पवई, हिरानंदानीतील केसिंग्टन बिजनेस पार्कच्या तळमजल्यावर असणाऱ्या मीटर रूमला आग लागल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ बंबांच्या साहय्याने १ तासानंतर संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग विझवण्याचे काम सुरु असताना विक्रोळी अग्निशमन विभागाचा एक कर्मचारी आगीच्या दाहामुळे किरकोळ जखमी झाला असून, उपचारानंतर […]
Tag Archives | मुंबई अग्निशमन दल
चांदिवलीत बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मजूरांची सुखरुप सुटका
@प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे चांदिवली येथील हिरानंदानी विकासकाच्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारी १२.१५ वाजता घडली आहे. अग्निशमन दलाच्या २० – २५ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीतून ७० – ८० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, धूर शरीरात गेल्याने श्वसनास त्रास जाणवू लागलेल्या ६ कामगारांना […]
हिरानंदानीत फेब्रीकेशन युनिटला आग
हिरानंदानीमधील जयभीमनगर परिसरात असणाऱ्या फेब्रीकेशन युनिटला रविवारी रात्री १०.२० वाजता आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ३ बंबांच्या मदतीने १५ मिनिटाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानीची नोंद नाही. सध्या मुंबईत आगीचे सत्रच सुरु आहे. या आगींमध्ये अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पवईमध्ये सुद्धा वारंवार आगीच्या घटना घडत […]
रामबाग खदानीत तरुणी पडल्याचा संशय; शोध सुरु
चांदिवली येथील मन्नुभाई चाळीत राहणारी सतरा वर्षीय तरुणी फिझा खान ही जवळच असणाऱ्या रामबाग खदानीत मंगळवारी दुपारी पडल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला आहे. मुंबई अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) जवानांच्या मदतीने दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरुच आहे. फिझा ही आपल्या परिवारासोबत चांदिवली येथील मन्नुभाई चाळीत राहते ३ वर्षापूर्वी तिचे लग्न ठरले असून, […]