणून मित्रानेच केला मित्राचा खून
जेवण करत असताना जेवणाचा खर्च म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राला १० रुपये मागितल्याचा राग येवून बांबूने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केल्याची घटना काल पवईतील साई बांगुर्डा परिसरात घडली. दिनेश लक्ष्मण जोशी (३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, आरोपी मित्र खुनानंतर पळून गेला आहे. पवईमधील गौतमनगर येथे राहणारा दिनेश हा आपल्या […]
फुलेनगरमध्ये शौचालय दुरुस्तीत दिरंगाई; तरुणास सर्पदंश
@अविनाश हजारे पवईच्या राष्ट्रपिता महात्मा फुलेनगर वसाहतीमधील मुख्य शौचालय बांधणीस मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागाकडून होत असलेली दिरंगाई आणि या भागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या विभागातील एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. वैभव भगत असे या तरुणाचे नाव असून, परिसरात शौचालय उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या अन्य एका मित्रासोबत तो बाजूच्या जंगलात शौचास गेला असताना विषारी सापाने त्याला दंश केल्याची […]
आयआयटी, पवई येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानातील झाडांच्या कत्तली विरोधात शिवसेनेचे श्रद्धांजली आंदोलन
पवई, आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात शिवसेनेच्या आमदार फंडातून सुरु असलेल्या कामाच्यावेळी लावलेली रोपटी स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली पालिका ‘एस’ उद्यान विभागाने उपटून टाकून त्यांची हत्या केल्याचा आरोप करत शिवसेनच्यावतीने आज पवईमध्ये श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दुर्गादेवी शर्मा उद्यानात जमा होत उद्यानात काढून फेकलेल्या आणि सुकलेल्या रोपट्यावर सफेद कपडा टाकून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. […]
मुंबईमध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पवई दुसऱ्या स्थानावर
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये शहरात नोंदवलेल्या बलात्काराच्या तक्रारींची संख्या पाहता या प्रकरणांमध्ये मुंबईत पवई दुसऱ्या स्थानावर असून, ओशिवरा पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पवईमध्ये गेल्यावर्षी १८ गुन्हे दाखल करण्यात आले होते तर ओशिवरा येथे बलात्काराच्या २६ गुन्ह्यांची नोंद आहे. ज्यामध्ये श्रीमंत उद्योजक आणि बॉलीवूडमधील कलाकारांनी एक चतुर्थांश बलात्कार प्रकरणे रेकॉर्ड केली […]
हिरानंदानीत फेब्रीकेशन युनिटला आग
हिरानंदानीमधील जयभीमनगर परिसरात असणाऱ्या फेब्रीकेशन युनिटला रविवारी रात्री १०.२० वाजता आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ३ बंबांच्या मदतीने १५ मिनिटाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानीची नोंद नाही. सध्या मुंबईत आगीचे सत्रच सुरु आहे. या आगींमध्ये अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पवईमध्ये सुद्धा वारंवार आगीच्या घटना घडत […]
पवईत टेंपोच्या धडकेत महिलेचा मृत्यू
@रविराज शिंदे पवई, आयआयटी मार्केट जंक्शन येथे रस्ता ओलांडताना एका भरधाव टेंपोच्या धडकेत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवारी) दुपारी ३ वाजता घडली. प्रमिला सिंह असे मृत महिलेचं नाव असून, टेम्पो चालकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. प्रमिला, पती आणि चार मुलांसहीत सुर्यनगर परिसरात राहत होती. आपल्या इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या मुलाची टयूशनची […]
इमारतीत घुसून माजी आयआयटी प्रोफेसरच्या कारची तोडफोड
११ जानेवारी २०१८ रोजी रात्री ९.१५ वाजता दोन अज्ञात लोकांनी एसएम शेट्टी शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या आयआयटी बॉम्बे स्टाफ कॉटर्समध्ये रिक्षातून प्रवेश करून, वरिष्ठ नागरिक प्रोफेसर डॉ एस जी मेहंदळे (आयआयटी बॉम्बेचे सेवानिवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी) यांच्या एस्टिलो कारची विंडशील्ड काच फोडल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली असून, पवई पोलीस त्या दोन अज्ञात […]