अटक दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि नाशिक येथे यापूर्वी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊनच्या काळात पवईसह, मुंबई, ठाणे, डोंबिवली, नाशिक आणि इतर ठिकाणी मिळून १० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखा युनिट १० ने अटक केली आहे. ९ ऑगस्ट रोजी पवई येथील घरात घुसून ३ लाख […]
Tag Archives | arrested
मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक
साकीनाका येथून चोरीला गेलेली काळ्या रंगाची पल्सर २२० मोटारसायकल सह ४ मोटारसायकल पोलिसांनी केल्या हस्तगत सुरक्षित पार्क करून ठेवलेल्या मोटारसायकल वर पाळत ठेवून संधी साधत बनावट चावीने तिची चोरी करून अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखा कक्ष ११ने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यातील एक साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील […]
ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोघांना १ कोटीच्या ड्रग्ससह साकीनाका येथून अटक
आरोपींच्या चौकशीत पोलिसांना दोघेही महाराष्ट्रात अंमली पदार्थाच्या तस्करी करणार्या टोळीचा भाग असल्याचे समोर आले आहे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने बुधवारी साकीनाका येथे मेफेड्रॉन नामक अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार १.१० कोटी रुपये किमतीचे २.७५ किलोग्रॅमचे मेफेड्रॉन जप्त केले आहे. साकीनाका येथील ९० फिट रोडवर […]
फसवणूकीच्या गुन्ह्यात २ येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी पुण्यातून केली अटक
मुंबईत उपचार घेत असलेल्या येमेन देशातील सहा सैनिकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पुणे येथे लपून बसलेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या आहे. फहद रदवान अल मस्तारी (३३) आणि अली अब्दुलघानी अली अल गौझी (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. येमेनमधील सुरू असलेल्या गृहयुद्धात जखमी झालेले […]
आयआयटीच्या प्राध्यापकांची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
प्राध्यापकाच्या मित्राचा मेल हॅक करून त्याच्या आधारे कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी पैशांची मागणी करत आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाची २ लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत समोर आला आहे. या संदर्भात माहिती तंत्रद्यान कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलीस तपास करत आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश अडकून पडलेला असताना, या सगळ्यांचा ऑनलाईन चोरट्यांनी फायदा उचलला […]
बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या ३ बांग्लादेशींना अटक; साकीनाका, पवई एटीसीची कारवाई
चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांना भारतीय नागरिक असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे दाखविण्यास सांगण्यात आले मात्र ते तसे करण्यास अक्षम ठरले त्यानंतर त्या बांग्लादेशींना अटक करण्यात आली. मरोळ आणि सहार परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या २ बांग्लादेशींना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींपैकी एक जण मरोळ, चिमटपाडा येथे राहत होता आणि टेलर म्हणून काम करीत होता. तर त्याचा मामा […]
डोक्यात हातोडी घालून पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक
पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. अजित नारायण लाड (६७) असे या आरोपी पतीचे नाव आहे. त्यांच्यावर त्याची पत्नी शिला अजित लाड (६५) हिची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता १९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली […]
पवईत महिलेचा राहत्या घरात खून; पती बेपत्ता
पवईतील शिवशक्तीनगर येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिला शीला अजित लाड यांचा अज्ञात व्यक्तीने तिच्या राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांना तिच्या नवऱ्याने लिहलेली सुइसाईड नोट मिळून आली असून, तो बेपत्ता आहे. या संदर्भात पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. गारमेंट कामगार […]
साकीनाका येथे लपून असणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक; अँटी-टेरर सेलची कारवाई
साकीनाका पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाने (एटीसी) आठ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालच्या मार्गाने देशात घुसखोरी करणार्या बांगलादेशातील तीन बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली आहे. पाठीमागील ८ वर्षापासून ते साकीनाका येथे वास्तव्यास आहेत. मुनीर शेख (वय ४४) सैफुल मुस्लिम (वय २७) आणि अब्दुल हलीम (वय ३२) वर्षे हे भारतीय नागरिक असल्याचे सांगत या भागात राहत होते. या प्रकरणाच्या सखोल पोलिस […]
ऑनलाईन डेटिंग फसवणूकीत चार्टर्ड अकाऊटंटला ३.३ लाखाचा गंडा; एकाला अटक
पवई पोलिसांनी पवई येथील ५४ वर्षीय चार्टर्ड अकाऊटंटला साथीदार मिळवून देण्याच्या बहाण्याखा ली ३.३ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाला वेस्ट बेंगाल येथून अटक केली आहे. अर्णब सिंग उर्फ नील रॉय बनमाळी (वय २६) हा कोलकाता येथील हावडा येथील रहिवाशी असून, त्याला शनिवारी अटक करण्यात आली. पवई पोलिस त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. दोनदा […]
तरुणीचे कपडे बदलताना चित्रीकरण करणाऱ्या नोकराला अटक
आपल्या सहकारी तरुणीचे कपडे बदलाताना चोरुन मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पवईत समोर आला आहे. याबाबत तरुणीच्या लक्षात येताच तिने पवई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पवई पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीच्या आधारावर चित्रीकरण करणारा तरुण प्रदीप रॉय याला बेड्या ठोकल्या आहेत. २३ वर्षीय पिडीत तरुणी आणि आरोपी तरुण हे पवईतील एकाच घरात काम करत असून, एकमेकांना […]
बँक व्यवस्थापक आणि साथीदाराला पाच कोटीची एफडी चोरल्याप्रकरणी अटक
इंडियन ओव्हरसीज बँक साकीनाका शाखेचे माजी व्यवस्थापक त्रिभुवनसिंग रघुनाथ यादव (वय ५०) आणि त्याचा साथीदार मुबारक वाहिद पटेल (वय ५४) यांना साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. माथाडी कल्याण मंडळाच्या सहा मुदत ठेवींमधून पाच कोटी रुपयांच्या अपहार केल्याच्या आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुबारक पटेल हा आयुर्वेद डॉक्टर आहे. कापड बाजार आणि […]
नवरा बायकोचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसाला मारहाण करणाऱ्या माजी सैनिकाला अटक
पती – पत्नी दरम्यान सुरु असणाऱ्या भांडणाच्या प्रसंगी पोलिस मदत मागवल्यानंतर निवासस्थानी गेलेल्या पोलिस हवालदाराला मारहाण केल्याबद्दल ४९ वर्षीय माजी सैनिकांला पवई पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र लावंड (४९) असे अटक आरोपीचे नाव असून, तो पवईतील हिरानंदानी येथे राहतो. संरक्षण दलात तो अल्प कालावधीसाठी (शॉर्ट सर्विस) कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास […]
चांदिवली मर्डर केस: संपत्तीच्या वादातून भावानेच केली भावाची हत्या; आरोपी भावाला अटक
चांदिवली संघर्षनगर येथील एका खोलीच्या वादातून आपल्याच मावस भावाचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. राहुल शहा (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. साकीनाका येथील चांदिवली फार्म रोडकडून संघर्षनगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या एमसीजीएम पार्क जमीन भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत कोपऱ्यात पडल्याचा […]
निरंजन हिरानंदानींच्या नावे गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ठगाला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नामांकित उद्योजक आणि विकासक डॉ निरंजन हिरानंदानी यांचा फोटो आणि नावाचा वापर करत देशभरातील उद्योजकांना गंडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. आपण नवीन व्यवसाय सुरु करत आहे त्यात गुंतवणूक करा असा संदेश पाठवून तो तरुण त्यांच्याकडे गुंतवणुकीची मागणी करत होता. मोहमद अरशद असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे […]
महिला डॉक्टरशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकाला अटक
पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या एका नामांकित रुग्णालयातील २६ वर्षीय महिला डॉक्टरशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका ४३ वर्षीय इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या एका नामांकित रुग्णालयात आरोपी इसम संजय गांधी याने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या आईला कॅन्सर उपचारासाठी दाखल केले होते. तो […]
तरुणीचे विवस्त्र व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला राजस्थानमधून अटक
पवई पोलिसांच्या हद्दीतील मरोळ भागात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीशी प्रेमाचे नाटक करून, व्हिडीओ चॅट दरम्यान तिचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून, ते सोशल माध्यमात टाकण्याची धमकी देवून ते टाळण्यासाठी पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पवई पोलिसांनी बारनेर, राजस्थान येथून अटक केली आहे. जतिन कुमार रमेश कुमार सिकरानी (वय १९) असे अटक आरोपीचे नाव आहे. […]
पॅसेंजर म्हणून प्रवास करून पवईत रिक्षावाल्यांना लुटणारी टोळी गजाआड
पवई, साकीनाका भागात रात्रीच्या वेळी रिक्षात प्रवास करून रिक्षाचालकांना लुटणाऱ्या टोळीतील दोघांच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांच्या अजून एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. इम्रान पिरमोहम्मद शेख (वय २१ वर्षे), शिवम उर्फ गुड्डू ब्रम्हदेव झा (वय २० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पाहिजे आरोपी युनुस उर्फ शेरू जावेदअली सैयद याचा […]
दुचाकी चोरून त्याचे सुट्टे भाग विकणाऱ्या टोळीला अटक
पवई परिसरातील एक महागडी दुचाकी चोरी केल्याची आरोपींची कबुली मुंबई आणि नवी मुंबईच्या विविध भागातून महागड्या मोटारसायकल चोरी करून त्या सुट्ट्या भागात विकणाऱ्या टोळीच्या ४ सदस्यांना गुन्हे शाखा ७ कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. कय्यूम ईद्रिस खान (४३) सोहेब राजू खान (२०), मुदसीर फैज़ल खान उर्फ़ चिंटू (२१) आणि समीर अमर खान (२०) अशी अटक करण्यात […]
इराणी टोळीच्या सदस्याला आंबिवलीतून अटक; साकीनाका, पवई पोलिसांची संयुक्त कारवाई
पवई, साकीनाका भागात सीबीआय ऑफिसर आणि पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या इराणी टोळीच्या एका सदस्याला कल्याणमधील आंबिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. जाफर अली असिफ अली सय्यद (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साकीनाका आणि पवई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. आम्ही […]