गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी […]
Tag Archives | रहेजा विहार
प्रबोधनकार ठाकरे जयंती निमित्त पवईत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
परिवर्तनवादी विचारवंत मा. प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३० व्या जयंती निमित्त आयआयटी, पवई येथे धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ सप्टेंबर २०१५ रोजी संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत पवईतील तिरंदाज महानगरपालिका शाळेत ‘प्रबोधनकार ठाकरे आणि परिवर्तनवादी विचार’ या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. पवईतील जनतेसाठी शैक्षणिक […]
गोविंदा रे गोपाळा
चांदिवली गावाची मानाची हंडी – श्री साई गणेश मित्र मंडळ यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे चौक, संघर्ष नगर येथे हंडीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार पूनम महाजन यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
रहेजा विहारचा पर्यायी मार्ग अखेर खुला
गेली अनेक वर्ष पर्यायी मार्गासाठी लढणाऱ्या रहेजाकरांना त्यांचा हक्काचा पर्यायी मार्ग अखेर खुला झाला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांच्या हस्ते रहेजा विहार ते साकीविहार रोड हा पर्यायी मार्ग रहेजाकरांसाठी खुला करण्यात आला आहे. कुर्ला तालुका अध्यक्ष शरद पवार, स्थानिक नगरसेविका सविता पवार, महानगरपालिका अधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी […]
सुकृतः फाऊन्डेशन – गरिब गरजूंना मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक गोष्टी देणारी संस्था
माझ्या प्रत्येक कृतीतून मला फायदा कसा होईल, या विचाराने वागणाऱ्या समाजात. आपल्याला प्रत्येक कार्यात मदत करणाऱ्या, गरीब आणि गरजू अशा घरकाम करणाऱ्या स्त्रिया, त्यांचा परिवार, अनाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा देण्याचे काम, पवईमधील रहेजा येथील सुकृतः ही संस्था करत आहे. एवढ्यावरच न थांबता ही संस्था, या लोकांसाठी चांगले काहीतरी करा म्हणून लोकांना […]