तरुणीचे कपडे बदलताना चित्रीकरण करणाऱ्या नोकराला अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

आपल्या सहकारी तरुणीचे कपडे बदलाताना चोरुन मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पवईत समोर आला आहे. याबाबत तरुणीच्या लक्षात येताच तिने पवई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पवई पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीच्या आधारावर चित्रीकरण करणारा तरुण प्रदीप रॉय याला बेड्या ठोकल्या आहेत.

२३ वर्षीय पिडीत तरुणी आणि आरोपी तरुण हे पवईतील एकाच घरात काम करत असून, एकमेकांना चांगले ओळखतात. पिडीत तरुणी ही त्या घरात असणाऱ्या लहान मुलीचा सांभाळ करण्याचे काम करते तर आरोपी प्रदीप हा घरात कुक म्हणून काम करतो. घरात दोन्ही नोकरांना राहण्याची वेगवेगळी सोय आहे, मात्र दोघांच्या वापरासाठी एकच स्वच्छतागृह आहे.

“तरुणी स्वच्छतागृहात कपडे बदलत असताना खिडकी जवळील भागात काहीतरी चमकत असल्याचे तिला आढळून आले. तिने जवळ जावून पाहिले असता तो मोबाईल होता. तिने मोबाईल उचलून पाहिले असता त्याच्यात रेकॉर्डीग सुरु असल्याचे लक्षात येताच तिने आपल्या मालकिणीला याबाबत माहिती दिली,” असे याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले.

मालकिणीच्या मदतीन तरुणीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपी तरुण प्रदीप रॉय याला अटक केली आहे. प्रदिप पाठीमागील अनेक दिवसांपासून आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शुट करत असल्याची शक्यता आहे.

“आम्ही आरोपीचा मोबाईल ताब्यात घेवून तपासत आहोत. त्याची चौकशी सुरु असून त्याने यापूर्वीही तिथे किंवा इतर कोणत्या ठिकाणी अशा प्रकारे व्हिडीओ शूट केले आहेत का याबाबत सुद्धा आम्ही माहिती मिळवत आहोत,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!